08/11/2023
आज मतिमंद निवासी शाळा दत्तनगर इंदापूर येथे दिशा अभियाना अंतर्गत दुसरी पालक सभा घेण्यात आली. सर्व पालकांनी यामध्ये सहभाग घेतला. सर्व पालकांना वर्गशिक्षकांनी दिशा अभियान प्रथम सञ रिपोर्ट कार्ड दिले. तसेच पाल्यांच्या प्रगती विषयी माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.तसेच मागील २ ते ३ दिवसापासून शाळेतील सर्व विध्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दिवाळी सणानिमित्त आकाश कंदील व पणत्या बनवणे हा उपक्रम राबविण्यात आला त्याची काही क्षणचित्रे.
07/09/2023
शाळेतील विद्यार्थी चि.तुषार रामचंद्र जगदाळे याचा सकाळ चित्रकला स्पर्धेतपुणे विभागातून प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल शाळेचे वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच कला शिक्षक श्री.अडसूळ सर यांचे चित्रकला स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचा ही सत्कार शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
08/08/2023
आज दिनांक 8/8/2023 वार - मंगळवार रोजी मतिमंद निवासी शाळा दत्तनगर इंदापूर येथे दिशा अभियाना अंतर्गत सन 2023 -24 या शैक्षणिक वर्षातील पहिली पालक सभा आयोजित केली होती त्यामध्ये प्रोजेक्ट द्वारे दिशा अभ्यासक्रम IEP ,वर्कबुक, मुलांसाठी निवडलेले होम गोल्स तसेच शाळेचे गोल्स इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली पालक सभेसाठी सर्व विद्यार्थी, पालक व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
29/06/2023
आज आषाढी एकादशी निमित्त मतिमंद निवासी शाळा इंदापूर या शाळेतील विध्यार्थ्यांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला 🚩🚩
21/05/2023
दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य चे आयुक्त मा.श्री.ओमप्रकाश देशमुख साहेब तसेच उपायुक्त मा.श्री.संजय कदम साहेब यांच्या सह उपस्थित मान्यवरांचे हस्ते आपल्या विद्यालयास दिशा अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल गौरविण्यात आले.
15/04/2023
सामाजिक न्याय पर्व सन 2023-24 या उपक्रमांतर्गत मतिमंद निवासी शाळा इंदापूर या शाळेत चित्रकला स्पर्धा व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या दरम्यानची काही क्षणचित्रे.
28/03/2023
कुशल संघटक, उत्तम वक्तृत्व, कर्तृत्वातून नेतृत्व सिद्ध करून समाजकारणातून सर्वमान्यता मिळवून राजकारणातून जातीयवादाचा ठसा मिटवून सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधीही न विसरणारे आमचे सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक आमच्या श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापुर (सं) मतिमंद व मूकबधिर निवासी शाळेचे अध्यक्ष मा श्री प्रदीप दादा गारटकर आपणांस
_*ઉदंड_आયુષ્યાच्या_अનંત_शुभेच्छा*_
_*꧁ 𝑯𝒂𝒑𝒑𝒚 𝑩𝒊𝒓𝒕𝒉𝒅𝒂𝒚꧂*_