NandedInfo

NandedInfo Nanded - Sale | Puchase | Rent | Jobs | Business| Advertisement

हवामान खात्याचा इशारा 17 व 18 जुलै रोजी यलो अलर्ट जारी नांदेड, दि. 16 जुलै :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी...
16/07/2026

हवामान खात्याचा इशारा 17 व 18 जुलै रोजी यलो अलर्ट जारी

नांदेड, दि. 16 जुलै :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 17 व 18 जुलै 2026 रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. 17 व 18 जुलै रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आकाशात विजा चमकत असल्यास

या गोष्टी करा :
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका:
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

Premium property on sale- bhaisa-kinwat highway. Contact directly to saler. Click on following link image.
08/06/2026

Premium property on sale- bhaisa-kinwat highway. Contact directly to saler. Click on following link image.

Category: Shop-Office; Listing Purpose: Sale; Vendor: info.

🏡HomePlotLand.com - विक्री किंवा भाड्याने देण्यासाठी  मालमत्ता लिस्ट करा! Free घर, फ्लॅट, प्लॉट किंवा जमीन – Post Your P...
08/06/2026

🏡HomePlotLand.com - विक्री किंवा भाड्याने देण्यासाठी मालमत्ता लिस्ट करा! Free
घर, फ्लॅट, प्लॉट किंवा जमीन – Post Your Property for Sale or Rent

✅ आजच साइन अप करा: https://homeplotland.com/sign-in/

🕒 मोफत लिस्टिंग
💡 फायदे:
काही मिनिटांत लिस्टिंग तयार करा
हजारो संभाव्य खरेदीदार आणि भाडेकरूंपर्यंत पोहोच
घर, फ्लॅट, प्लॉट किंवा जमीन – विक्री, खरेदी किंवा भाड्याने
🚀 सुवर्णसंधी गमावू नका – आजच HomePlotLand.Com वर लिस्ट करा!
.Com



29/04/2026
29/03/2026

जिल्हाधिकारी कार्यालयात गॅस एजन्सीधारक व सेल्स ऑफिसर्स यांच्यासोबत बैठक संपन्न गॅस वितरकांना महत्वाचे निर्देश ; प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

नांदेड दि. 28 मार्च:- जिल्ह्यातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गॅस कंपन्यांचे सेल्स ऑफिसर्स आणि गॅस एजन्सी धारकांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत गॅस वितरकांना अत्यंत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहे.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि सूचना:

होम डिलिव्हरी बंधनकारक: सर्व गॅस एजन्सी धारकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत

ग्राहकांना एजन्सीवर बोलावून गॅस देऊ नये. ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर 'होम डिलिव्हरी' देणे बंधनकारक आहे.तसेच ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर 'होम डिलिव्हरी' साठी काही अडचण आल्यास त्यांनी त्यांच्या तालुक्यातील खालील प्रमाणे निरीक्षण अधिकारी ( नायब तहसीलदार पुरवठा ) यांचेशी संपर्क करावा.

संपर्क मो.क्रं.:- नांदेड-७०३०७७३०४०, अर्धापूर-८८०५०६८९५४, मुखेड- ९३५६८०६४०५, धर्माबाद-९४२१८४१४४७,मुदखेड- ९४४५११२७८२,उमरी- ८८०५४४७८३७,बिलोली- ७६२०७७९७०६,लोहा-९६५७२२४०४२,हिमायतनगर- ८३०८०७३०८९, हदगांव-८८०५०६८९५४, कंधार-९८२३७५७३४५, माहूर-९४०३१८४४७३, किनवट-९८५०२९६०९६, भोकर- ९४२११८३६०२, देगलूर-९४२३८०५०६४,नायगांव- ७०५७००२८६५

एजन्सीवर गर्दी टाळा: ग्राहकांनी गॅस सिलिंडर घेण्यासाठी एजन्सीवर गर्दी करू नये. बुकिंग केल्यानंतर लवकरात लवकर सिलिंडर घरपोच मिळेल, अशी चोख व्यवस्था करण्याचे आदेश वितरकांना देण्यात आले आहेत.

ग्राहकांना आवाहन: जिल्ह्यातील सर्व गॅस ग्राहकांना आणि लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी गॅस एजन्सीवर गोंधळ न घालता संयम राखावा. आपण गॅस बुक केल्यानंतर तो आपल्या दारात पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची आहे. प्रशासनाच्या या नियोजनाला नागरिकांनी सहकार्य करावे.

घरबसल्या करा e-KYC:ज्या ग्राहकांची बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (e-KYC) प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी गॅस एजन्सीवर जाण्याची आवश्यकता नाही. ग्राहक आपल्या मोबाईलवरून खालील पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात:

मोबाईल ॲपद्वारे: १. सर्वप्रथम प्ले-स्टोअरवरून 'Aadhaar Face RD (Early Access)' हे ॲप डाऊनलोड करा.

त्यानंतर तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप डाऊनलोड करा:

* Indane: IndianOil ONE

* Bharat Gas: Hello BPCL

* HP Gas: HP Pay

या ॲपमधील 'Aadhaar e-KYC' पर्यायावर जाऊन आपला चेहरा स्कॅन करून पडताळणी पूर्ण करा.

थेटलिंक: ग्राहक https://www.pmuy.gov.in/e-kyc.htmlया लिंकवर जाऊनही माहिती घेऊ शकतात.

तसेच बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करतांना काही अडचण आल्यास आपण खालील कंपनीच्या सेल्स ऑफिसर यांचे संपर्क साधावा.

मनोजकुमार राणा, सेल्स ऑफिसर BPCL, मो.क्रं. 9130084746

जय सिंघ, सेल्स ऑफिसर IOCL, मो.क्रं. 9561366893

सचिनकुमार, सेल्स ऑफिसर HPCL, मो.क्रं. 9594820665

तरी जिल्ह्यातील गॅस पुरवठा साखळी पूर्णपणे कार्यान्वित असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
00000

🔗 **फेसबुक पेज लाईक करा:**https://www.facebook.com/KrushiMahotsavNanded**महाराष्ट्र शासन – कृषी विभाग**,**जिल्हा अधीक्षक...
07/03/2026

🔗 **फेसबुक पेज लाईक करा:**

https://www.facebook.com/KrushiMahotsavNanded

**महाराष्ट्र शासन – कृषी विभाग**,
**जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नांदेड** आणि **ATMA (Agricultural Technology Management Agency)** यांच्या संयुक्त विद्यमाने **कृषी महोत्सव 2026** चे आयोजन करण्यात येत आहे.

या महोत्सवामध्ये **शेतकरी तसेच महिला बचत गट (SHG)** यांच्याकडून तयार केलेली उत्पादने **थेट ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध** असणार आहेत.

येथे आपल्याला **ताजे शेतीमाल, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, तसेच घरगुती व हस्तनिर्मित उत्पादने** थेट **शेतकरी व महिला बचत गटांकडून खरेदी करण्याची उत्तम संधी** मिळणार आहे.

👍 **महोत्सवाच्या सर्व अपडेट्ससाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा!**

फेसबुक पेजवर आपल्याला मिळतील –
* महोत्सवाबाबत ताज्या सूचना व अपडेट्स
* **शेतकरी व महिला बचत गटांच्या थेट विक्री स्टॉल्सची माहिती**
* कृषी तज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम
* कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ व विशेष क्षण

📅 **दिनांक: 15 ते 17 मार्च 2026**
📍 **स्थळ: नांदेड, महाराष्ट्र**

चला, **शेतकरी आणि महिला बचत गटांना थेट पाठबळ देऊया — आणि उत्पादकांकडून थेट खरेदी करूया!**

#कृषीमहोत्सवनांदेड2026 #नांदेड #कृषीविभाग #शेतकरी #महिलाबचतगट :

Agriculture

🏡 विक्री, खरेदी किंवा भाड्याने देण्यासाठी  मालमत्ता लिस्ट करा! Free for one year Dipawali Offer घर, फ्लॅट, प्लॉट किंवा ज...
24/02/2026

🏡 विक्री, खरेदी किंवा भाड्याने देण्यासाठी मालमत्ता लिस्ट करा! Free for one year Dipawali Offer
घर, फ्लॅट, प्लॉट किंवा जमीन – सोपं, जलद आणि मोफत!

✅ आजच साइन अप करा: https://homeplotland.com/sign-in/

🕒 मोफत लिस्टिंग – !

💡 फायदे:

काही मिनिटांत लिस्टिंग तयार करा

हजारो संभाव्य खरेदीदार आणि भाडेकरूंपर्यंत पोहोच

घर, फ्लॅट, प्लॉट किंवा जमीन – विक्री, खरेदी किंवा भाड्याने

🚀 सुवर्णसंधी गमावू नका – आजच HomePlotLand.Com वर लिस्ट करा!
.Com

Username or Email Address Password Remember Me Recover Password Don't have an account? Lost your password? Please enter your email address. You will receive a link to create a new password via email. E-mail Username * Email * Password* I agree to the Privacy & Policy * I agree with all terms & condi...

Address

Waghala Nanded
Nanded
431602

Alerts

Be the first to know and let us send you an email when NandedInfo posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to NandedInfo:

Shortcuts

Share