Shri. Chhatrapati Shivaji Jr. Collage - HSCVC Sagroli

Call Website Contact the school

Shri. Chhatrapati Shivaji Jr. Collage - HSCVC Sagroli Shri Chhatrapati Shivaji Highschool &Jr.College(Technical &HSC Vocational) Shardanagar,Sagroli Nanded

26/09/2026
नमस्कार दिनांक 11 सप्टेंबर रोजी BBA-ABM कॉलेज तर्फे आयोजित करण्यात आलेल्या Anti Ragging poster presentation स्पर्धेत 11 ...
26/09/2026

नमस्कार
दिनांक 11 सप्टेंबर रोजी BBA-ABM कॉलेज तर्फे आयोजित करण्यात आलेल्या Anti Ragging poster presentation स्पर्धेत 11 वी vocational विभागातील विद्यार्थिनींनी *Anti Ragging* हा विषय घेऊन पोस्टरद्वारे सादरीकरण केले यामध्ये त्यांचा तृतीय क्रमांक आला.
तसेच दिनांक 21 सप्टेंबर रोजी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात बारावी Vocational विभागातील विद्यार्थिनींनी *बंजारा* या गीतावर नृत्य सादर केले यामध्ये त्यांचा द्वितीय क्रमांक आला याबदल सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन💐

*अभियंता दिनानिमित्त टेक्निकल विभागात १३व्या ‘Technovation 2026’चे आयोजन; ४७० विद्यार्थ्यांनी घेतला नाविन्यपूर्ण प्रकल्प...
15/09/2026

*अभियंता दिनानिमित्त टेक्निकल विभागात १३व्या ‘Technovation 2026’चे आयोजन; ४७० विद्यार्थ्यांनी घेतला नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा अनुभव*

दि.१५ सप्टेंबर भारतरत्न सर डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात साजरा होणारा अभियंता दिन संस्कृती संवर्धन मंडळा,सगरोळी येथील टेक्निकल विभागात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अभियंता दिनाचे औचित्य साधून १३व्या ‘Technovation 2026’ या वर्किंग मॉडेल्सच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनात अटल लॅब, V1, V3 तसेच HSC Vocational विभागातील इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विविध नाविन्यपूर्ण वर्किंग मॉडेल्स साकारले. यामध्ये Water Level Indicator, Automatic Bell System, Obstacle Avoiding Bot, घरातील शोभेचे लाकडी शेल्फ, परसबागेसाठी पाणी देण्याची यंत्रणा, पावसाच्या पाण्याचा निचरा पद्धती, Automatic Street Light, Automatic Toll Gate Barrier, Agriculture Sprayer, Water Health Monitor, Gas Detector, Smart Home Automation, Lawn Cutter आदी प्रकल्पांचा समावेश होता.
प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे श्री. अमित देऊळकर, मोटार वाहन निरीक्षक, RTO नांदेड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत RTO अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती दिली. तसेच वाहतूक नियम, रस्ता सुरक्षा आणि जबाबदार वाहनचालक म्हणून विद्यार्थ्यांनी घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. प्रमोद देशमुख, चेअरमन, संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञानापुरते मर्यादित न राहता नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणाव्यात, प्रयोगशीलता व तांत्रिक कौशल्य विकसित करावे आणि अशा तंत्रप्रदर्शनांमध्ये नियमितपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
या प्रदर्शनाला संस्थेच्या विविध विभागांतील जवळपास ४७० विद्यार्थ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वर्किंग मॉडेल्सची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, समस्या सोडविण्याची क्षमता, तांत्रिक कौशल्य आणि नवोन्मेषी दृष्टिकोनाचे दर्शन या प्रदर्शनातून घडले.
‘प्रश्नातून कल्पना, कल्पनेतून प्रयोग आणि प्रयोगातून समाधान’ या विचाराला प्रत्यक्ष रूप देणारे ‘Technovation 2026’ हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या तांत्रिक क्षमतांना व्यासपीठ देणारे ठरले.

13/09/2026

Technovation 2026
Technical Department Sagroli Dist Nanded

“From Classroom to Real-World Skills! ⚡🔧 Our Technical Students Take the Lead by Installing and Wiring the Classroom Tub...
03/09/2026

“From Classroom to Real-World Skills! ⚡🔧 Our Technical Students Take the Lead by Installing and Wiring the Classroom Tube Lights Themselves.” 💡👏

Technical Department Sagroli Dist.Nanded

Address

Shardanagar Sagroli TQ. Biloli Dist. Nanded
Nanded
431731

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+917875563732

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri. Chhatrapati Shivaji Jr. Collage - HSCVC Sagroli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri. Chhatrapati Shivaji Jr. Collage - HSCVC Sagroli:

Shortcuts

Share