Vidya Mandir Marathi Primary,Dahisar East

Vidya Mandir Marathi Primary,Dahisar East Educational Activities

19/09/2026

विद्या मंदिर मराठी प्राथमिक शाळेत
शुक्रवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशमूर्तीच्या पूजनाने व आरतीने करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी गणरायावरील गीते, गोष्टी, नृत्य, भक्तिगीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुंदर सादरीकरण केले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक व सांस्कृतिक परंपरांची माहिती देण्यात आली. तसेच, गणेश विसर्जनासंदर्भातील आवश्यक नियम सांगून पर्यावरण संरक्षणाविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या आनंददायी सादरीकरणाची काही क्षणचित्रे...
🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺

12/09/2026

विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग.
गुरुवार दिनांक १०/०९/२०२६ रोजी बैलपोळा सण उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय कृषी संस्कृतीत बैलाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शेतकऱ्याचा खरा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
या निमित्ताने विद्यार्थ्यांना बैलपोळा सणाचे महत्त्व सांगण्यात आले. बैलांचे शेतीतील योगदान, त्यांचे संगोपन आणि भारतीय संस्कृतीतील त्यांचे स्थान याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. सणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय परंपरांविषयी आदर, कृतज्ञता आणि जतनाची भावना निर्माण होते. उपक्रमातील सहभाग व साजरीकरण त्याची काही क्षणचित्रे......

12/09/2026

विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभागात श्रावणी अमावस्येच्या निमित्ताने 'मातृदिन' उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
भारतीय संस्कृतीत आईला सर्वोच्च स्थान दिले जाते. “मातृदेवो भव” या संस्कारमूल्याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच आईबद्दलचा आदर, कृतज्ञता व प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे औक्षण करून त्यांना वंदन केले. आईच्या त्याग, प्रेम आणि ममतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अनेक विद्यार्थ्यांनी भावना शब्दांतून, गाण्यातून व्यक्त केल्या. अत्यंत आनंददायी, भावनिक आणि संस्कारमय वातावरणात मातृदिन साजरा झाला.
आई आणि मुलांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व परस्पर आदर अधिक दृढ करणारा हा मातृदिन.त्याची काही क्षणचित्रे......

विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग. दिनांक-०८/०९/२०२६*बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग प्राथमिक अनुदानित शाळाR/N विभा...
09/09/2026

विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग.
दिनांक-०८/०९/२०२६
*बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग प्राथमिक अनुदानित शाळा
R/N विभाग.
* *चित्रकला स्पर्धा* व *शिक्षकांसाठी डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्मिती*
स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
*स्पर्धेतील यशस्वी* *विद्यार्थी आणि शिक्षक*
इयत्ता १ली- *मीरा मंदार जाधव*-प्रथम क्रमांक
इयत्ता २री- *अनुष्का विशाल शिंदे*- तृतीय क्रमांक
इयत्ता ३री-सर्वेश गंगाराम परब प्रथम क्रमांक
**********************
शिक्षकांच्या स्पर्धेत
* शिक्षिका माधवी मनोज परुळकर* -द्वितीय क्रमांक*
सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन!💐💐

26/08/2026

विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी वरळी येथील 'नेहरू सेंटर 'व 'नेहरू तारांगण'येथे शैक्षणिक सहलीसाठी नेण्यात आले होते. या सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञान, इतिहास आणि अवकाशविज्ञान यांविषयी ज्ञान मिळवून देणे हा होता.
नेहरू सेंटरमधील Discovery of India या चाचा नेहरूंच्या पुस्तकावर आधारित विविध दालने-प्रदर्शने, अश्मयुगीन माणसाचे जीवन, थोर नेत्यांची दुर्मिळ छायाचित्रे व हस्तलिखिते तसेच भारताचा सांस्कृतिक-कलात्मक वारसा इ.बद्दलची माहिती विद्यार्थ्यांनी मिळवली. तारांगण पाहून विद्यार्थ्यांनी अवकाशात घडणाऱ्या घडामोडी, आपली सूर्यमाला, चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण तसेच दीर्घिका,ग्रह-तारे , आकाशगंगा या खगोलीय संकल्पनांची माहिती मिळवली.
ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरली.
या सुंदर क्षणांची काही छायाचित्रे....

13/08/2026

नमस्कार
विद्यामंदिर मराठी प्राथमिक विभागात आषाढ अमावास्या म्हणजेच 'दीप अमावास्या' साजरी करण्यात आली.
अंधाराचा नाश करून प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दिव्यांचे आपल्या संस्कृती आणि परंपरेमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे निरनिराळ्या दिव्यांची आरास करून दीपपूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पूर्वीच्या दगडी दिव्यांपासून ते आताच्या आधुनिक विजेच्या दिव्यांपर्यंतचा प्रवास सांगण्यात आला. मुलांनी दिव्यांची सुंदर प्रार्थना म्हटली. माहितीचे सादरीकरण केले. त्याची काही क्षणचित्रे.....

अभिनंदन! अभिनंदन! 💐💐२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत खालील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झ...
13/08/2026

अभिनंदन! अभिनंदन!
💐💐
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत खालील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
१ अरोही दिपक नाईकनवरे-२८० वी
२ हनुमंत युवराज चौधरी -६७७ वा
३ गंधार नितीन मुतालिक-८६९ वा
४ सान्वी शशिकांत पोतदार-१३७८ वी
वरील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
👏👏💐💐👍👍

02/08/2026

नमस्कार🙏
विद्यामंदिर मराठी प्राथमिक विभाग
शनिवार दिनांक ०१/०८/२०२६ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच आण्णा भाऊ साठे यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यानिमित्त विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे(तुकाराम भाऊ साठे) यांच्या जीवनकार्याविषयी माहिती, प्रेरणादायी गोष्टी आणि प्रभावी भाषणे सादर केली.त्याची काही क्षणचित्रे....

27/02/2026

विद्यामंदिर मराठी प्राथमिक शाळा.
नमस्कार🙏
दि. २६ फेब्रु. २०२६
आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सहभागातून एक आगळावेगळा आणि उपयुक्त उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मदतीने लालमाठ, वांगी, टोमॅटो,पुदिना,मेथी,पालक फुलझाडे व औषधी वनस्पती इत्यादींचे रोपण करून परसबाग तयार करण्यात आली. लावलेल्या भाज्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भाज्यांची खुडणी केली.
विद्यार्थ्यांनी स्वच्छता, नियोजन आणि संघभावना यांचे उत्कृष्ट उदाहरण दाखवत भाज्या निवडल्या. योग्य पद्धतीने भाजी तयार करून घेतली. तयार केलेली भाजी मुलांना खाऊ घालण्यात आली. मुलांनी आवडीने भाजीचे सेवन केले.
या संपूर्ण प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव आणि आरोग्याबद्दलची जागरूकता निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. या उपक्रमाची काही क्षणचित्रे.....

19/02/2026

नमस्कार🙏
विद्यामंदिर मराठी प्राथमिक विभाग
१८ फेब्रुवारी २०२६ रोजी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवरायांची टाळ व लेझीमच्या गजरात, जयजयकार करत मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने केली.
विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणे, कविता व पोवाडे, शिवरायांच्या जीवनातील काही प्रसंगावर आधारित गीते व नृत्य सादर करून पूर्ण जीवनपट उभा केला. विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा परिधान करून छोटेखानी नाटिका सादर केली. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे धैर्य, शिस्त, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम समजले.गारदने कार्यक्रमाची सांगता झाली. याची काही क्षणचित्रे...

Address

Chatrapati Shivaji Road, Aanand Nagar, Opp Dahisar's Sport Club, Dahisar East
Mumbai
400068

Opening Hours

Monday 12pm - 6pm
Tuesday 12pm - 6pm
Wednesday 12pm - 6pm
Thursday 12pm - 6pm
Friday 12pm - 6pm
Saturday 7am - 5pm

Telephone

+919960122964

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidya Mandir Marathi Primary,Dahisar East posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category