07/09/2025
*' आत्मा मालिक ध्यानपिठात सद्गुरू वंदना महोत्सव, आत्म साक्षात्कार, प्रकट दिन उत्साहात संपन्न ! '*
शहापूर - शहापूर तालुक्यातील मोहिली- अघईत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित, आत्मा मालिक ध्यानपिठात परमपूज्य सदगुरु आत्मा मालिक माउलींच्या कृपाशीर्वादाने, सकल संत परिवाराच्या प्रेरणेने, समस्त विश्वस्त मंडळ , स्थानिक व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शनाने परमपूज्य सदगुरु आत्मा मालिक माउलीचा प्रकट दिनानिमित्ताने सद्गुरू वंदना महोत्सव २०२५ अर्थात आत्म साक्षात्कार दिवस म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी परमपूज्य सदगुरु आत्मा मालिक माउली प्रमुख उपस्थिती तसेच संत परमानंद महाराज, संत भारतमाता, संत ब्रह्मानंद महाराज व संत मांदियाळी आदी मान्यवर पुरणगाव शाखेचे विश्वस्त हणमंतराव भोंगळे ,आत्मा मालिक ध्यानपीठ - शहापूरचे कार्याध्यक्ष उमेश जाधव , उपाध्यक्ष प्रकाश भट,स्थानिक व्यवस्थापन समितीचे सचिव अनंत गायकवाड , स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रवीण मोरे , अंभईचे अभिजीत पाटील , संकुलाचे पदाधिकारी प्रा. उल्हास पाटील, राहुल जाधव, अक्षय बरकले,.श्रीलथा नायर, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य कैलास थोरात, आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्यूनियर कॉलेजच्या प्राचार्या सौ. पौर्णिमा उपासनी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य सूर्यकांत नवले तसेच विविध शाखांचे विभागप्रमुख,सेवक कर्मचारी वर्ग उपस्थितीत आत्मा मालिक मेडिटेशन हॉलमध्ये सद्गुरू वंदना महोत्सव उत्साहात संपन्न झाला. उत्सवाची सुरुवात आत्मप्रतिमेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी स्वरांजली ग्रूपने स्वागत गीत गाऊन आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.
संत परमानंद महाराज यांनी सद्गुरू विश्वात्मक माउलींच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून आत्म्याचे स्थान स्पष्ट करत ध्यानाचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. ध्यानाच्या माध्यमातून आत्मस्वरुप सद्गुरू विश्वात्मक माउलींच्या अधिक जवळ जाता येते असेही ते म्हणाले. संत निजानंद महाराज
यांनी आपल्या जीवनातील गुरूचे महत्त्व स्पष्ट केले, तर संत ब्रह्मानंद महाराज यांनी संत परमानंद महाराज लिखित आत्मपारायणाच्या संदर्भात योग्य शब्दांत भाष्य करून आत्मोद्धारासाठी आत्मपारायण करावे असे सर्वांना आवाहन केले.
या प्रकट दिनाच्या निमित्ताने सद्गुरू पादुका अभिषेक , पूजन, होमहवन व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून पंढरपूर, शहापूर, नाशिक व येवले भजनी मंडळ यांच्या वतीने भजनसेवा देण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाची छायाचित्रे व छायाचित्रण मंगेश राऊत, गौरव गोदडे व अंभईचे माळवे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. उल्हास पाटील व चेतन चव्हाण यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी स्वरांजली ग्रूपचे विभागप्रमुख व संगीत शिक्षक राजेश सालियान, चेतन चव्हाण, विलास कोलेकर, नरेंद्र गोसावी, एकनाथ गोदडे व किशोर दराडे यांच्या संगीत विभागाच्या वतीने संगीतसेवा देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
#आत्मा
#सद्गुरू_वंदना_महोत्सव
#आत्म_साक्षात्कार