VMV Commerce, JMT Arts & JJP Science College, Nagpur

VMV Commerce, JMT Arts & JJP Science College, Nagpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VMV Commerce, JMT Arts & JJP Science College, Nagpur, School, VMV Commerce JMT Art and JJP Science College , Wardhman Nagar, Nagpur.

नांदेल सुख, शांती, आरोग्य घरातआगमन गौरीचे होईल उत्सवात..!गौरी पूजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!                  ...
18/09/2026

नांदेल सुख, शांती, आरोग्य घरात
आगमन गौरीचे होईल उत्सवात..!
गौरी पूजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

मानव्यशास्त्र विभागातर्फे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बी.ए. प्रथम वर्षाच्या  विद्यार्थ्यांसाठी डॉ. अमर बोंदरे आणि डॉ.सी...
17/09/2026

मानव्यशास्त्र विभागातर्फे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बी.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. अमर बोंदरे आणि डॉ.सीमा पांडे यांच्या नेतृत्वात स्क्रीनिंग टेस्ट Screening Test घेण्यात आली. सदर परीक्षेत बी.ए. प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ही परीक्षा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मानव्यशास्त्र विभागातील विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन प्राप्त झाले.
❤️💫 😎

On the Birth Anniversary ofSir Mokshagundam VishveshvarayaFor his Contribution in Building India Happy Engineers' Day   ...
15/09/2026

On the Birth Anniversary of
Sir Mokshagundam Vishveshvaraya
For his Contribution in Building India
Happy Engineers' Day
❤️💫 😎

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥गणेश उत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा...      ...
14/09/2026

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
गणेश उत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा...
#गणेशोत्सव #गणेशचतुर्थी ❤️💫 😎

कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्यायनाही हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्याबैलाचा सण पोळा...! बैलपोळा सणाच्...
10/09/2026

कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय
नाही हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या
बैलाचा सण पोळा...!
बैलपोळा सणाच्या शेतकरी बांधवांना मंगलमय शुभेच्छा...!
#बैलपोळा #पोळा #बैलपोळा२०२६ ❤️💫 😎

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!आपल्या...
05/09/2026

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या
जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!

आपल्या ज्ञानाने आणि संस्कारांनी समाज
घडवणाऱ्या सर्व आदरणीय शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा...! 🎓👨‍🏫🙏
#शिक्षकदिन ❤️💫 😎

गोकुळही फुलले रूप त्याचे पाहुनी,कृष्ण श्वास, कृष्ण ध्यास, कृष्ण अंतरी ॥श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभे...
04/09/2026

गोकुळही फुलले रूप त्याचे पाहुनी,
कृष्ण श्वास, कृष्ण ध्यास, कृष्ण अंतरी ॥
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
#श्रीकृष्णजन्माष्टमी #जन्माष्टमी #गोकुळाष्टमी #कृष्णजन्मोत्सव ❤️💫 😎

देशाला स्वावलंबी बनवण्यात, राष्ट्राचा आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीमध्ये लघुउद्योगांचा महत्वाचा वाटा आहे...!" ⚙️💼✨आपल...
30/08/2026

देशाला स्वावलंबी बनवण्यात, राष्ट्राचा आर्थिक
विकास आणि रोजगार निर्मितीमध्ये लघुउद्योगांचा
महत्वाचा वाटा आहे...!" ⚙️💼✨
आपल्या नावीन्यपूर्ण कल्पकतेने आणि अपार कष्टाने
देशाच्या प्रगतीची चाके फिरवणाऱ्या सर्व लघु
उद्योजकांना राष्ट्रीय लघु उद्योग दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा...! 🛠️📈🇮🇳
❤️💫 😎

या रक्षाबंधनाला हातावर बहिणीच्याफक्त राखी नाही, तर तिच्या स्वप्नांनाउंच भरारी देण्याची साथ बांधा.रक्षाबंधन निमित्त आपणां...
28/08/2026

या रक्षाबंधनाला हातावर बहिणीच्या
फक्त राखी नाही, तर तिच्या स्वप्नांना
उंच भरारी देण्याची साथ बांधा.
रक्षाबंधन निमित्त आपणांस व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!
#रक्षाबंधन ❤️💫 😎

महाविद्यालयातील मानव्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी मानव्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटन कार्यक्र...
25/08/2026

महाविद्यालयातील मानव्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी मानव्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने मानव्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे IQAC समन्वयक प्रा. नितीन गायकवाड, मानव्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अमर बोंदरे, कार्यक्रम संयोजक डॉ. अविनाश अवचट तसेच डॉ. पूजा पंड्या व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानव्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करून त्याचे उद्घाटन करण्यात आले. अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून कु. हेमलता वर्मा हिची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमर बोंदरे यांनी केले, यावेळी डॉ. पूजा पंड्या यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अभ्यास मंडळाची उद्दिष्टे, कार्यपद्धती व भविष्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन कु. लीना बुटले यांनी तर डॉ. अविनाश अवचट यांनी उपस्थित मान्यवर, विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला मानव्यशास्त्र विभागातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला.
❤️💫 😎

Address

VMV Commerce JMT Art And JJP Science College , Wardhman Nagar
Nagpur
440008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VMV Commerce, JMT Arts & JJP Science College, Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share