Shri Tukaram Gatha

Shri Tukaram Gatha Abhangas are nothing but short verses written by Saint Tukaram to express love towards Lord Vithhal

Abhangas are nothing but short verses written by Saint Tukaram while experiencing different facets of not only life but also people. His abhangas also reflect the basic temperament of common people along with the extremities. His abhangas are also full of love towards Lord Vithhal and his pining for Him. More so he believes that whatever he wrote or blurted out of his mouth was all carried out by Lord Vithhal owing to its spontaneity and simplicity.

जेविलें ते संत मागे उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनि झाडा ।।सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा । पासूनि सकळा अवघ्या दुरी ।।परे...
13/10/2025

जेविलें ते संत मागे उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनि झाडा ।।
सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा । पासूनि सकळा अवघ्या दुरी ।।
परे परते मज न लगे सांगावे । हे तो देवे बरे शिकविले ।।
दुसऱ्याते आम्ही नाही आतळत । जाणोनि संकेत उभा असे ।।
येथे कोणी काही न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ।।
लांचावला तुका मारतसे झड । पुरविले कोड नारायणे ।।
=================
तुकाराम महाराज म्हणतात की ही जेव्हा ह्या संतमंडळींची पंगती उठतात ना तेव्हा त्यांनी टाकलेल्या सर्व पत्रावळींचा मी चांगलाच समाचार घेतो, त्यातील त्यांच्या असलेल्या पत्रावळी शोधू काढून मी त्यातील त्यांचे राहिलेले उच्छिष्ट सेवन करतो.
अभंग १४
=================
संपूर्ण अभंग आणि अर्थासाठी खालील link वर click करावे.

जेविलें ते संत मागे उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनि झाडा ।। सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा । पासूनि सकळा अवघ्या द.....

मज दास करी त्याचा । संत दासाच्या दासाचा ।।मग होत कल्पवरी । सुखे गर्भवास हरी ।।नीच वृत्ती काम । परी मुखी तुझे नाम ।।तुका ...
09/10/2025

मज दास करी त्याचा । संत दासाच्या दासाचा ।।

मग होत कल्पवरी । सुखे गर्भवास हरी ।।

नीच वृत्ती काम । परी मुखी तुझे नाम ।।

तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ।।

==============

तुकाराम महाराज म्हणतात हे देवा नारायणा, हे पांडुरंगा माझी आता अशी इच्छा आहे की तू मला संतांची संगत द्यावीस, त्यांच्या संगतीत, त्यांच्या सानिध्यात राहण्याचे भाग्य माझ्या पदरी घालावेस , त्यांचा अंगसंग लाभून ते सुख माझ्या भाळी लिहावेस असे माझे अनेक दिवसांचे मनोगत आहे.

अभंग ३२

==============

संपूर्ण अभंग आणि अर्थ वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करावे.

मज दास करी त्याचा । संत दासाच्या दासाचा ।। मग होत कल्पवरी । सुखे गर्भवास

एक दिव्य प्रेमकथा- श्री संत तुकाराम गाथा | पहा ज्ञानाची उपरती झाल्यावर तुकोबा देवाकडे मागणे | भाग १🙏 संत तुकाराम गाथा | ...
06/10/2025

एक दिव्य प्रेमकथा- श्री संत तुकाराम गाथा | पहा ज्ञानाची उपरती झाल्यावर तुकोबा देवाकडे मागणे | भाग १
🙏 संत तुकाराम गाथा | अभंग २ 🙏
संपूर्ण आणि अर्थासाठी कृपया खालील लिंक वर click करावे.

समचरणदृष्टी विटेवरि साजिरी । तेथे माझी हरी वृत्ति राहो संत तुकाराम अभंगवाणी | Sant Tukaram Maharaj Abhang | Marathi Bhakti Geet

06/10/2025

एक दिव्य प्रेमकथा- श्री संत तुकाराम गाथा | पहा ज्ञानाची उपरती झाल्यावर तुकोबा देवाकडे मागणे | भाग १

🙏 संत तुकाराम गाथा | अभंग २ 🙏
संपूर्ण आणि अर्थासाठी कृपया खालील लिंक वर click करावे.
https://shritukaramgatha.com/a/2

पुढें गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥अमुप ...
29/09/2025

पुढें गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग
घेत आम्ही ॥
वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी
करुनी सांडूं ॥
अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल
आम्हां जोगा ॥
अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें
गोविंदाच्या ॥
जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा
सिद्ध पंथ ॥
तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा
निजाचिया ॥

=============

तुकाराम महाराज सर्वांना भक्ती पंथावर येण्यास आवाहन करताना म्हणतात आता अधिक वेळ न दवडता चला आपण देखील सर्वजण एक होऊयात आणि आपल्या पुढे गेलेले संतजन पूर्वी ज्या मार्गाने चालत वैकुंठी गेले त्या मार्गाचा माग काढत, शोध घेत त्यावरून जाऊयात. आणि अशा या मनुष्य देहाचे एकमेव ध्येय असलेले हित आपल्या पदरी पाडून घेऊयात.

अभंग १३

👉 सविस्तर अर्थ येथे वाचा:

पुढें गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥ संत तुकाराम अभंगवाणी | Sant Tukaram Maharaj Abhang | Marathi Bhakti Geet

पावले पावले तुझे आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊ देऊ ।। १ ।।जेथे तेथे देखे तुझीच पावले । त्रिभुवन संचले विठ्ठला गा ।। २ ।।...
25/09/2025

पावले पावले तुझे आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊ देऊ ।। १ ।।

जेथे तेथे देखे तुझीच पावले । त्रिभुवन संचले विठ्ठला गा ।। २ ।।

भेदाभेद मते भ्रमाचे संवाद । आम्हा नको वाद त्याशी देऊ ।। ३ ।।

तुका म्हणे अणु तुजविण नाही । नभाहुनि पाहीं वाड आहे ।। ४ ।।
==========
तुकाराम महाराज म्हणतात हे देवा पांडुरंगा, हे नारायणा, तुझ्याशी अशारितीने एकरूप झाल्याने तुझे सर्वकाही आता आम्हांला लाभत आहे आणि हळूहळू आम्ही देखील तुझ्यासारखेच होत आहोत. तेव्हा तुझ्या आणि माझ्यात पुन्हा यापुढे दुजाभाव होऊ देऊ नकोस.
कारण तसे झाल्यास आम्ही ते आता सहन करू शकणार नाही. किंबहुना यापुढे ते आता शक्यच नाही.

संपूर्ण अभंग वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करावे..

पावले पावले तुझे आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊ देऊ ।। जेथ संत तुकाराम अभंगवाणी | Sant Tukaram Maharaj Abhang | Marathi Bhakti Geet

23/09/2025

पावले पावले आम्हा तुझे सर्व | दुजा नको भाव होऊ देऊ ||

तुम्हा सर्वांना आपल्या webpage वाचायला आवडतयं ना? तेथे वाचण्याची मजाच काही और आहे. निदान आम्हाला तरी तसे वाटते. एक वेगळा...
23/09/2025

तुम्हा सर्वांना आपल्या webpage वाचायला आवडतयं ना? तेथे वाचण्याची मजाच काही और आहे. निदान आम्हाला तरी तसे वाटते. एक वेगळाच अनुभव येतो.

सुखे वोळंबा दावी गोहा । माझे दुख नेणा पहा ।।१।। आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा म्हणे भिडा ।।२।।अखंड मज पोटाची व्यथा ।...
23/09/2025

सुखे वोळंबा दावी गोहा । माझे दुख नेणा पहा ।।१।।

आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा म्हणे भिडा ।।२।।

अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साखर तूप पथ्या ।।३।।

दोपाहरा मज लहरी येती । शुद्ध नाही पदे सूपती ।।४।।

नीज न ये खाली घाली फुले । जवळी न साहती मुले ।।५।।

अंगी चंदन लाविते भाळी । सदा शूळ माझे कपाळी ।।६।।

निपट मज न चले अन्न । पायली गहू सांजा तीन ।।७।।

गेले वारी तुम्ही आणिली साकर । सात दिवस गेली साडे दहा शेर ।।८।।

हाड गळोनी आले मांस । माझे दुख तुम्हा नेणवे कैसे ।।९।।

तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरि नरका गेला ।।१०।।

==================

सर्व सुखात लोळत असलेली एक स्त्री एकदा आपल्या गोहास(पतीस) म्हणते की तुमचे बाबा माझ्याकडे लक्षच नाही. तुम्ही माझे दुःख नेणतच नाहीत, जाणतच नाही. किंबहुना तुम्हाला ते दिसूनही तुम्ही तेथे दुर्लक्ष करत असता.
मी किती दुःखात दिवस कंठत आहे वा त्रासात जगत आहे ते तुम्हास मी सांगितल्या शिवाय कळणारच नाही.
त्यामुळे आज मी तुम्हाला स्वतःहून माझी (राम) कहाणी सांगणार आहे.

संपूर्ण अर्थ येथे वाचा.
https://shritukaramgatha.com/a/11
अभंग ११

सुखे वोळंबा दावी गोहा । माझे दुख नेणा पहा ।।१।। आवडीचा मारिला वेडा । होय होय

20/09/2025

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ।।
तुळशीहार गळा कासे पीतांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ।।
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभ मणी विराजित ।।
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ।।
===============
तुकाराम महाराज म्हणतात श्रीहरिचे विटेवरील कटीवर हात ठेवून उभे असलेले रूप मला अतिशय आवडते.
अशा या रूपाला ध्यानाचे रुपक लावून ते म्हणतात असे हे कटीवर हात ठेवून उभे असलेले श्रीहरिचे सुंदर ध्यान आता माझ्या नित्य नित्य आवडीचे झाले असून त्याच्या गळ्यात तुळशीहार आहे आणि कासेला पितांबर नेसवलेले आहे व कानात सुंदर अशी मकर कुंडले तळपत असून कंठी असलेला कौस्तुभ मणी तेथे अतिशय मानाने व डौलात विराजमान झाला आहे.
संपूर्ण अर्थासाठी खाली दिलेल्या link वर click करावे..
अभंग क्र: १

अंतरीची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ।।देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ।।आपुल्याच वैभवे । शृंगारावे निर्मळ ।।तुका...
19/09/2025

अंतरीची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ।।

देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ।।

आपुल्याच वैभवे । शृंगारावे निर्मळ ।।

तुका म्हणे जेवी सवे । प्रेम द्यावे प्रीतीचे ।।

*********************************************

तुकाराम महाराज म्हणतात देव भक्ताच्या मनातील, त्याच्या अंतकरणातील आपल्या विषयी किती प्रेम आहे अथवा किती प्रेमभाव व गोडवा आहे तेवढेच पाहतो आणि तेवढेच घेतो.

एवढेच नव्हे तर त्याच्या अंतकरणातील आपल्याप्रति असलेला भाव किती शुद्ध आहे किती खरा आहे हे देखील पाहतो.

*********************************************

संपूर्ण अर्थासाठी येथे click करावे.

https://shritukaramgatha.com/a/10
अभंग १०

अंतरीची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ।। देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीन

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Tukaram Gatha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Tukaram Gatha:

Shortcuts

Share