Karmaveer Bhausaheb Hiray Law College

Karmaveer Bhausaheb Hiray Law College Our Law College established in the year 1971 which is first Law College at Taluka level in Maharashtra.

The Law College commenced it´s working from the 20th June 1971 and it is affiliated to the University of Pune. Which is accredited by NAAC and also recognized by Bar Council of India, Bar Council of Maharashtra and Goa.

कर्मवीर भाऊसाहेब हिरे विधी महाविद्यालय मालेगाव आणि तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 10 डिसें...
15/12/2025

कर्मवीर भाऊसाहेब हिरे विधी महाविद्यालय मालेगाव आणि तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी महाविद्यालयात जागतिक मानवी हक्क दिवसानिमित्त एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी श्री.योगेश हिरालाल अमेटा (जिल्हा न्यायाधीश -2 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मालेगाव) आणि श्री. कृष्णा गंगाधर पालदेवार (जिल्हा न्यायाधीश -4 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मालेगाव ) हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शकुंतला खुणे यांनी भूषविले. प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रथम वक्ते श्री.अमेठा यांनी मानवी हक्क आणि कर्तव्य यांचे महत्त्व प्रतिपादित केले. मानवी हक्क जगाला एका धाग्यात बांधून ठेवण्यास मदत करतात असे त्यांनी यावेळी सांगितले.या प्रसंगी कार्यशाळेचे दुसरे वक्ते श्री.पालदेवार यांनी मानवी हक्कांची संकल्पना समजावून सांगितली. तसेच एक यशस्वी वकील अथवा न्यायाधीश होण्यासाठी अभ्यासातील सातत्य व शिस्त विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते असे प्रतिपादित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. खुणे यांनी यावर्षीची मानवी हक्क दिवसाची संकल्पना 'सन्मान,स्वातंत्र्य आणि न्याय' याविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक मनुष्याचे संरक्षण व स्वातंत्र्य हे मानवी हक्कांवर अवलंबून आहे असे वक्तव्य त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा.डॉ.रवी भोवते यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.मानसी महाजन यांनी केले. अतिथी परिचय विद्यार्थिनी श्वेता चव्हाण आणि वैष्णवी हिरे यांनी तर आभार प्रदर्शन विद्यार्थी तुषार कोल्हे यांनी केले. कार्यशाळेस डॉ.शंकर कदम, श्री. डापसे तालुका विधी सेवा समिती आणि मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष ऍड. निकम, ऍड. शेख आणि सचिव ऍड. पाटील, तसेच श्री. शेवाळे उपस्थित होते. तसेच कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

#जागतिकमानवीहक्कदिन
#मानवीहक्क
#मानवतेचा_सन्मान #सन्मान_स्वातंत्र्य_न्याय

कर्मवीर भाऊसाहेब हिरे विधी महाविद्यालय येथे आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी महिला सक्षमीकरण व सबलीकरण कार्यशाळा आयोजित करण्...
19/08/2025

कर्मवीर भाऊसाहेब हिरे विधी महाविद्यालय येथे आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी महिला सक्षमीकरण व सबलीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी श्रीमती मानसी परदेशी सिविल जज ज्युनिअर डिव्हिजन आणि डॉ. अर्चना सूर्यवंशी प्रमुख अतिथी म्हणून लाभले. सुमारे 120 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शंकर कदम तसेच समन्वयक डॉ. खुणे, सूत्रसंचालन डॉ. मानसी महाजन व इतर इतर कर्मचारी उपस्थित होते.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे विधी महाविद्यालय, मालेगाव येथे, महाराष्ट्र राज्याचे माजी परिवहन व...
22/10/2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे विधी महाविद्यालय, मालेगाव येथे, महाराष्ट्र राज्याचे माजी परिवहन व राजशिष्टाचार मंत्री, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था व आदिवासी सेवा समितीचे जनरल सेक्रेटरी, आमचे प्रेरणास्थान, आदरणीय डॉ. प्रशांत दादा हिरे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कदम यांनी सर्व उपस्थितांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी मालेगावातील प्रसिद्ध डायबेटीक स्पेशालिस्ट डॉ. गौरव काकानी, तसेच हृदयरोगतज्ञ डॉ. कल्पेश देवरे, डॉ. नरेंद्र खैरनार, आणि डॉ. वीरेंद्र निकम उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कदम यांनी आपल्या प्रस्ताविकात कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि महाविद्यालयाचा एकूण 53 वर्षांचा कालखंडाचा परिचय करून दिला. प्रशांत दादा हिरे यांनी आपल्या कारकिर्दीत नार पार प्रकल्प मार्गी लागावा म्हणून स्वतः सर्वे केला, आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ मालेगावात आणून पाणी परिषद घेतली. 2021 साली या निरामय आरोग्य केंद्राचे उद्घाटन मालेगावातील प्रसिद्ध डॉक्टर यशवंत पाटील यांच्या हस्ते झाले होते. दरवर्षी शिबिरात नामांकित डॉक्टरांना बोलावून शिबिर आयोजित केले जाते, ज्याचा लाभ विद्यार्थ्यांना व गरजू लोकांना होतो. डॉ. गौरव काकानी यांनी शुगरचा त्रास टाळण्यासाठी दररोज अर्धा तास तरी व्यायाम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच खाण्यावर नियंत्रण ठेवल्यास शुगर वाढणार नाही, अशी मार्गदर्शन दिली. डॉ. कल्पेश देवरे यांनी हृदयरोग टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सांगितल्या. डॉ. नरेंद्र खैरनार यांनी आपल्या मनोगतात 1987 साली त्यांच्या क्लिनिकचे उद्घाटन प्रशांत दादा हिरे यांच्या हस्ते झाल्याचे सांगितले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिरात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे आभार मानले. सर्व डॉक्टरांनी 70 ते 80 ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींचे शुगर व बीपी तपासले. महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापिका श्रीमती शकुंतला खुणे, प्राध्यापक वर्धमान अहिवळे, प्राध्यापक भोसले, कार्यालयीन अधीक्षक श्री. येडी, दापसे, सुनील वाघ, बापू बेलदार, नाना चव्हाण, जी. आर. पाटील, विद्यार्थी-विद्यार्थिनी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

कर्मवीर भाऊसाहेब हिरे विधी महाविद्यालय मालेगाव येथे भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर ए. पी. जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी कर...
16/10/2024

कर्मवीर भाऊसाहेब हिरे विधी महाविद्यालय मालेगाव येथे भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर ए. पी. जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. या दिवसाला वाचन प्रेरणा दिन असे म्हणूनही संबोधले जाते. कार्यक्रमाचे आयोजन हे महाविद्यालयाच्या लायब्ररी विभागातर्फे करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कदम, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

Teacher's Day celebration at Karmveer Bhausaheb Hiray Law College, Malegaon. The celebration became extra special by fac...
05/09/2024

Teacher's Day celebration at Karmveer Bhausaheb Hiray Law College, Malegaon. The celebration became extra special by facilitating all the teaching, and nonteaching staff of the college by Bank of Maharashtra officials.

Celebrated the 78th Independence Day at Karmveer Bhausaheb Hiray Law College.
16/08/2024

Celebrated the 78th Independence Day at Karmveer Bhausaheb Hiray Law College.

Dear All,Current issue of India Today ( issue dated 29th June 2015) is a special issue on Educational institutes in Indi...
26/06/2015

Dear All,

Current issue of India Today ( issue dated 29th June 2015) is a special issue on Educational institutes in India.
The India Today Group - Nielsen Survey was conducted to determine the best undergraduate colleges in 12 disciplines- Arts, science, commerce, engineering, medical, law, BBA, BCA,mass communication & journalism, fashion technology, fine arts, hotel management, for arts,science and commerce colleges ,the survey covered 17 major cities, for other streams, colleges from all over India were considered.

India's best colleges 2015 - Find the rankings of Best colleges for Commerce, Arts, Science, Engineering, Fashion, BCA, Mass Comm, Fine Arts, Law, Medicine, BBA & Hotel Management in india 2015

15/04/2015
03/03/2015

Address

Loknete Vyankatrao Hiray Marg
Marg
423105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karmaveer Bhausaheb Hiray Law College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Karmaveer Bhausaheb Hiray Law College:

Shortcuts

Share

Category