Maratha Vidya Prasarak Samaj

Maratha Vidya Prasarak Samaj मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक
बहुजन हिताय, बहुजन सुखाय .

ही ऐतिहासिक घटना परवाच घडली... आणि तिचा अभिमान आजही नाशिकच्या आयटीआय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. ३९२ उमेदवारां...
11/06/2026

ही ऐतिहासिक घटना परवाच घडली... आणि तिचा अभिमान आजही नाशिकच्या आयटीआय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. ३९२ उमेदवारांपैकी तब्बल ३८३ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड होऊन रोजगाराचे नवे दार खुले झाले. कौशल्य, संधी आणि यश यांचा संगम घडवणारा हा मविप्रचा रोजगार मेळावा ‘स्किल इंडिया’च्या स्वप्नाला बळ देणारा ठरला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले हे पाऊल खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आणि ऐतिहासिक आहे.

विजय प्रतिष्ठेचा... आणि विश्वासाचा!न्यायव्यवस्थेची ताकद केवळ कायद्याच्या पुस्तकांत नसते... ती असते न्यायासाठी झटणाऱ्या, ...
09/06/2026

विजय प्रतिष्ठेचा... आणि विश्वासाचा!
न्यायव्यवस्थेची ताकद केवळ कायद्याच्या पुस्तकांत नसते... ती असते न्यायासाठी झटणाऱ्या, तत्त्वांशी तडजोड न करणाऱ्या आणि वकिली व्यवसायाची प्रतिष्ठा जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांत... मुंबई व गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी मिळवलेला हा विजय असंख्य वकिलांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचा आणि नेतृत्वावर ठेवलेल्या श्रद्धेचा सन्मान आहे.

ॲड. जयंतजी जायभावे यांना मिळालेले हे यश त्यांच्या दीर्घ अनुभवाचे, निष्ठावान कार्याचे आणि न्यायक्षेत्रातील योगदानाचे प्रतीक आहे. त्यांच्या या दैदिप्यमान विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. न्याय, सचोटी आणि व्यावसायिक मूल्यांची ही वाटचाल अशीच अधिक बळकट होत राहो, हीच सदिच्छा.

काही माणसं आयुष्यभर विद्यार्थी घडवतात... आणि काही जण आपल्या शब्दांनी पिढ्यांनाही घडवतात... मविप्रचे सेवानिवृत्त शिक्षक, ...
08/06/2026

काही माणसं आयुष्यभर विद्यार्थी घडवतात... आणि काही जण आपल्या शब्दांनी पिढ्यांनाही घडवतात... मविप्रचे सेवानिवृत्त शिक्षक, कवी आणि अनुवादक श्री. दिलीप भाऊराव पाटील यांच्या ‘सण आला पाडव्याचा’ या कवितेचा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता चौथीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात समावेश झाला आहे. यापूर्वीही त्यांची ‘होळी आली होळी’ या कवितेने पाठ्यपुस्तकात स्थान मिळविले आहे. एका शिक्षकाची खरी कमाई पदे, पुरस्कार किंवा सन्मान नसतात... तर त्यांचे विचार आणि शब्द जेव्हा लाखो विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचतात, तेव्हा तो क्षणच सर्वात मोठा सन्मान ठरतो. आदरणीय श्री. दिलीप पाटील सरांचे मविप्र परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील जीवनासाठी खूपखूप शुभेच्छा !
-ॲड. नितीन बाबूराव ठाकरे
सरचिटणीस, मविप्र समाज, नाशिक

उत्तम शिक्षक, कुशल प्रशासक आणि विद्यार्थ्यांच्या मनात आदराचं अढळ स्थान निर्माण करणारे प्राचार्य एल. बी. पवार यांच्या निध...
24/05/2026

उत्तम शिक्षक, कुशल प्रशासक आणि विद्यार्थ्यांच्या मनात आदराचं अढळ स्थान निर्माण करणारे प्राचार्य एल. बी. पवार यांच्या निधनाने मविप्र परिवार अत्यंत शोकाकुल झाला आहे… शिक्षणक्षेत्रासाठी त्यांचं योगदान आणि माणुसकीने जपलेली नाती कायम स्मरणात राहतील… मविप्र परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली…

जुन्या पिढीतील राष्ट्रपती पुरस्कार विजेते नामवंत शिक्षक कै. एस. टी. अहिरराव सर यांच्या पत्नी व मराठा हायस्कूलच्या माजी आ...
18/05/2026

जुन्या पिढीतील राष्ट्रपती पुरस्कार विजेते नामवंत शिक्षक कै. एस. टी. अहिरराव सर यांच्या पत्नी व मराठा हायस्कूलच्या माजी आदर्श शिक्षिका प्रमिला सुरेश अहिरराव यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एक शिक्षिकाच नव्हे, तर संस्कारांचा अखंड प्रवाह हरपला आहे... मविप्र परिवारातर्फे आहिरराव मॅडम यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

मविप्र मध्ये आता प्रत्यक्ष निरीक्षण, नवे अनुभव आणि ज्येष्ठांकडून थेट मार्गदर्शन या त्रिसूत्रीवर काम सुरु झाले आहे. लॉ कॉ...
04/05/2023

मविप्र मध्ये आता प्रत्यक्ष निरीक्षण, नवे अनुभव आणि ज्येष्ठांकडून थेट मार्गदर्शन या त्रिसूत्रीवर काम सुरु झाले आहे. लॉ कॉलेजचा हा अभ्यासदौरा या कामाचाच एक भाग आहे.
-ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मविप्र समाज, नाशिक

मविप्र संस्थेच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाचा अभ्यास दौरा आज आयोजित करण्यात आल...
03/05/2023

मविप्र संस्थेच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाचा अभ्यास दौरा आज आयोजित करण्यात आला. मविप्रच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या लायब्ररीलाही भेट दिली. या दौऱ्याचे नेतृत्व संस्थेचे प्रा. स्वप्नील पवार व प्रा. गीतांजली चौधरी यांनी केले. या दौऱ्याचे नियोजन सध्या सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या ॲड. सानिका ठाकरे यांनी केले.

जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील संचालकपदी विजयी झालेल्या  मविप्र परिवारातील सदस्यांचे हार्दिक अभिनंदन ...
03/05/2023

जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील संचालकपदी विजयी झालेल्या मविप्र परिवारातील सदस्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

दाभाडी ता.मालेगाव, येथे महिला मेळावा , प्रमाणपत्र वितरण व यशस्वी लाभार्थी सत्कार सोहळा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समित...
03/05/2023

दाभाडी ता.मालेगाव, येथे महिला मेळावा , प्रमाणपत्र वितरण व यशस्वी लाभार्थी सत्कार सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र व मराठा विद्या प्रसारक संचलित कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली जन शिक्षण संस्थान नाशिक यांच्या संयुक्त विदयमाने दाभाडी येथे महिलांसाठी ब्युटीशियन आणि फूड प्रोसेसिंग प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे प्रमाणपत्र वितरण आणि महिला मेळावा आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमाप्रसंगी ,माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील हे म्हणाले 'महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला आहे ,प्रशिक्षण देऊन महिलांना जास्त प्रमाणात वाव देण्याचे काम जन शिक्षण संस्थान नासिक करत आहे तसेच तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग महत्त्वाचे आहे,

ॲड. नितीन ठाकरे सरचिटणीस मविप्र यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना महिला सक्षमीकरणाचे काम संस्थेच्या माध्यमातून होत आहे कौटुंबिक गरज भागविणे त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे महिलांना मुख्य प्रवाहात व प्रशिक्षण देण्याचे काम विविध प्रकारच्या कोर्सेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे

प्रास्ताविकात सौ ज्योती लांडगे संचालक जन शिक्षण संस्थान नाशिक ह्या म्हणाल्या की महिलांनी आपला वेळ वाया न घालवता विविध व्यवसायाभिमुख कोर्सेस चे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा महिलांनी आता उद्योजक होवून आर्थकदृष्टया स्वावलंबी होणे गरजेचे आहे
सदर कार्यक्रमांमध्ये ब्युटीशियन व बेकिंग कुकिंग फूड प्रोसेसिंग कोर्स केलेला यशस्वी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले व यशस्वी लाभार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले,

सदर कार्यक्रमास उपस्थित माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, ॲड. नितीन ठाकरे सरचिटणीस मविप्र समाज ,शालन सोनवणे संचालक मविप्र ,श्री अरुण देवरे माजी संचालक श्री प्रमोद निकम सरपंच, ग्रामपंचायत दाभाडी, श्री अभिजीत निकम उपसरपंच प्राचार्य किशोर भामरे सर आयटीआय सटाणा, प्राचार्य बच्छाव सर आयटीआय मालेगाव, शिल्पा देशमुख जिल्हाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचायत दाभाडी येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते,
सूत्रसंचालन अमोल निकम यांनी केले, आभार प्रा. पाटील सर यांनी केले,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन शिक्षण संस्थांचे कार्यक्रमाधिकारी संदीप शिंदे, दत्तात्रेय भोकनळ मार्गदर्शक शिक्षिका कविता देवरे मोहिनी निकम , सविता निकम उपस्थित सर्व महिलांनी परिश्रम घेतले.

जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंतचे संपूर्ण जीवन ही शिकण्याची प्रक्रिया आहे. शिक्षणाला अंत नाही.
02/05/2023

जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंतचे संपूर्ण जीवन ही शिकण्याची प्रक्रिया आहे. शिक्षणाला अंत नाही.

Address

M. V. P. Campus, Gangapur Road
Nashik
422002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maratha Vidya Prasarak Samaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share