19/08/2026
✨ मविप्र समाजदिन २०२६ | ११२ वर्षांची ज्ञानज्योत!✨
मराठा विद्या प्रसारक समाजाचे,
Sharadchandraji Pawar College of Architecture, Nashik
मविप्र समाजाच्या ११२ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा उत्सव!
मविप्रच्या आद्य संस्थापकांनी पेटविलेली शिक्षणाची ज्योत आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला उजाळा देत आहे. त्यांच्या दूरदृष्टीला, त्यागाला आणि सामाजिक कार्याला कृतज्ञतेने वंदन करण्याचा दिवस म्हणजे ‘मविप्र समाजदिन’!
ज्ञान, शिक्षण आणि संस्कारांच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीचा ध्यास घेणाऱ्या कर्मवीरांच्या दूरदृष्टीतून मविप्र समाजाची स्थापना झाली. त्यांच्या विचारांचा, त्यागाचा आणि कार्याचा वारसा पुढे नेत आज मविप्र समाजाने शिक्षणाच्या क्षेत्रात ११२ वर्षांची प्रेरणादायी वाटचाल पूर्ण केली आहे.
कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कृतज्ञता सोहळ्यात संस्थापकांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. मविप्र समाजाचे ज्येष्ठ सभासद मा. डॉ. विद्या