Kavita Raut Foundation

Kavita Raut Foundation

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kavita Raut Foundation, Nashik.

30/05/2021

Covid 19 campaign for vaccination by Kavita.

11/08/2020

पेठ रोड एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये "जागतिक आदिवासी दिन" उत्साहात साजरा.

“आदिवासी जमातीचा गौरव दिन म्हणून ओळखला जाणारा नऊ ऑगस्ट, 'जागतिक आदिवासी दिन' राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. यंदा कोरोना महामारीचे संकट असले तरी सोशल डिस्टंसिंगचे पूर्णपणे भान राखत महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभागाच्या विविध कार्यालयांकडून हा दिवस आपल्या आस्थापनांमध्ये साजरा करण्यात आला. अशाचप्रकारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक येथील पेठ रोड, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्येही "जागतिक आदिवासी दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.”

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, पेठ रोडतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेत "जागतिक आदिवासी दिन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती आणि थोर आदिवासी क्रांतिकारकांच्या पूजनाने झाली. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत या उपस्थित होत्या. तसेच त्यांचे पती महेश तुंगार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत दहावी व बारावी बोर्ड परिक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शाळेतील शिक्षकांचेही कौतुक केले. शाळेचे प्राचार्य सुरेश देवरे यांनी आपल्या भाषणातून भारतीय स्वातंत्र्यासाठी आदिवासी क्रांतिकारकांच्या योगदानाची महती उपस्थितांसमोर सादर केली. लॉकडाऊनमुळे शाळेतील विद्यार्थी आपल्या घरी असल्याने त्यांना देखील या कार्यक्रमाचा लाभ घेता यावा यासाठी युट्यूबच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील भाकरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी नीलोफर मंसूरी यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक तसेच इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. कोरोनाचे सावट लक्षात घेता या कार्यक्रमावेळी स्वच्छता व सोशल डिस्टंसिंगचे पूर्णपणे भान राखून "जागतिक आदिवासी दिनाचा" कार्यक्रम साजरा करण्यात आला.

#जागतिकआदिवासीदिन #आदिवासीदिन #९ऑगस्ट
#आदिवासी #लॉकडाउन #एकलव्यमॉडेलरेसिडेन्शियलस्कूल #आदिवासीविद्यार्थी #आदिवासीविकासविभाग

Photos from Kavita Raut Foundation's post 27/05/2019

धुळे काकसेवड येथे पायरगड क्रिडा क्लब आयोजित कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन करताना.

04/07/2018

Tai Bamhane step on step with Kavita won silver medal for India with her Best time in 1500mTime 4:24.12 at B in youth Asian qualifications meet at Bangkok Thailand & and qualify for Youth Olympics games that will be at Argentina in October 2018.

Photos 27/11/2017
Photos from Kavita Raut Foundation's post 22/02/2017

नाशिक महानगरपालिका मतदान जागृती ची Ambassador कविता राऊत आपला मतदान हक बजावतांना

Photos 01/12/2016

Kavita Raut guidance for the YCMOU students for coming Ashwamegh Competition.

Untitled album 15/11/2016

Kavita Raut " In the Social Awarness program of Kapda Bank (Cloth Bank) associating with Swaraj Foundation

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Nashik