02/09/2024
*पालकांकडून मिळणारा अपुरा वेळ (Lack of Time)*
मुलांना असुरक्षितता वाटण्याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे आई-वडिलांकडून योग्य प्रकारे वेळ न मिळणे. मुलांना वेळ न दिल्याने त्यांना त्यांच्यामनात असलेल्या विविध भावना, प्रश्न तसेच त्यांच्या आवडी निवडी प्रकट करता येत नाहीत. त्यांना विविध गोष्टींची माहिती सुद्धा मिळत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे मुले स्वतः ला एकटे समजून इतरांपेक्षा असुरक्षित समजतात.
If you give time; ; you will be child's favorite toy..
एका छोट्याशा गोष्टीवरुन हे स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न केला आहे. एका श्रीमंत कुटुंबामध्ये आई-वडील व त्यांचा एक लहान मुलगा असतो. कुटुंब श्रीमंत आहे म्हणजेच व्यवसायही मोठा व त्यानुसार वडील नेहमी व्यस्त असत. मुलाची व बाबांची भेट कधी कधी तेही गडबडीत किंवा व्यस्त असतानाच होत होती. “आपले बाबा नेहमी उशिरा येतात व आपल्याला केव्हाही भेटत नाहीत त्यासाठी आपण काय करावे?" असा विचार मुलाला नेहमी येत होता. त्यानुसार बाबाला धावत्या भेटेत विनवणी केली की "बाबा मला तुमच्या सोबत गप्पा माराव्या व खेळावसं वाटतं पण तुम्ही मला भेटतच नाहीत!" असे ऐकल्यावर बाबा म्हणाले, "बेटा आपला फार मोठा व्यवसाय आहे, मला सतत काम करावं लागतं, मी रात्री येतो तेव्हा तू झोपलेला असतोस, ओ.के..... नंतर खेळूया हं......! सॉरी बेटा, ओ.के. बाय" असे म्हणून बाबा निघून जातात. मुलगा दुःखी अंतःकरणाने विचार करून या विचारावर येतो की काही करायचे पण आज रात्री बाबा सोबत खेळायचे. तो दररोज रात्री बाबांची वाट पहायचा पण काळी वेळात त्याला झोप लागायची. बाबांची व त्याची भेट अखेरीस चार पाच दिवसाच्या प्रयत्नानंतर झाली.
त्यावेळी मुलगा काहीच बोलत नव्हता म्हणून बाबा म्हणाले, 'काय रे काय झाले झोपला नाहीस ?" मुलगा उत्तरला "नाही बाबा आज तुम्हाला भेटावे असे ठरवलेच
होते".
बाबा, "हां. बोल काय म्हणतोस ? "
मुलगा म्हणाला, “बाबा तुम्ही दर महिना किती रूपये कमावता..?* बाबा, “बेटा, ते निश्चित सांगता येणार नाही पण एक ते दीड लाख
रूपये प्रति महिना....!
मुलगा, “म्हणजे बाबा अंदाजे तीन हजार रूपये दररोज... ?” असे बोलत बोलत त्या मुलाने स्वतःचा पैसे भरलेला गल्ला बाबांच्या हातात दिला व बोलू लागला....
"बाबा हे पैसे घ्या एवढे मोजून जेवढा वेळ होईल किंवा देता येईल
तेवढा वेळ द्या. प्लीज माझ्या सोबत खेळा ना...!” आणि