05/08/2023
प्राथमिक शाळेत बालपंचायत अंतर्गत शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक...
आज दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी प्राथमिक शाळेत होऊ घातलेल्या बाल पंचायत अंतर्गत मुख्यमंत्री पदासाठी निवडणुक घेण्यात आली. सगरोळी गावचे
उपसरपंच श्री. विश्वनाथ महाजन यांच्या शुभहस्ते उदघाटन करून मतदानास सकाळी 8.40 मि. सुरुवात करण्यात आले.
समाजात एक जबाबदार नागरिक होण्यासाठी आणि प्रत्यक्षात 18 वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया कशी असते याचा प्रात्याक्षिक द्वारे इ.4 थी ते 7 वी च्या मुलांना मतदान करण्याचे अधिकार देण्यात आले होते.
या प्रक्रियेमध्ये संस्थेतील विविध पदांवर असलेले कर्मचारी, पालक व वर्ग 4 थी ते 7 वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी मिळून 409 एवढे मतदान झाले.आजच मतदानानंतर दुपारी 1 वा निकाल जाहीर करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणून कु.स्वराली कैलास खासबागे (122 मते), तर उपमुख्यमंत्री म्हणुन गौरव लखमाजी आवरूल (99 मते) मिळवून विजयी झाले आहेत.
संस्थेचे चेअमन मा. श्री. प्रमोद देशमुख (आ.आण्णा) यांनी नवनिर्वाचित शालेय मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाला नियोजन करुन काम करा अशा शुभेच्छा दिल्या आहेत. पुढील वर्षभरात या मंत्रीमंडळाकडून शालेय व्यवस्थापणात शालेय शिस्त,स्वच्छता आणि मुलांच्या कही अडचणी वर योग्य अमलबजावणी करु असे निवडून आलेले विद्यार्थी प्रतिनिधिनी सांगितले.