14/01/2025
जय बाबाजी
*येवला तालुक्यातील नामांकित जय बाबाजी इंग्लिश मिडीयम स्कूल ची राज्यस्तरावर निवड*
"जय बाबाजी इंग्लिश मेडीयम स्कूलच्या जिज्ञासु वैज्ञानिकानी नाशिक जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावून राज्यस्तरीय निवड झाली असून पुढे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्यस्तरावर जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूल करणार आहेत .तसेच येवला तालुक्यात राज्यस्तरीय नाव कमवणारी पहिला मान जय बाबाजी इंग्लिश स्कूल ने हासील करत उत्तुंग कामगिरी केली........"
ओम शांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित जय बाबाजी इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यानी जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक,जिल्हा विज्ञान अध्यापक संघ दिंडोरी व श्री. किसनलालाजी बोरा इंग्लिश स्कूल वणी येथे आयोजित केलेल्या 52 वे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला.
सदर प्रदर्शनात वेगवेगळे गट करण्यात आले होते. त्यात उच्च प्राथमिक ( 6वी ते 8वी) गटात शाळेतली कु. ईश्वरी पुंड, कु. सृष्टी निकम, कु.पुजा हिंगे व साईराज गायकवाड यांनी *हाब्रिड सिस्टीम ऑफ वॉटर हिटर, एअर कुलर व वॉटर कुलर* हे मॉडेल ठेवले होते. या गटात एकूण 48 मॉडेल मध्ये यात विद्यार्थ्यानी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटाकावल्याने त्यांना ट्रॉफी, मेडल व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांची राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाली .यात विद्यार्थ्याना प्राध्यापक श्री. योगेश्वर महाजन सर यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण प्रसंगी मा. ना.श्री. सत्यजित तांबे विधान परिषद आमदार अध्यक्ष पदी होते , शिक्षणाधिकारी मा.श्री प्रवीण पाटील साहेब ,नशिक जिल्हा विज्ञान प्रदर्शन अध्यक्ष श्री.विनीत पवार, उपाध्यक्ष श्री.योगेश पवार, श्री किसंलाल बोरा एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष श्री.महेंद्रशेठ बोरा , श्री .किसनलाल बोरा इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका श्रीमती योगिता चिंचोले, आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यास आले तसेच त्यांचे अभिनंदन करून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे , यात स्वतः मंत्री.मा.ना. श्री. नरहरी झिरवाळ साहेब, मंत्री.मा.ना.श्री.पंकज भोयर साहेब, मंत्री. मा.ना.श्री. प्रविण दरेकर साहेब, माजी.उप मुख्यमंत्री मा.ना.श्री. छगनरावजी भुजबळ साहेब , येवला पंचायत समिती अधिकारी वर्ग व संस्थेचे अध्यक्ष राम जाधव सर व संस्थेचे सचिव श्री. ठकूनाथ जाधव सर , जय बाबाजी स्कुल संचालिका शितल जाधव मॅडम यांनी मुलांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यशात शाळेचे सर्व शिक्षकांचे खूप असे अनमोल मार्गदर्शन लाभले.