The Vasai Files

The Vasai Files

Share

The Vasai Files | Exposing the cracks in the system | Vasai, Virar & Nallasopara deserves better.

14/01/2026

Go Vote!

11/01/2026

काय मग? “पूर्ण पॅनेललाच Vote करा” असे सांगितले जात आहे?
सावधान. हा तुमचा Vote मिळवण्याचा Game आहे.

महाराष्ट्रात एका Voter ला A, B, C, D असे 4 Votes द्यायचे असतात.
“पूर्ण पॅनेलला मत दिलं नाही तर Vote Count होणार नाही” हा फक्त Rumor आहे. असा कोणताही नियम नाही.

खरे Facts समजून घ्या
तुम्ही वेगवेगळ्या पक्षांच्या Candidates ला Vote देऊ शकता.
A, B, C किंवा D मध्ये ज्याला जास्त Votes मिळतील तोच Winner ठरतो. अख्खं पॅनेल एकत्र जिंकत किंवा हरत नाही.

रॅली आज आहे, उद्या संपेल.
चुकीची निवड केली तर त्रास 5 वर्षांचा.
It’s your finger, your choice.
जागरूक व्हा. Smartly मतदान करा.

10/01/2026

आता शब्द नको, पुरावा हवा!

नेहमी नेते जनतेला ‘आश्वासनं’ देतात, पण पहिल्यांदाच मी जनतेला ‘अधिकार’ देतोय! मी सुनील गुप्ता, प्रभाग १३-D चा उमेदवार, हे Legal Affidavit साईन करून तुम्हाला अधिकार देतोय की जर २४ महिन्यात कामं दिसली नाहीत, तर मला कायदेशीर जाब विचारा.

तुमच्या लाडक्या नेत्याला विचारून बघा—अशी लेखी गॅरंटी द्यायची हिंमत आहे का? मी पद आणि प्रतिष्ठा पणाला लावली आहे, कारण मला राजकारण नाही, विकास करायचा आहे!

सुशिक्षित विचारांना संधी द्या. यावेळेस फक्त मतदान करू नका, तर ‘जबाबदारी’ निवडा!

🗓️ मतदान: १५ जानेवारी 🗳️ चिन्ह: झाडू | अनुक्रमांक १ 🛠️ सुनील संजय गुप्ता



(Maharashtra, Elections, Aam Aadmi Party, BVA, BJP, ShivSena, MNS, Rahul Gandhi, Narendra Modi )

10/01/2026

“अरे भैय्या, UP ला जा...” — हे टोमणे मला खूप वेळा ऐकायला मिळाले.

पण सत्य हे आहे की माझे आजोबा १९७० मध्ये महाराष्ट्रात आले, वडील इथेच शिकले आणि मी सुद्धा याच मातीत लहानाचा मोठा झालो. माझे वडील दुकानात येणाऱ्या ग्राहकाची जात पाहत नाहीत आणि माझा डॉक्टर भाऊ रुग्णाचा प्रांत न पाहता त्यांची रात्र-अपरात्र सेवा करतो. मग आज मलाच “परकं” का ठरवलं जातंय?
मी हार मानणारा मावळा नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आज मी इथे उभा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मला लढण्याची प्रेरणा देतात.
या कठीण काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांचा मी मनापासून आभारी आहे. तुमच्या पाठिंब्यामुळेच मला ही ताकद मिळतेय. मी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी शेवटपर्यंत लढत राहीन!
जय हिंद. जय महाराष्ट्र!



( MNS, Elections, UP, Bihar, Bihari, Funny Videos, Viral Videos, Maharashtra, AAP, BJP, BVA)

09/01/2026

"आता प्रभाग १३-D चं गार्डन 'खंडर' नाही, तर 'शान' होणार!"

नुसतं 'बदल' बोलून होत नाही, तो प्लॅनिंगमध्ये दिसावा लागतो. आपल्या प्रभागातील बागांची सध्याची अवस्था काय आहे? जुनी तुटलेली जिम आणि उकिरडा! पण एक इंजिनिअर म्हणून मी तुम्हाला दाखवतोय की हेच गार्डन कसं असू शकतं.

छत्रपती शिवाजी महाराजांचं ३D म्युरल, सुरक्षित वॉकिंग ट्रॅक आणि मुलांसाठी बेस्ट प्ले एरिया—हे सगळं शक्य आहे! पण अडचण अशी आहे की, आपल्या नेत्यांना यात त्यांचं 'कमिशन' दिसत नाहीये. नकोय 'चहा-पाणी', आता फक्त हवंय आपल्या भागाचं 'व्हिजनरी प्लॅनिंग'.

बदलाची वेळ आली आहे!

प्रभाग १३-D च्या विकासासाठी... ३३ वर्षीय तरुण इंजिनिअरला कामावर ठेवा!



( Vasai, Nallasopara, Virar, Garden, Development, Beautification, Chatrapati Shivaji Maharaj, Play, Corruption, BJP, BVA ShivSena, Hitendra Thakur, Ksh*tij Thakur, Sneha Dube Pandit, Sunil Gupta )

09/01/2026

१,००० ची पैज लावतो... आपल्या भागातील ५०% लोकांकडे मेडिकल इन्शुरन्स नाही! 🚨🏥

आजारी पडलं की घरचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा कर्ज काढावं लागतं, हीच आपल्या प्रभाग १३ ची खरी शोकांतिका आहे. सरकारकडे करोडो रुपयांच्या योजना आहेत, पण त्या तुमच्या घरापर्यंत का पोहोचत नाहीत?

सरकारी योजनांचे फॉर्म भरणे आणि त्याचा पाठपुरावा करणे हे नगरसेवकाचे काम असते, पण हे काम कोणीच करत नाही. मी सुनील गुप्ता, वचन देतो की आपल्या प्रभागात एकही कुटुंब उपचाराअभावी मागे राहणार नाही.

हेल्थकेअर ही लक्झरी नाही, तो तुमचा हक्क आहे! 📄⚖️

प्रभाग १३-D च्या विकासासाठी... ३३ वर्षीय तरुण इंजिनिअरला कामावर ठेवा!

08/01/2026

राजकारणी खूप पाहिले, आता एक 'इंजिनिअर' कामावर ठेवून पहा!

प्रभाग १३ मधील प्रत्येक रस्ता, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक माता-भगिनीच्या आरोग्यासाठी माझ्याकडे एक तांत्रिक आराखडा तयार आहे. मला तुमची सत्ता नकोय, तर तुमच्या सेवेची संधी हवी आहे.

आता चिन्ह बघून नाही, तर व्हिजन बघून मतदान करा. १५ जानेवारीला अनुक्रमांक १ वर बटन दाबून बदलाचा भाग व्हा!

प्रभाग १३-D च्या विकासासाठी... ३३ वर्षीय तरुण इंजिनिअरला कामावर ठेवा!



( Vasai, Virar, Nallasopara, Manifesto, Ward 13 D, BMC, Election, Roads, Students, Health, BJP, BVA, ShivSena, Sneha Dube Pandit, Hitendra Thakur, Ksh*tij Thakur, Sunil Gupta )

07/01/2026

Why do we pay tax in Vasai, but travel to Mumbai for treatment?
If Mumbai can have high-tech government hospitals like KEM and Nair, why can’t Vasai-Virar? We pay our taxes, and it is our right to have modern healthcare infrastructure right here.
Healthcare isn’t a favor—it’s a service you’ve already paid for. As an Engineer, I believe in building a system that works for the people, not just on paper.
बदल घडवायचाच!
📍 प्रभाग १३-D च्या विकासासाठी... ३३ वर्षीय तरुण इंजिनिअरला कामावर ठेवा!


( Vasai, Virar, Nallasopara, Hospital, Medical, Scheme, BMC, Shivsena, BJP, BVA, AAP )

07/01/2026

It’s not the snake bite that kills; it’s a failed system.
The tragic loss of our brother in Wagholi wasn’t an accident—it was a failure of planning. It is shameful that in a city like Vasai-Virar, lives are lost because government centers lack basic Anti-venom.
They have crores for rallies, but zero for life-saving medicines. If they can’t manage a hospital’s stock, how can they protect your future?
Healthcare is my priority, not a poster. My guarantee: Every center in Ward 13-D will be stocked with Anti-venom and emergency kits. Period. 🩺🛠️
मी हार नाही मानणार!
📍 प्रभाग १३-D च्या विकासासाठी... ३३ वर्षीय तरुण इंजिनिअरला कामावर ठेवा!

Want your school to be the top-listed School/college?

Website