MGV Pharmacy College, Nashik.

MGV Pharmacy College, Nashik. MGV Pharmacy College, Nashik.

नाशिक, दि. १७ : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी येथ...
18/08/2026

नाशिक, दि. १७ : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी येथे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘कुंभमेळा व कुंभमेळ्यातील आपली कर्तव्ये’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यास देशभरातून मोठ्या संख्येने भाविक, साधू-महंत आणि पर्यटक येत असतात. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचे नियोजन, भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, शिस्त, गर्दीचे व्यवस्थापन तसेच नागरिक व स्वयंसेवकांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कुंभमेळा जनजागरण अभियान सिंहस्थ सहाय्यक समितीचे संयोजक विनायक राजगुरू यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनातील विविध पैलूंची माहिती दिली. मोठ्या धार्मिक व सामाजिक आयोजनामध्ये प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असते. प्रशासनाला सहकार्य करणे, स्वच्छता राखणे, भाविकांना आवश्यक मदत करणे आणि सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कुंभमेळ्यासारख्या व्यापक सामाजिक उपक्रमातून फार्मसी विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा, औषध विषयक जनजागृती, प्राथमिक आरोग्यसेवा, औषधांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन, रुग्णसेवा आणि आपत्कालीन परिस्थितीतील स्वयंसेवा यांसारख्या क्षेत्रांत प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळू शकते. मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणाऱ्या अशा आयोजनात आरोग्यविषयक जनजागृती आणि औषधोपचाराशी संबंधित जबाबदाऱ्यांची जाणीव विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या अशा सहभागातून विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीसोबतच औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान, संवादकौशल्य आणि सेवा वृत्तीला चालना मिळेल, असे प्राचार्य डॉ. संतोष तांबे यांनी नमूद केले.
महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेश शिंदे यांनी उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना कुंभमेळ्याच्या आयोजनाची माहिती मिळण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी आणि नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्यांची जाणीव झाली.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. कविता डावरे व प्रा. वैशाली रकिब यांनी केले. प्रा. सलोनी येवलकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

नाशिक, दि. १२ : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी येथ...
13/08/2026

नाशिक, दि. १२ : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी येथे भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, ज्येष्ठ ग्रंथालयतज्ज्ञ तथा भारतातील ग्रंथालय चळवळीचे शिल्पकार पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे महत्त्व आणि वाचनसंस्कृतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

डॉ. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त देशभर राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो. याच दिवशी आंतरराष्ट्रीय युवा दिवसही साजरा होत असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. महाविद्यालयातील बी.फार्म., एम.फार्म., फार्म.डी. आणि डिप्लोमा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी विद्यार्थिनी वेदिका भोर यांनी ग्रंथालयशास्त्राचा विकास, डॉ. रंगनाथन यांचे जीवनकार्य तसेच भारतीय ग्रंथालय चळवळीतील त्यांच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. भारतातील ग्रंथालय चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी डॉ. रंगनाथन यांनी केलेल्या अथक प्रयत्नांवरही प्रकाश टाकण्यात आला.

‘फार्मसी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाचे महत्त्व’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नियमित वाचनाची सवय ही व्यक्तिमत्त्व विकास आणि यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगण्यात आले. ‘चांगली वाचनाची सवय म्हणजे आयुष्यभराचा सोबती, तर समृद्ध ग्रंथालय म्हणजे संपूर्ण समाजासाठी ज्ञानाची अमूल्य संपत्ती,’ असा संदेश यावेळी देण्यात आला.

महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेश शिंदे आणि प्राचार्य डॉ. संतोष तांबे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास ग्रंथपाल शिवाजी खांडेकर, सहायक ग्रंथपाल मनीषा हिरे, प्रा. वैशाली रकिबे, डॉ. सोनाली पवार, प्रा. मनोज जगताप, प्रा. हर्षदा पाटील, प्रा. जयश्री मराठे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

नाशिक, दि. १२ : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी येथ...
12/08/2026

नाशिक, दि. १२ : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळाच्या स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. हातात तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत एकता, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला.यावेळी ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमालाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिरंग्याप्रती आदर आणि राष्ट्रप्रेम व्यक्त करत विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान तसेच राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव युवकांमध्ये निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. राजेश शिंदे, प्राचार्य डॉ. संतोष तांबे, यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. वैशाली रकिबे व विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. सोनाली पवार यांनी केले.

नाशिक, दि. १० : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी येथ...
10/08/2026

नाशिक, दि. १० : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत ‘Studies Abroad – परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी’ या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या वेळी स्टडी स्मार्ट, नाशिकचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्री. संदीप विश्वकर्मा यांनी विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणाच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया तसेच युरोपातील विविध देशांमधील विद्यापीठे, अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षणाच्या उपलब्ध पर्यायांची त्यांनी माहिती दिली. परदेशात पदवी, पदव्युत्तर तसेच संशोधनात्मक शिक्षण घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, प्रवेश प्रक्रिया, विविध प्रवेश परीक्षा, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि विद्यापीठ निवडीचे निकष याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

तसेच परदेशातील शिक्षणाचा खर्च, शिष्यवृत्तीच्या उपलब्ध संधी, शैक्षणिक कर्ज, विविध आर्थिक सहाय्य योजना, व्हिसा प्रक्रिया आणि शिक्षणादरम्यान उपलब्ध होणाऱ्या संधी याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. आपल्या आवडीच्या क्षेत्रानुसार योग्य अभ्यासक्रम व विद्यापीठाची निवड कशी करावी, परदेशातील शिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर घडविण्यासाठी आवश्यक कौशल्ये कोणती असावीत, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, समृद्ध वारसा, हक्क, शिक्षण आणि सर्वांगीण विकास याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. तसेच आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत प्रगती साधून उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. राजेश शिंदे यांनी उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तांबे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान ज्ञानवर्धक, मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे नियोजन प्रा. वैशाली रकिब आणि प्रा. जयश्री मराठे यांनी केले. ऋतुजा खामकर हिने सूत्रसंचालन केले.

नाशिक, दि. ८ : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी येथे...
10/08/2026

नाशिक, दि. ८ : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी येथे “मतदार जनजागृती व निवडणूक सहभाग अभियान” (SVEEP) अंतर्गत ‘मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन (SIR)’ या विषयावर ऑनलाइन जनजागृती सत्र घेण्यात आले.
नाशिकच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांनी सत्रात मार्गदर्शन केले. मतदार नोंदणी प्रक्रिया, मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन, आवश्यक कागदपत्रे, मतदार पडताळणीचे विविध टप्पे आणि नैतिक मतदानाचे महत्त्व याबाबत त्यांनी माहिती दिली. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट राहावे आणि कोणताही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी SIR मोहीम महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. SIR प्रक्रियेंतर्गत घराघरांत जाऊन मतदार पडताळणी 17 ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार आहे. अतिरिक्त बूथ लेव्हल अधिकारी (BLO) मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक माहितीची खातरजमा करतील. ज्या मतदाराचे नाव 2002 च्या आधी नाही आहे त्यांनी, 2002 च्या आधीचा मतदार कसा शोधावा. व आई-वडिलांचे नाव नुसार यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाईल. मतदार हा लोकशाहीचा पाया असून, पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.या ऑनलाइन सत्राला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरॅक्ट क्लब आणि एमजीव्ही फार्मसी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया, मतदारांचे अधिकार व कर्तव्ये याबाबत जागरूकता निर्माण होऊन निवडणूक साक्षरतेला चालना मिळेल, असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तांबे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. वृषाली जगताप आणि विद्यार्थिनी वेदिका भोर, वेदिका लोखंडे, ओम कोकरे, कौस्तुभ सावंत यांनी केले.




महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय (स्वायत्त) हिरे नॉलेज कॅम्पस पंचवटी नाशिक येथे आज दि. १...
03/08/2026

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय (स्वायत्त) हिरे नॉलेज कॅम्पस पंचवटी नाशिक येथे आज दि. १ /८/ २०२६ रोजी महाविद्यालयाकडून संस्थचे समन्वयक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही रॉबिन हूड आर्मी या संस्थेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तांबे, उपप्राचार्य प्रा. किरण एरंडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते धान्य आणि किराणा वाटप करण्यात आले. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. राजेश शिंदे व प्राचार्य डॉ. संतोष तांबे यांनी डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांना वाढदिवसानिमित्त व त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रॉबिन हूड आर्मीचे फतीमा व गीता जोशी उपस्थित होत्या. रॉबिन हूड आर्मी ही संस्था एकूण बारा देशा मध्ये काम करते. भारता मध्ये एकूण दोनशे दहा केंद्र आहे. हा उपक्रम भारतामध्ये राबविणे सुरु केले आहे आता त्याचे रूपांतर खूप मोठ्या प्रमाणावर झाले आहे. नाशिक जिल्ह्या साठी रॉबिन हूड आर्मी ही संस्था मंगल कार्यालय, लान्स येथून लग्ना मध्ये याच बरोबर कुठलेही कार्य असूदे, कार्यक्रम संपल्यानंतर उरलेले सर्व अन्न घेऊन बेघर आहे, उपाशी झोपलेले आहेत त्यांच्या पर्यंत ते अन्न पोहचवतात. त्याच बरोबर रॉबिन हूड आर्मी तर्फे गरम कपडे, शॉल, स्वेटर, जुने चप्पल, बुट एकत्र केले जातात व डिसेंबर महिन्यामध्ये त्याचे वाटप केले जाते. असे चांगले काम करणाऱ्या संस्थेला, संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसा निमित्त ही छोटीसी भेटदेण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजनसाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. वैशाली रकिबे व विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. सोनाली पवार, प्रा. मधुरा चोथवे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यपक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. अपूर्व  प्रशांत हिरे यांच...
01/08/2026

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी येथे रोटरॅक्ट क्लब व जनकल्याण ब्लड बँक नाशिकच्या वतीने शनिवारी (१ ऑगस्ट) थॅलेसेमिया जनजागृती, रक्तदान व मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेश शिंदे यांनी अशा प्रकारच्या व्याख्यानांमुळे आणि आरोग्यविषयक शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तांबे यांनी डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोकाभिमुख कार्याचा गौरव केला. तसेच त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

रोटरी क्लब नॉर्थ व जनकल्याण ब्लड बँक, नाशिक यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात थॅलेसेमियाविषयी जनजागृती, मोफत रक्त तपासणी, तज्ज्ञांचे समुपदेशन, आजाराच्या प्रतिबंध व व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन तसेच रक्तदान अभियान राबविण्यात आले. "छोटी चाचणी, मोठा फरक" या संकल्पनेतून थॅलेसेमियामुक्त समाज घडविण्याचा संदेश विद्यार्थी व नागरिकांना देण्यात आला. यावेळी रोटरी क्लब नॉर्थचे अध्यक्ष परेश महाजन उपस्थित होते.

जनकल्याण ब्लड बँकेच्या संचालिका डॉ. विद्या एकबोटे यांनी विद्यार्थ्यांना थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. थॅलेसेमिया हा जन्मजात रक्तविकार असून, वेळेवर निदान व योग्य उपचार न झाल्यास गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. विवाहपूर्व तपासणी, जनजागृती आणि नियमित रक्त तपासणीद्वारे या आजाराचे प्रमाण कमी करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. यावेळी ब्लड बँकेचे प्रदीप ढोले यांचे विशेष सहकार्य लाभले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. वृषाली जगताप, प्रा. वैशाली रकिबे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपप्राचार्य प्रा. किरण एरंडे , डॉ. सुवर्णा कट्टी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. शिबिरात विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोफत रक्त तपासणीचा लाभ घेतला तसेच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

गुरुपौर्णिमेनिमित्त एमजीव्हीच्या फार्मसी  स्वायत्त महाविद्यालयात गुरुजनांचा सन्माननाशिक, ३० जुलै : महात्मा गांधी विद्याम...
30/07/2026

गुरुपौर्णिमेनिमित्त एमजीव्हीच्या फार्मसी स्वायत्त महाविद्यालयात गुरुजनांचा सन्मान

नाशिक, ३० जुलै : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, मुंबई-आग्रा महामार्ग, पंचवटी येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत गुरु वंदना सादर केली. तसेच मनोगते व्यक्त करून पुष्पगुच्छ अर्पण करत गुरुजनांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तांबे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत गुरुंच्या मार्गदर्शनातूनच ज्ञान, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकास साध्य होत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

दि. २९/७/२०२६एमजीव्ही फार्मसीत ‘यंग इंडियन्स’ ओरिएंटेशन सत्र; युवा नेतृत्वाला दिशानाशिक, दि. २९ जुलै : महात्मा गांधी विद...
30/07/2026

दि. २९/७/२०२६

एमजीव्ही फार्मसीत ‘यंग इंडियन्स’ ओरिएंटेशन सत्र; युवा नेतृत्वाला दिशा

नाशिक, दि. २९ जुलै : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित एमजीव्ही फार्मसी महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी, नाशिक येथे ‘यंग इंडियन्स (Yi)’ या विषयावरील प्राचार्य डॉ. संतोष तांबे याच्या मार्गदर्शनाखाली ओरिएंटेशन सत्र उत्साहात पार पडले. महाविद्यालयाच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. संतोष तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.

यंग इंडियन्स (Yi) नाशिक चॅप्टरचे को-चेअर श्री. भूषण पाठक यांच्यासह श्री. उज्ज्वल चांडक, श्री. परिक्षित जोशी आणि श्री. सिद्धेश साबळे यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ‘यंग इंडियन्स’ या संघटनेची दृष्टी, ध्येय आणि उद्दिष्टे यांची सविस्तर माहिती देत युवकांसाठी उपलब्ध संधींचा आढावा मांडला.

‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII)’चा एक महत्त्वाचा घटक असलेल्या ‘यंग इंडियन्स’ संस्थेमार्फत युवकांमध्ये नेतृत्वगुण, उद्योजकता, नवोपक्रम आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात, असे वक्त्यांनी स्पष्ट केले. लर्निंग, इनोव्हेशन, क्लायमेट चेंज, हेल्थ, रुरल इनिशिएटिव्हज आणि यूथ लीडरशिप या विभागांद्वारे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात, यावर त्यांनी विशेष भर दिला.

वक्त्यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण, समस्या सोडविण्याची क्षमता आणि उद्योजक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले. संवादात्मक पद्धतीने पार पडलेल्या या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रश्नोत्तर सत्रामुळे ‘यंग इंडियन्स’मधील विविध उपक्रमांविषयी विद्यार्थ्यांना सखोल व उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. मान्यवरांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हे सत्र विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व माहितीपूर्ण ठरले असून नवोपक्रम, उद्योजकता आणि सामाजिक विकासात सक्रिय योगदान देण्यासाठी त्यांना दिशा मिळाल्याचे मदत होईल.

28/07/2026

Address

MGV Pharmacy College, Panchavati
Nashik
422003

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 1pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when MGV Pharmacy College, Nashik. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category