Oxford English Medium School Dabhad Nanded

Oxford English Medium School Dabhad Nanded Oxford English Medium school for Development
Schooling with fun Affiliated to govt of maharashtra.

16/03/2024

Annual Gathering 2024

16/03/2024

Annual Gathering 2024

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची ताकत.स्वातंत्र्य पूर्व काळ असा होता जिथे जात आणि धर्माचा पगडा मानवी मनावर धर्ममा...
14/04/2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची ताकत.
स्वातंत्र्य पूर्व काळ असा होता जिथे जात आणि धर्माचा पगडा मानवी मनावर धर्ममार्तंड लोकांनीं खोल बिंबविला होता.
जिथे माणूस माणसाकडे तुच्छतेने पाहायचा .
माणसाचा माणसाला विटाळ व्हायचा .
धर्मपुरोहितांचा शब्द हाच प्रमाण .
दलित आणि वंचित यांची सावली अंगावर पडली तरी विटाळ. तर स्पर्श झाल्याने काय होईल याचा विचार न च केलेला बरा.
वेद मंत्रोच्चार चा ध्वनी चुकून कानावर पडला तर कानात तप्त शिसे ओतले जायचं .
समाजात विषमतेचे बीजे पिढ्यानपिढ्या खोल रुजवली गेली होती .
चार वेद, सहा शास्त्र ,अठरा पुराण यातील लिखाण मानवी मनात सामाजिक विषमता निर्माण करणारे ,पिढ्यानपिढ्या रुजविणारे ग्रंथ.
आणि या सामाजिक विषमतेला तडा देण्याचं ,सामाजीक विषमतेचे साखळदंड तोडण्याचे काम केले ते फक्त एका संविधानाने .
ज्यात लिहिले गेले
माणूस हा एक च आहे .
सर्व समान आहेत .
तो धर्मनिरपेक्ष आहे .
तो जातीविरहित आहे
स्त्री आणि पुरुष हीच जात आहे
तो फक्त आणि फक्त भारतीय आहे .
जिथे सर्व एकत्र येऊ शकतात,
एकत्र नांदू शकतात ,
प्रत्येकास समान हक्क आणि अधिकार
दिले गेले
एकाच संविधानाने .
मानवी मनावर खोलवर रुजविलेली विषमता दूर केली
एका संविधानाने
स्त्री पुरुष एक केला
एका संविधानाने
माणूस एक केला
एका संविधानाने
जातीविरहित समाज निर्माण केला
एका संविधानाने
देशाच्या सर्वोच्च पदी दलितास बसविले
एका संविधानाने
जिथे सावलीचा विटाळ होत होता तो दूर केला
एका संविधानाने
डॉ बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितच मानले जायचे आणि त्यांना तसे बनवून त्यांची उंची कमी करण्याचे काम जाणीवपूर्वक केले गेले .पण त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचे विचार एवढे महान होते की धर्मपुरोहित लोकांचे विचार शेवटी ठेंगणें पडले.
आज सर्व जाती धर्मातील लोक बाबासाहेबांना वंदन करतात
त्यांच्या विचारांना अभिवादन करतात .
त्यांच्या विचारांचे स्टेटस ठेवतात त्यांची महती सांगतात ज्यात त्यांना कमीपणा वाटत नाही तर गौरव वाटतो .
धर्मपुरोहितांनी ज्यांना अस्पृश्य मानले त्यांच्या विचारांची जयंती सर्व जातीधर्मातील लोक एकत्र येऊन साजरी करतात .
जगाला दाखवून देतात की आम्ही धार्मिक नाही तर भारतीय आहोत .
हाच खरा संविधानाचा विजय
हीच खरी संविधानाची टाकत .
जयभीम जय भारत
✍️रवींद्र सूर्यवंशी
प्राचार्य
ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल दाभड .

https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nanded/the-tallest-ashoka-pillar-in-the-country-is-being-erected-at-...
28/01/2021

https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nanded/the-tallest-ashoka-pillar-in-the-country-is-being-erected-at-mahavihar-bawri-nagar-nanded/mh20210128180411759

*Nagorao Bhange*
*Etv Bharat, Nanded*
✍🏻🎥✍🏻🎥✍🏻🎥✍🏻
दाभड येथील महाविहार बावरी नगर मध्ये उभारण्यात येत आहे 65 फूट उंच भारतातील सर्वात उंच अशोक स्तंभ ह्याची माहिती ETv भारत ला मुलाकतीतून मी दिली .

भारताशिवाय श्रीलंका, मॅनमार व चीन ह्या देशात याप्रकारचे अशोक स्तंभ आहेत. पण एवढ्या उंचीचा अशोक स्तंभ कोठेही नाही.....

शिष्यवृत्ती परीक्षा 2019 .20.ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल दाभड चे यश---------------------------------------------💐💐💐💐💐💐💐💐💐क्ला...
12/10/2020

शिष्यवृत्ती परीक्षा 2019 .20.
ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल दाभड चे यश
---------------------------------------------
💐💐💐💐💐💐💐💐💐
क्लास 5 th
1)मानव राजकुमार भिसे
2)सृष्टी रवींद्र सूर्यवंशी
क्लास 8 th
1)मधुरारानी श्यामसुंदर पांचाळ
शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र .
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन .
💐💐💐💐💐💐💐💐

💐💐अभिनंदन 💐💐ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल दाभड च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश .मानव राजकुमार भिसे नवोदय विद्यालय परीक्षेत पास ....
19/06/2020

💐💐अभिनंदन 💐💐
ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल दाभड च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश .

मानव राजकुमार भिसे
नवोदय विद्यालय परीक्षेत पास .💐💐💐

हळदी कुंकू आणि महिला पालक मेळावा .
07/04/2020

हळदी कुंकू आणि महिला पालक मेळावा .

Funfair 2020
07/04/2020

Funfair 2020

Address

Dabhad Tq Ardhapur Dist Nanded
Nanded
431745

Telephone

+919923833183

Alerts

Be the first to know and let us send you an email when Oxford English Medium School Dabhad Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category