Maharashtra Updates 24

Maharashtra Updates 24 कला, क्रीडा व संस्कृती - महाराष्ट्र |
(7)

18/08/2026

अजय देवगण मुलांसोबत त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी.

‘कॉकरोच जनता पार्टी’ देशभरात ‘स्कूल ठीक करो’ अभियान राबवत आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात एका शाळेच्या ...
18/08/2026

‘कॉकरोच जनता पार्टी’ देशभरात ‘स्कूल ठीक करो’ अभियान राबवत आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात एका शाळेच्या दारू पिणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात आली असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मुख्याध्यापक दारू पिऊन शाळेत येत असल्याचा आरोप आहे. सीजेपीचे फाउंडर अभिजीत दीपके यांनी याबाबत माहिती दिली. दीपके यांच्या म्हणण्यानुसार, गावकऱ्यांनी यापूर्वी पाच वेळा लेखी तक्रार केली होती. मात्र, त्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.

शनिवारी हा मुद्दा उपस्थित करून, मुख्याध्यापकाला हटवले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळी संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले.

17/08/2026

‘मराठी बोलणारच नाही आणि इथे पैसे पण कमावणार’ परप्रांतीयाचा नवी मुंबईत थेट इशारा.

17/08/2026

सरपंच मंगेश साबळे यांना २ वर्षासाठी तडीपारीची नोटीस.

दोन झुरळे सापडली म्हणून थेट फूड लायसन्स रद्द करणे योग्य नाही; बॉम्बे हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णयमुंबई : नवी मुंबईतील...
17/08/2026

दोन झुरळे सापडली म्हणून थेट फूड लायसन्स रद्द करणे योग्य नाही; बॉम्बे हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : नवी मुंबईतील पार्क इन बाय रॅडिसन हॉटेलच्या स्वयंपाकघरात दोन कीटक आढळल्याच्या कारणावरून अन्न परवाना निलंबित करण्याच्या महाराष्ट्र FDAच्या कारवाईवर बॉम्बे हायकोर्टाने महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.

FDAने ३ जुलै रोजी केलेल्या अचानक तपासणीनंतर हॉटेलचा FSSAI फूड लायसन्स निलंबित केला होता. त्यानंतर हॉटेलने या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाच्या आदेशानंतर झालेल्या फेरतपासणीत हॉटेलने अन्नसुरक्षा नियमांचे सुमारे ९५ टक्के पालन केल्याचे आढळले. मात्र डिशवॉशिंग आणि मिठाई विभागात दोन कीटक आढळल्याची नोंद करण्यात आली.

यावर न्यायालयाने केवळ दोन कीटक आढळल्याच्या आधारावर परवाना दीर्घकाळ निलंबित ठेवणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. कारवाई करताना परिस्थितीची एकूण गंभीरता आणि आस्थापनाचे एकंदर नियमपालनही विचारात घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

त्यानंतर हायकोर्टाने हॉटेलचा फूड लायसन्स निलंबित करण्याचा आदेश रद्द केला आणि हॉटेलला पुन्हा खाद्य व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला.

अखेर ठरले..!! गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री जाहीर
17/08/2026

अखेर ठरले..!! गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री जाहीर

मराठी सक्तीबाबत १९८९ चा कायदा अस्तित्वात असूनही अंमलबजावणी रखडलीमुंबई : मराठी सक्तीबाबत १९८९ चा कायदा अस्तित्वात असूनही ...
17/08/2026

मराठी सक्तीबाबत १९८९ चा कायदा अस्तित्वात असूनही अंमलबजावणी रखडली

मुंबई : मराठी सक्तीबाबत १९८९ चा कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. वाहनचालकांना व्यवसाय करताना मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे, अशी भूमिका घेत या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला.

सुरुवातीला काही संघटनांनी याला विरोध केला होता. त्यानंतर हाजी अरफात शेख, संजय निरुपम, कृपाशंकर सिंह, शशांक राव यांच्यासह विविध संघटनांशी चर्चा करून त्यांना भूमिका समजावून सांगण्यात आली.

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आल्यानंतर १ मे ते १५ ऑगस्ट असा कालावधी देण्यात आला.

कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. रिक्षा-टॅक्सी चालकांना रोजच्या व्यवहारात उपयोगी पडतील असे मोजके १८ ते २० शब्द वाक्यांसह तयार करण्यात आले असून त्यासाठी चार पानी पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे.

परिवहन खात्याकडे आर्थिक तरतूद नसल्याने मराठी भाषा विभागाशी संपर्क साधून मुंबई मराठी साहित्य संघाला आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

16/08/2026

येणाऱ्या पिढीला असे हे संभाजी
महाराज बघायला मिळणार का ?

15/08/2026

शाळेत असतानाचे दिवस १५ ऑगस्टची गावाला फेरी.

Address

Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Updates 24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share