DMIT with Bright Future - Meet Your Destiny In One Touch

DMIT with Bright Future - Meet Your Destiny In One Touch

Share

We at Bright Future, help you to discover own hidden intelligence by the help of DMIT - Dermatoglyphic Intelligence Test.

05/10/2017

"कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरूकतेचा, वैभवाचा, उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव . शीतलता आणि सौदार्यता यांच्या शांतीरूप समन्वयाची अनुभूती. कोजागिरीचे जागरण हे जीवनातील सकारात्मकतेचे, सौम्यतेचे, सौदर्यनुभावच्या सजगतेचे कारण बनणे हीच या उत्सवाची सार्थकता "

""सर्व मराठी बांधवाना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Photos 04/04/2017

!! ब्राईट फ्युचर तर्फे श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

🙏🏻🌷 || श्रीरामनवमी || 🌷🙏🏻
-------------------------------------
रामनवमी हा चैत्र महिन्यातली शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्रीराम चंद्रांचा जन्म दिवस.

श्रीराम हे हिंदूधर्मीयांचे आदर्श अन्‌ लाडक दैवत. जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या र्निदालनासाठी, भगवान महविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार.

श्रीराम ह्यांचा अवतार झाला तो त्रेता युगांत. अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या - कौसल्या, सुमित्रा अन्‌ कैकयी ह्यांना एकच दुःख होते. त्यांना पुत्र संतान नव्हते. राजगादीला वारस नव्हता. राज्याला राजपुत्र नव्हते. आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथाने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञदेवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले. त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली. तो प्रसाद भक्षण केल्यावर तीनही राण्यांना पुढे उचित वेळी चार पुत्र झाले. त्या राजपुत्रांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली.

श्रीराम हे श्रीरामायण ह्या ग्रंथाचे नायक, एक आदर्श पुत्र-पति-बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष, प्रजा पालक. श्रीराम हे पितृवचन पालक, मातृभक्त, एकवचनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होय.

श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरुंच्या यज्ञांचे, धर्माचे संरक्षण केले. दुष्ट राक्षसांचा संहार केला. अहिल्येचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं. राजाजनकाच्या मिथिलानगरीत जाऊन शिव धनुष्याचा भंग केला. भुमीकन्या सीतेबरोबर विवाह केला. श्रीराम हे अयोध्येचे राजपद भुषवणार म्हणून सारी प्रजा आनंदांत असतानाच मातृ-पितृ आज्ञेचं पालन करीत त्यांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला. सीता हरणाच्या निमित्त्याने लंकाधिपती रावण आणि त्याची राक्षस सेना ह्यांचा वध केला.

मर्यादा पुरूषोत्तम हे श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य. श्रीरामाचे जीवन, त्यांची कर्तव्य निष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारं सारंच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय.

ह्या आदर्श देवाताराची आपल्याला सदैव आठवण रहावी तो आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे रामजन्माचे निमित्य. रामनवमी म्हणजेच राम जन्माच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, किर्तन, प्रवचन इ. कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. .

रामनवमीच्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. रामाची पूजा करताना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी बारा वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा राम जन्मोत्सव केला जातो. सुंठवडा वाटला जातो.

रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रम ही केले जातात.

श्रीराम ही सर्व अबाल वृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात. श्रीराम कथा ही जशी पावन तसेच प्रभू श्रीरामाचे नाव हे सुद्धा पापनाशक, संकट निवारक, भक्त रक्षक असे आहे. जर श्रीराम ह्या नाम लेखनाने पाण्यावर पाषाण तरले, तर श्रद्धा, भक्ती व निष्ठापूर्वक श्रीरामाचे नाम घेणारा नामधारक हा ह्या भवसागरी कां तरणार नाही? नक्कीच तरणार. मात्र त्यासाठी त्या श्रीरामाची मनःपूर्वक उपासना करायला हवी हे विसरून चालणार नाही.

राम म्हणता रामची होईजे !
पदी बैसुनी पदवी घेईजे ॥
ऐसे सुख वचनी आहे !
विश्वासे अनुभव पाहे ॥
राम रसाचीये चवी !
आन रस रुचती केवी ॥
तुका चाखोनी सांगे !
मज अनुभव आहे अंगे ॥

!! श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

🙏🙏🙏जय श्रीराम🙏🙏🙏

आपणा सर्वांवर प्रभू रामचंद्रजी सदैव कृपा ठेवोत आणि आपणांस पुढील काळात सुख, समृद्धी आणि समाधान लाभो हीच प्रभूंचरणी मन:पूर्वक प्रार्थना!!!!!

बोलो प्रभू रामचंद्र की जय!!!
पवनसुत हनुमान की जय!!
🔯✴❇🔯

Photos 09/02/2017

ओळखू कसे स्वतःला ?
सुधारू कसे व्यक्तिमत्व?
स्पर्धेच्या या युगात
माझी धाव कुठपर्यंत ?
या प्रश्नांचे एकच उत्तर .....
ब्राईट फ्युचर !
एक असं उत्तर, जे भविष्य घडवेल उत्तरोत्तर......!
नक्कीच आपलं आयुष्य होईल परफेक्ट ...
घेता एकदा प्रत्यक्ष भेट...!

26/11/2016

ताज हॉटेल
जळत होते
लाल रक्त
गळत होते
खरे भक्त
साळसकर
दूर शासना आळसकर
पुन्हा सव्वीस
अकरा नको
कसाब सारखा
छोकरा नको
नापाक पाकडे
भामटे होते
शर्थीने लढणारे
कामटे होते
तुकारामाने
कमाल केली
कसाब पकडून
धमाल केली
लढता -लढता
शहीद झाले
तेंव्हा आम्हाला
माहित झाले
नांगरे पाटलांचा
विश्वास होता
ताज हॉटेलचा
अभ्यास होता
आत शिरून
आतंकी मारले
ओलीस धरलेले
नागरिक तारले
नमन त्यांच्या
कार्याला आहे
सलाम त्यांच्या
शौर्याला आहे

🇮🇳🇮🇳२६/११ 🇮🇳🇮🇳
💐भावपूर्ण श्रद्धांजलि💐

Photos 22/09/2016

पालकांनो...🙏🏻
योग्यवेळी करा आपल्या मुलात अमुलाग्र सकारात्मक बदल😃
घडवा आपल्या मुलाचे उज्वल भविष्य त्याच्याच हातून.....🙌
* मुलातील कौशल्य कसे ओळखू...?
* आकलन शक्ती व समजूतदारपणा कसा ओळखू..?
* करिअर प्लॅनिंग कसे करु..?📝
* व्यक्तिमत्वात सुधारणा कशी करु..?
* फोकस कुठे, कधी व कसा करु..?🙇🎯
* अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी नेमकं काय करु..?
* वेळेचे व्यवस्थापन कसे करू..?
* मुलांच्या वाढत्या गरजा पूर्ण कश्या करू..?
* स्पर्धात्मक युगात मुलाचा विकास कसा करू..?
वरील सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देणारी एकमेव संस्था "ब्राईट फ्यूचर" घेऊन येत आहे "मोफत काउंसिलींग"
नोंदणीसाठी संपर्क करा📲 9820284136

Photos from DMIT with Bright Future - Meet Your Destiny In One Touch's post 22/09/2016

BE YOUR OWN BOSS

Photos from DMIT with Bright Future - Meet Your Destiny In One Touch's post 21/09/2016

Looking for Extra Income !!
Part Time Job !!!
(Work From Home)

Golden Earning Opportunity Guys !!
More You Work- More You Earn !!
Anyone can do this Job - Student, Businessmen, Working Professionals, Housewives

NO INVESTMENT
NO AGE LIMIT
ENGLISH SPEAKING NOT NECESSARY

Now Earn – Upto 20,000/- per month…
Join Us @ Bright Future
For more details: Contact us @9820284136

19/07/2016

ब्राईट फ्युचर तर्फे गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

व्यास पोर्णिमा....
म्हणजेच गुरूपोर्णिमा

आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात. कारण महर्षि व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत. महर्षि व्यासांचा जन्म या तिथीस झाला अशी एक कल्पना आहे. पण ती उचित नाही, कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदलेले नाही.

व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते. म्हणुन त्यांना कृष्ण द्वैपायन असे नांव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना 'व्यास' ही पदवी मिळाली.

पराशर ऋषीपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र, अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास. शूद्र कोळिणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मतः शूद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला. ब्राह्मणामध्येहि वरिष्ठ ठरला. बालपणीच तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ, सिद्ध पुरुष झाला.

सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जातांना त्याने सांगितले की, तू स्मरण केलेस की मी लगेच भेटेन.

महर्षि व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे ख्याति पावले. अठरा पुराणेहि नंतर त्यांनीच रचली अशी मान्यता आहे.

महाभारत हा अतिविस्तृत एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ लिहिणे योजले, तेव्हा इतके लिहिणार कोण हा प्रश्न पडला. गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहीले पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन. व्यासांनीहि अट घातली की तू समजल्याविना लिहिता कामा नये. अटीतटीने हा सामना चालू झाला. व्यास शीघ्र कवि असले तरी केव्हा तरी अडचण येई, तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत. त्यावर विचार करत गणपती बसला की, हे पुढील रचना करीत. महाभारतात असे ८८०० गूढ श्लोक आहेत.

महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत. ते सगळे ज्ञानी व्यासांनी पचविलेले होते. नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पंडु, व विदूर यांना जन्म दिला. ते स्वतः शास्त्रज्ञ (scientist) होते. त्यामुळे त्यांनी गांधारीचा पाडलेला गर्भ घेऊन, त्यावर संशोधन करून शंभर कौरव निर्माण केले. क्रोमोसोम्सचे (गुणसुत्रे) त्यांना पूरे ज्ञान होते, जे आपल्या डी. एन. ए. (D.N.A.) मधे असतात आणि ज्यांच्या सहाय्याने आपले जीन्स (genes) बनतात. त्यामुळे त्यांनी ह्या गुणसुत्रांना 'गुणविधी' हे सायण्टिफिक नांव योजले. हे गुण व विधी म्हणजे कामे ठरविणारी ही तत्त्वे, २३ असतात हेहि त्यांनी नोंदलेले आहे. आज सायन्स सुध्दा क्रोमोसोम्स २३ आहेत असेच म्हणते. यावर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचे म्हणणेहि सायन्सने आता मानले आहे.

व्यासांना खगोलशास्त्रही अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम व तीव्र या नावाखाली युरेनस, नेपच्युन, प्लुटो या ग्रहांची स्थाने महाभारत युद्धसमयी कुठे होती ते नोंदलेले आहे. सर्व ग्रहांची स्थाने त्यांनी दोन पद्धतीने म्हणजे सायन-निरयन मानाने नोंदलेली आहेत. त्यावरून महाभारतीय युद्ध रविवार दि. १६ ऑक्टोबर ५५६१ इ.स. पूर्व या दिवशी झाले हे मी (डाॅ. प. वि. वर्तक) निश्चित ठरवू शकलो.

अभिजित नक्षत्र गगनातून ढळले होते ही वैज्ञानिक सत्यकथा त्यांनी महाभारतात लिहून ठेवली आहे. असंख्य नक्षत्रे गगनात असूनहि केवळ एकाबद्द्ल ते सांगतात आणि आजचे विज्ञान नेमके तेच नक्षत्र इ. स. पूर्व १२००० वर्षे या वेळी ढळले होते हे मानते. यावरुन व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते. 'जी हलत नाहीत ती नक्षत्रे ही व्याख्या असली तरी नक्षत्रेही हलतात', असे व्यासांनी सांगितले, ते ही आजच्या विज्ञानाने मानले आहे.

महाभारतयुद्धारंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच दोन भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला. आजचे विद्वान यावरुन व्यासांना मूर्ख ठरवू बघतात कारण सूर्याचे दोन भाग कसे होतील असे त्यांना वाटते. पण ग्रहणसमयी सूर्य खरोखरीच दोन भाग दर्शवितो, मध्ये काळी तबकडी व भोवती प्रभामंडळ. खग्रास सूर्यग्रहणसमयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरुन उफाळलेल्या दिसतात असे आजचे सायन्स सांगते.

'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्', म्हणजेच व्यासांनी सारे जग उष्टे करुन टाकले आहे', असे म्हणतात ते यावरुन सत्य ठरते. कारण व्यासांना ज्ञात नाही असे काहीच नाही. आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आइनस्टाइन याने सिद्धांत मांडला की जो कुणी अतिवेगाने अन्तराळात जाऊन परतला तर त्याचे आयुष्य वाढले असल्याचे आढळेल. नेमका हाच सिद्धांत व्यासांनी एका कथेतून सांगितला आहे की ककुद्मी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी वरसंशोधनासाठी गेला आणि २७ चतुर्युगांनी म्हणजे किमान २१६ वर्षांनी परतला, तरी तो जिवंत राहीला आणि रेवती तरुणच राहीली होती. तिचे लग्न बलरामशी लावले. प्रत्येक ग्रहावर काल भिन्न असतो हे तत्त्वहि व्यासांनी या कथेत सांगितले आहे.

परा व अपरा या दोनहि विद्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळविलेले होते. सिद्धीहि मिळवलेल्या होत्या. दिव्य दृष्टीची सिद्धी त्यांनी स्वतःचा शिष्य संजय यास दिली होती, येवढे त्यांचे सामर्थ्य होते. त्यामुळे ते जगत्गुरु ठरले. त्यांचा मान राखण्यासाठी गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा मानतात. .... ...

गुरु व्यास पोर्णिमा सर्वांना अखंड गुरुकृपा, आरोग्य, उत्साहाचे वर्ष घेऊन येवो....

Photos 14/05/2016

धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे जयंती निमित्त्य विनम्र अभिवादन ...

Photos 26/03/2016

BRIGHT FUTURE - MEET YOUR DESTINY IN ONE TOUCH !!

ब्राईट फ्युचर तर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

जगातल्या सर्व राजांच्या एका हातात ढाल आणि एका हातात तलवार आहे पण..
छत्रपति शिवराय आणि संभाजी राजे हे जगातले दोनच राजे असे आहेत ज्यांच्या पाठीवर ढाल आहे.. कारण त्यांना माहीत होत 350 वर्षानंतर सुद्धा पाठीवरच वार करणारे पैदा होतील पण छातीवर वार करणारे जन्माला येणार नाहीत....
या राजेंना मानाचा मुजरा..!!

Photos 23/03/2016

Bright Future Wish You All Happy Holi !!

BRIGHT FUTURE - MEET YOUR DESTINY IN ONE TOUCH !!

Photos 10/03/2016

स्त्रीशिक्षणाचा पाया रचणाऱ्या, अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या, पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन !

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Mumbai