के डी गावीत शैक्षणिक संकुल कोरीट ता जि नंदुरबार

  • Home
  • India
  • Nandurbar
  • के डी गावीत शैक्षणिक संकुल कोरीट ता जि नंदुरबार

के  डी गावीत शैक्षणिक संकुल कोरीट ता जि नंदुरबार K D Gavit Sekshanik Sankul Korit Tal Dist Nandurbar

11/08/2026
09/08/2026
*आजचा दैनिक खान्देश गौरव वृत्तपत्र ✒️✒️*
06/08/2026

*आजचा दैनिक खान्देश गौरव वृत्तपत्र ✒️✒️*

*आजचा दैनिक लोकमत वृत्तपत्र ✒️✒️*
06/08/2026

*आजचा दैनिक लोकमत वृत्तपत्र ✒️✒️*

01/08/2026

K D Gavit Sekshanik Sankul Korit Tal Dist Nandurbar

*आजचा दैनिक देशोन्नती वृत्तपत्र✒️✒️*
01/08/2026

*आजचा दैनिक देशोन्नती वृत्तपत्र✒️✒️*

के.डी.गावीत शैक्षणिक संकुल, कोरीट येथे वृक्षदिंडी, ग्रंथपूजन व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न.....कोरीट | नंदुरबार...
27/07/2026

के.डी.गावीत शैक्षणिक संकुल, कोरीट येथे वृक्षदिंडी, ग्रंथपूजन व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न.....

कोरीट | नंदुरबार –

पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने के.डी.गावीत शैक्षणिक संकुल, कोरीट येथे वृक्षदिंडी, ग्रंथपूजन व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथपूजन करण्यात आले. त्यानंतर वृक्षदिंडीचे पूजन करून "झाडे लावा, झाडे जगवा", "एक विद्यार्थी – एक वृक्ष" आणि "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावातून वृक्षदिंडी काढून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. यानंतर विद्यालय परिसरात विविध प्रकारच्या फळझाडे, औषधी वनस्पती व सावलीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गोपाळ सोमजी पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोरीट गावाचे माजी उपसरपंच सुदाम कोळी तसेच छोटूलाल जाधव उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विशद करत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करत पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रा.भरत चव्हाण यांनी हवामान बदल, वाढते प्रदूषण, पाणीटंचाई आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले.

तसेच प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारून निसर्ग संवर्धनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास राकेश पाटील, व्ही.एस.पाटील, विश्वासराव शिरसाठ, चारुशीला निकम, मीनाक्षी पाटील, ज्योत्स्ना देवरे, प्रा.नयना पवार, प्रा. सुनील खाडे, प्रा. स्वाती बारी प्रा.प्रशांत बोरसे, सुनंदा पाटील, निता साळुंखे , जयश्री देवरे,कौशिक बाविस्कर, किशोर भिलावे तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका, प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वासराव शिरसाठ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.नयना पवार यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि निसर्गप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.

Address

At Post Korit Tal Dist Nandurbar
Nandurbar
425412

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when के डी गावीत शैक्षणिक संकुल कोरीट ता जि नंदुरबार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share