Shri. Chhatrapati Shivaji High School Sagroli

Call Website Contact the school

Shri. Chhatrapati Shivaji High School Sagroli Shri. Chhatrapati Shivaji High School Sagroli

*AFS West Zone Regional Meet – Maru Sangam**The Confluence of Thoughts: The Courage to Care*The AFS (American Field Serv...
25/09/2026

*AFS West Zone Regional Meet – Maru Sangam*

*The Confluence of Thoughts: The Courage to Care*

The AFS (American Field Services) West Zone Regional Meet 2026 was held from 18th to 20th September 2026 at L K Singhania Education Centre, Gotan, District Nagaur, Rajasthan. The three-day meet, themed “Maru Sangam – The Confluence of Thoughts: The Courage to Care,” brought together students, principals and AFS Coordinators from more than 30 reputed schools across Maharashtra, Gujarat and Rajasthan.

Shri Chhatrapati Shivaji High School, Sagroli was represented by Ketki Kulkarni and Tanvi Mathpati of Class IX, accompanied by AFS School Coordinator Mr Kailash Khasbhage and Mr Govind Ramgirwar. Millennium – The Concept School, Sagroli participated through Moksha Moghe and Vaibhavi Bage of Class IX, accompanied by Mr Prabhakar Rao and AFS School Coordinator Ms Arpita Sar.

The meet provided a meaningful platform for students and educators to learn, interact and build connections beyond the classroom. The sessions focused on themes such as kindness in education, networking and collaboration, “Kind Way to Say No,” and Dialogue Lab, encouraging participants to communicate respectfully, understand diverse perspectives and develop empathy.

Students enthusiastically participated in activities such as the Ripple Wall, Poster Presentation, Art and Craft, and other collaborative engagements. These activities gave them opportunities to express their ideas creatively, work in teams and interact with students from different regions.

The participants benefited from the guidance and interaction of distinguished resource persons, including Mr Ashok Ganguly, Former Chairman, CBSE; Mr Jayant Lal, AFS India Board Member; Ms Diya Badgel, National Director, AFS; Mr Rishabh Turkhia; Dr Neeta Mhatre; Ms Mumtaz Sayyad; and Ms Seema Shaikh, Head, West Zone.

For the students of Sagroli, Maru Sangam was more than an educational gathering. It was an enriching intercultural experience that helped them appreciate kindness, collaboration, diversity and responsible global citizenship. The friendships they formed, the ideas they exchanged and the experiences they gained will remain valuable memories of their AFS journey.

The meet beautifully reflected the spirit of AFS—bringing young people together to understand one another, celebrate diversity and develop the courage to care.

*अनुष्का गंगासागरे हिची अभिमानास्पद यशोगाथा!*संस्थेची माजी विद्यार्थिनी कु. अनुष्का गंगासागरे हिने आपल्या मेहनत, जिद्द आ...
11/09/2026

*अनुष्का गंगासागरे हिची अभिमानास्पद यशोगाथा!*

संस्थेची माजी विद्यार्थिनी कु. अनुष्का गंगासागरे हिने आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर *NORCET-10*(ही AIIMS New Delhi मार्फत घेतली जाणारी परीक्षा आहे) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने *B.Sc.(Nursing) के.एस.जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे* येथून पूर्ण केले असून तिची *Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education & Research (JIPMER), Karaikal Puducherry* येथे *Nursing Officer* पदावर नियुक्ती झाली आहे.
संस्थेने तिच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेऊन *दृष्टी* संस्थेकडून मदत मिळण्यासाठी पुढाकार घेतला या शिष्यवृत्तीमुळे तिच्या शिक्षणाला मोलाचा आधार मिळाला. त्यासोबतच तिची मेहनत, जिद्द, सातत्य आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांचा सुंदर संगम तिच्या या यशातून दिसून येतो.
अनुष्काचे हे यश आपल्या संस्थेसाठी, तिच्या पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानाचा क्षण आहे.
तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

*विज्ञान नाट्याच्या माध्यमातून वैज्ञानिक संघर्षाची कहाणी; श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलला विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक* ...
11/09/2026

*विज्ञान नाट्याच्या माध्यमातून वैज्ञानिक संघर्षाची कहाणी; श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलला विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक*
*नाशिक येथे झालेल्या विभागीय विज्ञान नाट्य स्पर्धेत १२ संघांमधून उल्लेखनीय यश*
विज्ञान हे केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता ते सर्वसामान्यांपर्यंत सोप्या, रंजक आणि प्रभावी माध्यमातून मराठीतून पोहोचावे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि संशोधनाची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने *मराठी विज्ञान परिषद, मुंबई* यांच्या वतीने विज्ञान प्रयोग, विज्ञान खेळणी, निबंध आणि विज्ञान नाट्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
याच उपक्रमांतर्गत यावर्षीच्या विज्ञान नाट्य स्पर्धेसाठी शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन, त्यांनी लावलेले शोध आणि त्या प्रवासातील आव्हाने, अडचणी व संघर्ष यांचे कथानकाच्या माध्यमातून नाट्यीकरण हा विषय देण्यात आला होता.या स्पर्धेच्या नाशिक, जळगाव आणि धुळे विभागाची विभागीय स्पर्धा दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल विभागातील विद्यार्थ्यांनी भारतातील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. कमला सोहनी यांच्या जीवनकार्यावर आधारित नाटिका अत्यंत प्रभावीपणे सादर करून विभागातून तृतीय क्रमांक प्राप्त केला.*डॉ. कमला सोहनी यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीतील संघर्ष, संशोधनाची जिद्द, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती आणि ज्ञान-विज्ञानासाठीची निष्ठा* विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून प्रभावीपणे उभी केली.बालकलाकारांनी केलेले भावपूर्ण अभिनय, संवादफेक, प्रसंगांची मांडणी आणि समूहसादरीकरण यामुळे नाटिकेला विशेष प्रभाव प्राप्त झाला. विज्ञानाचा विषय मनोरंजक पद्धतीने मांडत विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांपर्यंत वैज्ञानिक विचार पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.या नाटिकेचे अभ्यासपूर्ण लेखन विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री. धनंजय वकील यांनी केले, तर श्रीमती सुलभा सोमपुरे यांनी प्रभावी दिग्दर्शन केले. विषयाचा सखोल अभ्यास करून त्याचे रंगमंचीय रूपांतर करणे, विद्यार्थ्यांकडून सातत्याने सराव करून घेणे आणि उत्कृष्ट सादरीकरणासाठी त्यांना मार्गदर्शन करणे यासाठी दोन्ही शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचा या यशात महत्त्वाचा वाटा आहे.
या नाट्यसंघात सात विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा सहभाग होता.
विज्ञानाला नाट्यकलेची जोड देत प्रशालेतील बाल कलाकारांनी एका मोठया रंग मंचावर आपली कला आणि कौशल्य सादरीकरण केले.
सहभागी बाल कलाकार आणि मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन !!! 🌹🌹

10/09/2026

*६५ वर्षांच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक प्रवासाचा गौरव; संस्कृती संवर्धन मंडळास ‘आदर्श शिक्षण संस्था’ पुरस्कार*
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या वतीने संस्कृती संवर्धन मंडळ, शारदानगर, सगरोळी, जि. नांदेड या संस्थेस ‘आदर्श शिक्षण संस्था’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा हा विशेष गौरव आहे.आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिवचे संस्थापक गुरुवर्य के. टी. पाटील (बप्पा) यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त तसेच संस्थेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त *शिक्षण प्रेरणा महोत्सव* आयोजित करण्यात आला आहे. दि. ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या महोत्सवात मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० नामवंत शिक्षण संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या मानाच्या पुरस्कारासाठी संस्कृती संवर्धन मंडळासह बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर; योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई; ज्ञानोपासक शिक्षण मंडळ, परभणी; मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर; मराठवाडा सर्वोदय प्रसारक मंडळ, परतूर; नूतन शिक्षण समिती, सेलू; शारदाभुवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड; किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर; जन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर आदी संस्थांचा समावेश आहे.
मा. ना. श्री. प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, धाराशिव आणि मा. ना. श्री. योगेश कदम, गृह राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
गत ६५ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थी विकास, संस्कारक्षम शिक्षण, सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक नवोपक्रम आणि समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने व प्रभावीपणे राबविणाऱ्या संस्कृती संवर्धन मंडळाच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.अभिनंदन!!!💐💐

*कलेच्या वाटेवर राष्ट्रीय भरारी; श्री. गोविंद बोधनकर यांची CCRT राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड*Centre for Cultural Resour...
08/09/2026

*कलेच्या वाटेवर राष्ट्रीय भरारी; श्री. गोविंद बोधनकर यांची CCRT राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड*
Centre for Cultural Resources and Training (CCRT) ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली देशातील नामांकित राष्ट्रीय संस्था असून, शिक्षण आणि संस्कृती यांची सांगड घालण्याच्या उद्देशाने *Linking Education with Culture* या संकल्पनेवर सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय कला, संस्कृती, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाविषयी जाणीव निर्माण करण्यासाठी CCRT विविध प्रशिक्षण, कार्यशाळा, अभिमुखता सत्रे आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करते.*दि. 23 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2026 दरम्यान CCRT मुख्यालय, द्वारका, नवी दिल्ली* येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील 520 व्या Orientation Session साठी महाराष्ट्र राज्यातून केवळ तीन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या मानाच्या निवडीत श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल विभागातील नृत्य विभाग प्रमुख श्री. गोविंद बोधनकर यांची निवड झाली आहे, ही शाळेसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.
या राष्ट्रीय प्रशिक्षणामध्ये देशातील विविध राज्यांच्या सांस्कृतिक वारशाची देवाणघेवाण, लोककला, नृत्य, नाट्य, संगीत तसेच शिक्षण आणि संस्कृती यांचा समन्वय यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चा सत्रे होणार आहेत. विविध राज्यांतील शिक्षक व कला-संस्कृती क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी या प्रशिक्षणातून मिळणार आहे.मागील चार-पाच वर्षांपासून नृत्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या श्री. गोविंद बोधनकर यांनी आपल्या कलात्मक कौशल्यातून आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळेच्या सांस्कृतिक कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक उपक्रमामधील विद्यार्थ्यांचा सहभाग ही त्यांच्या कार्याची विशेष जमेची बाजू राहिली आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देत श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल विभागाला सांस्कृतिक क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी हे प्रशिक्षण निश्चितच प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरेल.
संस्था परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!!🌹🌹🌹

*विद्यार्थ्यांच्या हाती शाळेची धुरा; स्वयंशासनातून नेतृत्वाचा अनुभव*   जबाबदारी स्वीकारत विद्यार्थ्यांनी अनुभवले शाळा प्...
05/09/2026

*विद्यार्थ्यांच्या हाती शाळेची धुरा; स्वयंशासनातून नेतृत्वाचा अनुभव* जबाबदारी स्वीकारत विद्यार्थ्यांनी अनुभवले शाळा प्रशासन व अध्यापनाचे वास्तव विश्व
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हायस्कूल विभागामध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय प्रशासन, नेतृत्व, निर्णयक्षमता, नियोजन आणि अध्यापन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.या दिवशी विद्यार्थ्यांनी सपोर्ट स्टाफपासून मुख्याध्यापकापर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या अत्यंत आत्मविश्वासाने आणि जबाबदारीने पार पाडल्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका म्हणून कु. ऐश्वर्या तमशेट्टे यांनी प्रभावीपणे जबाबदारी सांभाळली. विद्यार्थी-शिक्षकांनी विविध वर्गांमध्ये अध्ययन-अध्यापनाचे कार्य अत्यंत आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी पद्धतीने केले. अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक साधने व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर केला.
यावर्षी प्रथमच राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय आणि मिलेनियम द कन्सेप्ट स्कूल येथील इयत्ता दहावीचे विद्यार्थी-शिक्षकही हायस्कूल विभागात सहभागी झाले. त्यांनी वर्गांमध्ये उत्कृष्ट अध्ययन-अध्यापन करत या उपक्रमाला विशेष व्यापकता दिली. त्यांच्या अध्यापनाचे पाठनिरीक्षण करण्यात आले असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी-शिक्षकांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.
या उपक्रमात १०० पेक्षाही अधिक विद्यार्थी-शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. ज्युनिअर कॉलेजमधील व्यवसाय अभ्यासक्रमातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनीही अध्ययन अध्यापनाचा अनुभव घेतला. दिगंबर तवटे यांनी विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संवादकौशल्य, वेळेचे नियोजन, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची जाणीव विकसित करण्यासाठी स्वयंशासन दिन निश्चितच एक प्रेरणादायी अनुभव ठरला.

*श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचा राष्ट्रीय स्तरावरील GenCAN उपक्रमात सहभाग**Climate Action Leadership Challenge*GenCAN (G...
31/08/2026

*श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचा राष्ट्रीय स्तरावरील GenCAN उपक्रमात सहभाग*

*Climate Action Leadership Challenge*

GenCAN (Generation for Climate Action) हा HCL Foundation आणि CEE (Centre for Environment Education) यांच्या पुढाकाराने राबविला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना हवामान बदलाच्या समस्येबाबत जागरूक करून कृतीशील पर्यावरण नेतृत्वासाठी सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
*उपक्रमातील चार प्रमुख आव्हाने*
• हवामान बदल म्हणजे काय?
• हवामान का बदलत आहे?
• बदलत्या हवामानाचे परिणाम काय आहेत?
• हे परिणाम कमी करण्यासाठी काय करता येईल?
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचा सक्रिय सहभाग :
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त परिसर, ऊर्जा बचत यांसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच इतर विद्यार्थ्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले.
*शाळेचा कृती आराखडा* (Action Plan) :

१. *ऊर्जा संवर्धन* : वीज वापराचे ऑडिट, अनावश्यक दिवे-पंखे बंद करणे, LED बल्ब व सौर ऊर्जेचा वापर.

२. *कचरा व्यवस्थापन* : ओला-सुका कचरा वर्गीकरण, पालापाचोळ्यापासून गांडूळखत निर्मिती आणि एकेरी वापराच्या प्लास्टिकला प्रतिबंध.

३. *जलसंधारण* : पाण्याची गळती त्वरित रोखणे आणि वाया जाणाऱ्या पाण्याचा बागेसाठी पुनर्वापर.

४. *वृक्षारोपण व जैवविविधता* : स्थानिक वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन व संवर्धन.

उपक्रमाचे महत्त्व :
नेतृत्वगुण : विद्यार्थी स्वतः बदलाचे नेतृत्व करतात.
सहकार्य :शिक्षक व विद्यार्थी एकत्रितपणे पर्यावरणीय समस्या सोडवतात.
जागरूकता : जागतिक हवामान समस्यांवर स्थानिक पातळीवर कृतीशील उपाय शोधले जातात.
*राष्ट्रीय स्तरावरील सहभाग*:
CEE आणि HCL Foundation यांनी 2023 मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली. तेव्हापासून 1,238 शाळांनी सहभाग नोंदविला आहे. 2026-27 मध्ये भारतभरातील 250 शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे कौतुक.
या उपक्रमात सहभागी झालेल्या आठ विद्यार्थ्यांना आज प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पाचे मेंटोर म्हणून श्री. प्रमोद भंडारे मार्गदर्शन करीत आहेत.

🌿 संस्कारांची शिदोरी देणाऱ्या गुरुवर्य श्री मुकुंद महाराज यांचा पदनिवृत्ती कार्यगौरव संपन्न संस्कृत भाषेचे गाढे ज्ञान, व...
31/08/2026

🌿 संस्कारांची शिदोरी देणाऱ्या गुरुवर्य श्री मुकुंद महाराज यांचा पदनिवृत्ती कार्यगौरव संपन्न

संस्कृत भाषेचे गाढे ज्ञान, वैदिक संस्कृतीवरील निष्ठा आणि आधुनिक काळातील बदल आत्मसात करण्याची वृत्ती यांचा सुंदर संगम म्हणजे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, सगरोळी येथील संस्कृत विषयाचे अध्यापक श्री. मुकुंद महाराज सर.

आज त्यांच्या पदनिवृत्ती निमित्त कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

मुकुंद महाराज सरांची सगरोळीच्या शैक्षणिक परिवाराशी जोडलेली नाळ एका विशेष प्रसंगातून जुळली. माणिकनगर येथील एका कार्यक्रमात कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी महाराज सरांना पाहिले. संस्कृत विषयातील त्यांचे ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांची तेथेच थोडक्यात मुलाखत घेतली आणि सगरोळीच्या शाळेत रुजू होण्याची विनंती केली. त्या भेटीतून सुरू झालेला हा प्रवास तब्बल १९९९ ते २०२६ असा प्रदीर्घ राहिला.

या सेवाकाळात महाराज सरांनी आपल्या मूल्यांशी आणि तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. वैदिक संस्कृतीचे आचरण आणि परंपरांचे जतन करतानाच बदलत्या काळातील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शैक्षणिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडण्याचे दुहेरी भान त्यांनी जपले.

त्यांच्या कार्याचे आणखी एक प्रेरणादायी वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते स्वखर्चातून आपल्या घरीच वेदपाठशाळा चालवत आहेत. चार-पाच विद्यार्थ्यांना वैदिक शिक्षण देत भारतीय ज्ञानपरंपरेची ही ज्योत ते सातत्याने तेवत ठेवत आहेत.

आजच्या कार्यगौरव सोहळ्यात संस्थेचे विश्वस्त, शाळेतील सहकारी आणि कुटुंबीयांनी महाराज सरांच्या जीवनातील वेचक प्रसंग, आठवणी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडून सांगितले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा, साधेपणाचा, संस्कृतप्रेमाचा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्याचा गौरव करण्यात आला.

शिक्षक निवृत्त होतो; पण त्याने दिलेले संस्कार, ज्ञान आणि मूल्ये कधीच निवृत्त होत नाहीत.

महाराज सरांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला मनःपूर्वक सलाम!
त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरामय आरोग्य, आनंद, समाधान आणि समृद्धीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌿

#कार्यगौरव #पदनिवृत्ती #मुकुंदमहाराज #संस्कृत #वैदिकसंस्कृती #गुरुवर्य #शिक्षक #सगरोळी #संस्कार

*हायस्कूल विभागात रंगला लोकशाहीचा उत्सव -  प्रत्यक्ष अनुभव घेत ४४१ विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क*विद्यार्थ्यांमध्...
29/08/2026

*हायस्कूल विभागात रंगला लोकशाहीचा उत्सव - प्रत्यक्ष अनुभव घेत ४४१ विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क*
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण व्हावी, तसेच भविष्यातील निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा या उद्देशाने हायस्कूल विभागात बालसंसद प्रतिनिधी अंतर्गत विद्यार्थी सचिव पदासाठी निवडणूक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.या निवडणुकीचे उद्घाटन श्री. प्रभाकरराव यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व सरपंच प्रतिनिधी श्री. बाबुराव वडेटलू तसेच पालक प्रतिनिधी श्री. माधव बोडके उपस्थित होते. सकाळी ९.३० वाजता मतदानास सुरुवात झाली.बालसंसद विद्यार्थी सचिव पदासाठी ६ विद्यार्थी उमेदवार आणि NOTA (None of the Above) असे एकूण ७ पर्याय मतदारांसमोर होते. एकूण ५५० मतदारांपैकी ४४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २४९ पुरुष आणि १९२ महिला मतदारांचा समावेश असून एकूण मतदानाची टक्केवारी ८०.१८% इतकी राहिली.या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ मतदार म्हणून सहभागी करून न घेता संपूर्ण लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. इयत्ता ५ वी ते १० वीच्या बालसंसद मंत्रिमंडळातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्था पदाधिकारी व सहकारी अशा विविध घटकांनी मतदान करून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन दिले.निवडणुकीपूर्वी सर्व विद्यार्थी उमेदवारांनी उत्साहाने प्रचार केला. त्यांनी आपापली मतदान चिन्हे, विचार आणि पुढील वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती मतदारांसमोर मांडली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची क्षमता विकसित होण्यास मदत झाली.वयाच्या १८ वर्षांनंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणारा अनुभव विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच मिळावा, या जाणीवपूर्वक उद्देशाने इयत्ता ५ वी ते १० वीच्या बालसंसद मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. मतदान करणे, उमेदवारांचे विचार समजून घेणे, योग्य प्रतिनिधी निवडणे आणि लोकशाही प्रक्रियेचा आदर करणे, या मूल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
या लोकशाही प्रक्रियेत संस्थेचे चेअरमन श्री. प्रमोदजी देशमुख, सचिव श्री. डॉ. जयंत जकाते, प्राचार्या श्रेया ताई देशमुख आदी मान्यवरांसह संस्था कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. NCCच्या विद्यार्थ्यांनीही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी प्रोसिडिंग ऑफिसर अनुष्का शिवपुजे तसेच त्यांचे सहकारी अथर्व रामगिरवार, दीपिका खरबुजे, अदिती बंडगर आणि राजश्री कस्तुरे यांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. तसेच श्री. गोविंद बोधनकर, श्री. प्रदीप जाधव, श्री. साईनाथ जोरगेलवार, श्री. मनोज गरबडे आणि इतर इतिहास विषयाच्या अध्यापक सहकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.निवडणुकीचा निकाल सोमवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी जाहीर करण्यात येणार आहे.

28/08/2026

Address

SSM' Sharda Nagar, Sagroli Nanded
Nanded
431731

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri. Chhatrapati Shivaji High School Sagroli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri. Chhatrapati Shivaji High School Sagroli:

Shortcuts

Share