04/10/2024
#ग्रंथालयाबाबत विषेश #
छ.संभाजी नगर मधील जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माननीय सुभाष सोळंके, व कार्यवाह माननीय गुलाबराव मगर यांचे बेमुदत उपोषण व माननीय ग्रंथालय संचालक मुंबई यांचे त्यांना लिहलेले पत्र क्रमांक ३२/२०२४.२५/४४२८ दिनांक ०१/१०/२०२४ चे पत्राची ग्रंथालय चळवळीस दखल घेणे आवश्यक आहे. सर्व प्रथम त्यांचे सर्व चमुसह उपरोक्त महाविरांना मानाचा सलाम! पण ग्रंथालय संचालकाचे पत्रा बाबत नमूद करावयाचे म्हटलं तर त्यांचे लक्ष महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहायक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री यासाठी मान्यता) नियम १९७० व सन २०१२ मध्ये झालेल्या सुधारणाचे नियम २३ मध्ये अशी तरतूद आहे की, "ह्या नियमाखाली वर्ग अ, ब, क, आणि ड मान्यताप्राप्त ग्रंथालयाला अनुज्ञेय असलेली अनुदानाची रक्कम सामान्यतः दोन हप्त्यांत देता येईल - आगष्ट महिन्यामध्ये पहिला हप्ता व फेब्रुवारी महिन्यात अंतिम हप्ता देण्यात येईल अथवा राज्य शासनाने वेळोवेळी विनिर्दिष्ट केल्यानुसार त्या आधीच्या महिन्यात ही. याकडे आकर्षित करण्यात येत आहे. जेंव्हा एवढी स्पष्ट तरतूद असतांना, कोणत्याही कारणाने आमचा पहिला हप्ता आगष्ट मध्ये देय असतांना, अदा न करणे निर्णयाविरुद्ध धोरण आहे. काय नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ही ग्रंथालयीन कार्यकर्त्यांनीच आहे? नियमांचे तंतोतंत पालन करणे ही सुध्दा शासनाची, विभागाची जबाबदारी होय. आता कोणतेही आढेवेढे न घेता दसऱ्या पुर्वी ग्रंथालयांना अनुदानाचा पहिला हप्ता अदा करावा. एवढेही केलं तर खुप झाले.
हा झाला नियमांचा भाग, आता ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांविषयी विचार केला तर हे सर्वांना विदित आहे की, एक तर अतिअल्प पगार, तोही दोन हप्त्यांत, वाट पाहत असतात बिचारे, ना सणात, ना आजारात कामाला येतं बिचाऱ्यांच्या, व तिकडे आमचे सरकार कशानी देवू त्यांचा अस्मानी खेळ सुरु, कशानी ही ध्या, आमच्या हातात पडलं पाहिजे, मग तो नगद असो, चेक असो, युपीआय असो, व्हिपीडीए असो, जिल्ह्यातून भेटो, राजधानी तून भेटो, पण रक्कम तर तेवढीच असणार, वेळेवर भेटणे महत्वाचे! आता अशाप्रकारचा आमचा रेटा असणे आवश्यक आहे. पाहू किती शामिल होतात ते. शक्यता अनुभवता येते.
पहिला हप्ता तुरंत मिळावयास हवा. नाहीतर नियमांचे पुस्तक बाद करा. ना आम्हाला ना तुम्हाला!
कार्यवाह
नागपूर जिल्हा ग्रंथालय संघ
नागपूर ४४००२४
संपर्क मोबाईल ९१३०७९४५९०