Shivratna Semi English School Shankarnagar,Akluj.

  • Home
  • Shivratna Semi English School Shankarnagar,Akluj.

Shivratna Semi English School Shankarnagar,Akluj. primary & secondary School

17/05/2024
*शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये टाळ- मृदंगाच्या साथीने भक्तीमय वातावरणात न्हावून निघाले शाळकरी वारकरी*दिनांक - 23 जुन भ...
23/06/2023

*शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये टाळ- मृदंगाच्या साथीने भक्तीमय वातावरणात न्हावून निघाले शाळकरी वारकरी*

दिनांक - 23 जुन
भक्तीच्या वाटेवर विठुरायाच्या आशीर्वादासाठी वारकऱ्यांची पावले आसुसलेली असतात. तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, 'पांडुरंगा', माझ्या माणसांना नेहमीच तुझ्या सहवासात राहू दे! असाच काहीसा संदेश घेऊन ती पंढरीच्या वाटेवर वळलेली असतात.

आषाढी एकादशीला जमतात सारे वारकरी, टाळ मृदंगाच्या जयघोषात मग्न होतात शाळकरी, बघून सारे दृश्य मन होते प्रसन्न, जणू स्वर्गच उतरला धरतीवर!

भाळी चंदनाचा टिळा लावून मुखी हरिनामाचा जयघोष करत शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद केंद्र शाळा यशवंत नगर यांच्या सौजन्याने आज पालखी सोहळ्यानिमित्त पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

दिंडीच्या सुरुवातीला पालखीचे पूजन शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल मा श्री. जितेंद्र माने देशमुख आणि जिल्हा परिषद केंद्र शाळा यशवंत नगर चे मुख्याध्यापक श्री. बंडू खडतरे यांच्या हस्ते करून व इ पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांनी सौ सुवर्णा निंबाळकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली बसवलेल्या विठ्ठल नामाची शाळा भरली हे नृत्य सादर करून ही दिंडी शाळेतून निघून कीर्तीनगर, यशवंतनगर या भागातून काढण्यात आली. दिंडी दरम्यान शाळेतील पालक श्री पिंटू चौगुले यांनी नऊ वर्षांची परंपरा जपत दोन्ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची अतिशय उत्तम अशी नाश्त्याची सोय केली. त्याबद्दल दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांकडून त्यांचे आभार मानून त्यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.त्याठिकाणी एकदा मुलांनी विठ्ठल नामाची शाळा भरली हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिकली.
त्यानंतर पायी दिंडी शाळेत पोहोचताच शाळेच्या मैदानावर रिंगण सोहळा पार पडला त्यावेळेस विद्यार्थांनी ज्ञानोबा - तुकाराम म्हणत शाळेचे मैदान दणाणून सोडले. रिंगण सोहळ्यानंतर मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बालचमुंनी फुगडीचा आनंद घेतला.
अशाप्रकारे टाळ - मृदंगाच्या साथीने शाळेचे सारे क्रीडांगण भक्तीच्या रसात न्हावून निघाले.

🚩🌏🚩🌏🚩🌏🚩🌏🚩 *शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल मध्ये  मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा.**27 फेब्रुवारी रोजी रविवार (साप्ताहिक सुट...
27/02/2022

🚩🌏🚩🌏🚩🌏🚩🌏🚩

*शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा.*

*27 फेब्रुवारी रोजी रविवार (साप्ताहिक सुट्टी) असल्या कारणाने आज दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी प्रशालेत मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*

*कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतील शिक्षिका सौ जाधव मॅडम यांनी मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माहिती सांगितली त्यानंतर इयत्ता 5वी ते 9वी च्या विध्यार्थ्यांनी मराठीच्या गौरवास्पद विविध मराठी कविता, श्लोक, चारोळ्या, तसेच मराठी साहित्याची ओळख आपल्या भाषणातुन करून दिली त्यानंतर श्री शेवकर सर यांनी मुलांचे कवी कुसुमाग्रज,कवी केशवकुमार असे गट पाडून मराठी भाषेवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली यामध्ये इ पाचवी ते नववी च्या मुलांनी सहभाग घेतला त्यामध्ये कवी कुसुमाग्रज या गटाने विजय मिळविला मुख्याध्यापक श्री जितेंद्र माने देशमुख यांनी विजेत्या गटाचे अभिनंदन केले.मुलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.*
*संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ जाधव मॅडम यांनी केले*

🚩🌍🚩🌏🚩🌏🚩🌏🚩

🚩🌏🚩🌏🚩🌏🚩🌏🚩 *शिवछत्रपतींच्या जयघोषामध्ये शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल मध्ये  शिवजयंती उत्साहात साजरी.**आज दिनांक २१फेब्रुवार...
21/02/2022

🚩🌏🚩🌏🚩🌏🚩🌏🚩

*शिवछत्रपतींच्या जयघोषामध्ये शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.*

*आज दिनांक २१फेब्रुवारी २०२२ रोजी प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.*

*सर्व प्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जितेंद्र माने देशमुख सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.*

*प्रशालेतील बालचमुंनी शिवरायांवर भाषणे सादर केली. प्रशालेतील सौ.मोरे मॅडम व सौ. नारायणकर मॅडम यांनी शिवाजी महाराजांच्या प्रसंगावर आधारित पोवाडे सादर केले त्यानंतर सौ.बनकर मॅडम यांनी शिवरायांच्या कार्याची ओळख करून दिली तर प्रशालेतील श्री.शेवकर सर यांनी 'शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आपण' या विषयावर मनोगत व्यक्त केले. या वेळी शिवरायांच्या जीवनावर आधारित असणारे जिजामाता शिवरायांना उपदेश देत असताना ,स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा, कोंढाणा किल्ला हे प्रसंग सादर करण्यात आले*

*कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी 'शिवाजी महाराज प्रजाहितदक्ष' राजे या विषयावर मनोगत व्यक्त केले.*

*आजच्या कार्यक्रमाला प्रशालेतील बालचमू शिवराय ,जिजामाता व शाहीरी पेहराव करून आले होते.*

*या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जाधव मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन कु.राऊत मॅडम यांनी केले.*

🚩🌍🚩🌏🚩🌏🚩🌏🚩

🌍🇮🇳🌍🇮🇳🌍🇮🇳🌍🇮🇳🌍*शिवरत्न  सेमी इंग्लिश स्कूलमध्ये  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.**आज  दिनांक २६ जानेवारी २०२२ भारताचा   ७...
26/01/2022

🌍🇮🇳🌍🇮🇳🌍🇮🇳🌍🇮🇳🌍

*शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.*

*आज दिनांक २६ जानेवारी २०२२ भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.*

*प्रशालेतील एल.एम.सी.मेंबर श्री. शिवदत्त नारायणकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.*

*या वेळी ध्वजाला सलामी देण्यासाठी प्रशालेतील मुख्याध्यापक श्री.जितेंद्र माने - देशमुख सर एल.एम सी. मेंबर गायकवाड सर तसेच भोसले सर व संपूर्ण शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.*

*प्रजासत्ताक दिनानिमित्त आज ऑनलाइन पध्दतीने प्रशालेत इयत्ता पाचवी ते नववीच्या सर्व वर्गांची निबंध स्पर्धा घेण्यात आली.*

🇮🇳🌍🇮🇳🌍🇮🇳🌍🇮🇳🌍🇮🇳

🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎*शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  घेतला  जापनीज  मेंदूज्वर  लसीचा  डोस**आज वार बुधवार दिनांक १२ ...
12/01/2022

🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎

*शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला जापनीज मेंदूज्वर लसीचा डोस*

*आज वार बुधवार दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी प्रशालेतील विद्यार्थ्यांना जापनीज मेंदूज्वर लसीचा डोस देण्यात आला*

*प्रशालेतील इयत्ता नर्सरी ते वयोगट १५ असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली यावेळी एकूण 235 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली*

*तसेच आज राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेतील पोलीस पालक श्री.आश्रिनाथ राजमाने यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.*

*लसीकरण कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री माने देशमुख सर व सर्व वर्गांचे वर्गशिक्षक उपस्थित होते तसेच लस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र यशवंतनगर येथील आरोग्य वर्धिनी केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी वृंद उपस्थित होता.*

*या लसीकरणाच्या कार्यक्रमावेळी कोविड-१९ सर्व नियमांचे पालन करण्यात आले.*

🌎🌎🌎🌎🌎🌎🌍🌍🌎

🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏*वसुंधरेच्या संरक्षणासाठी शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल झाली सज्ज.**आज वार गुरुवार दिनांक २३ डिसेंबर रोजी संस्था अ...
24/12/2021

🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏

*वसुंधरेच्या संरक्षणासाठी शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल झाली सज्ज.*

*आज वार गुरुवार दिनांक २३ डिसेंबर रोजी संस्था अध्यक्ष मा श्री धैर्यशील मोहिते पाटील व उपाधक्ष्या मा सौ शितालदेवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल मध्ये किसान दिनाचे औचित्य साधून किसान दिन व माझी वसुंधरा हा कार्यक्रम राबविण्यात आला.*

*प्रशालेत सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत टाळ्यांच्या गजरात करण्यात आले.* *त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.जितेंद्र माने -देशमुख सर यांनी केले.*

*कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार मा श्री.चंद्रकांत कुंभार व अध्यक्ष म्हणून यशवंतनगर केंद्राचे केंद्र प्रमुख मा श्री. विठ्ठल नष्टे सर यांची निवड कु मयुरी राऊत मॅडम यांनी केले व त्यास अनुमोदन सौ.मंदाकिनी गुंड मॅडम यांनी दिले. व कार्यक्रमाची सुरुवात महर्षी काका व अक्कासाहेब व सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.*

*प्रशालेत उपस्थित मान्यवर जेष्ठ पत्रकार श्री.चंद्रकांत कुंभार, केंद्र प्रमुख विठ्ठल नष्टे सर, एल.एम.सी. अध्यक्ष रामकृष्ण काटकर सर , सदस्य शंकर गायकवाड सर, हनुमंत भोसले सर, पत्रकार संतोष पालवे,पत्रकार सागर खरात व उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.*

*सत्कारानंतर राज्यस्तरीय , विभाग स्तरीय व इतर उपक्रमात भाग घेतलेल्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे बक्षिस वितरण करण्यात आले.*

*तद्नंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.जितेंद्र माने -देशमुख सर यांनी सर्व उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी , पालक , सर्व शिक्षक यांना माझी वसुंधरा शपथ देण्यात आली.*

*शपथ दिल्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.*

*वृक्षारोपण झाल्यानंतर विविध गुणदर्शनपर कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित असे समूह नृत्य सादर करण्यात आले.*

*विद्यार्थी भाषणामध्ये प्रशालेतील इयत्ता आठवी च्या ध्रुव कांबळे या विद्यार्थ्यांने शेतकऱ्याची व्यथा त्याच्या भाषणामधून उत्तमरीत्या मांडली.*

*पाहुण्यांच्या भाषणामध्ये जेष्ठ पत्रकार श्री.चंद्रकांत कुंभार व केंद्र प्रमुख श्री विठ्ठल नष्टे सर यांची भाषणे झाली. या भाषणामध्ये वसुंधरेचे संवर्धन व शेतकरी यांच्या आपल्या जीवनात असलेले महत्व पटवून दिले.*

*सदर कार्यक्रम कोविड - १९ मार्गदर्शक नियमांचे पालन करून करण्यात आला.*

*सदर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.तमन्ना नाईकवाडी मॅडम व आभार प्रदर्शन श्री.गणेश शेवकर सर यांनी केले.*

🌏🌏🌏🌏🌏🌎🌍🌎🌍

http://maharshidigitalnews.com/?p=2210
24/12/2021

http://maharshidigitalnews.com/?p=2210

Shareमहर्षि डिजीटल न्यूज अकलूज : शंकरनगर-अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्थेच्या शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल मध्ये मा.....

🌍📚📚📙📓📔📒📗🌍*वाचाल तर वाचाल या  उद्गघोषणेमधून  शिवरत्न सेमी इंग्लिश  मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा**आज दिनांक १६ ऑक...
16/10/2021

🌍📚📚📙📓📔📒📗🌍

*वाचाल तर वाचाल या उद्गघोषणेमधून शिवरत्न सेमी इंग्लिश मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा*

*आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज प्रशालेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.*

*कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गुंड मॅडम व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.जितेंद्र माने - देशमुख सर यांची निवड करण्यात आली*

*कार्यक्रमाची सुरुवात अब्दुल कलाम व विद्येची देवता सरस्वती आणि पुस्तके यांच्या पूजनापासून करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. माने - देशमुख सर यांचा सत्कार श्री.शेवकर सर यांनी केला व प्रमुख पाहुण्या गुंड मॅडम यांचा सत्कार सौ.जाधव मॅडम यांनी.केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.शेवकर सर यांनी केले.*

*विद्यार्थी भाषणामध्ये झैदअली शेख, मैत्री माळवदे, सार्थक मुदगल, ध्रुव कांबळे ,राजनंदिनी सावंत यांनी अनुक्रमे अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र व त्यांचे विचार स्पष्ट केले.*

*विद्यार्थी भाषणानंतर वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेले स्लोगन यांचे अनावरण कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.*

*यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गुंड मॅडम यांनी अब्दुल कलाम यांचा भारत या विषयावर व्याख्यान दिले. *यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.माने -देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व उत्तमरीत्या पटवून दिले.*

*त्यानंतर विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचनासाठी देऊन विद्यार्थ्यांना मौन वाचन करण्यास सांगितले.त्यानंतर विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.*
*या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशलेतील विद्यार्थी ध्रुव कांबळे याने तर आभार प्रदर्शन शिवम जाधव याने केले.*

*संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री.शेवकर सर व गुंड मॅडम यांनी केले यावेळी सर्व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले. यावेळी कोविड -१९ मार्गदर्शक सर्व नियमांचे पालन करण्यात आले.*

🌍📚📚📚📗📒📔🌍

🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍*आज शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल, शंकरनगर- अकलूज येथे यशवंतनगर केंद्राचे केंद्र प्रमुख श्री.नष्टे  सर व विस्तार अध...
05/10/2021

🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍

*आज शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल, शंकरनगर- अकलूज येथे यशवंतनगर केंद्राचे केंद्र प्रमुख श्री.नष्टे सर व विस्तार अधिकारी श्री. महालिंग नकाते साहेब यांनी शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या तपासणी साठी शाळेला भेट दिली.*

*यावेळी तपासणी केली कोविड- १९ च्या नियमांचे पालन सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी करत असल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी शाळेचे कौतुक केले.* *तसेच शाळा चालू पूर्वतयारी पाहून मुख्याध्यापक श्री.माने - देशमुख सर यांचे कौतुक केले. यावेळी शाळेचा परिसर व भौतिक बाबींची पाहणी केली असता सर्व तयारी पूर्ण झाल्याचे दिसून आले*

*आज जवळपास ६०% विद्यार्थी शाळेत उपस्थित होते लवकर इतर विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले.*

*एकंदरीत सर्व आढावा घेऊन शाळेचे केंद्रप्रमुख नष्टे सर व विस्तार अधिकारी श्री. महालिंग नकाते सर यांनी भरभरून कौतुक केले.*

*या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जितेंद्र माने देशमुख सर, शिक्षक प्रतिनिधी श्री.शेवकर सर व शिक्षकेतर प्रमुख बनकर सर व सर्व शिक्षक वृंद कोविड -१९ मार्गदर्शक नियमांचे पालन करून उपस्थित होता.*

🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍

04/10/2021

आज पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹

Address

Shankarnagar,(Yashwantnagar)

413118

Telephone

+919403100730

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivratna Semi English School Shankarnagar,Akluj. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shivratna Semi English School Shankarnagar,Akluj.:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share