19/02/2023
के.बी.एच.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगांव कॅम्प येथे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने पोवाडे गायन स्पर्धा मोठा उत्साहात संपन्न
रयतेचे राजे राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे भोसले यांना जयंती निमित्ताने के.बी.एच.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे विनम्र अभिवादन करून पोवाडे गायन स्पर्धा व व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कैलास दाभाडे होते.यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्या सौ. प्रतिभा शेवाळे, पर्यवेक्षक संजय शिंदे, पर्यवेक्षक सुभाष निकम ,कनिष्ठ महाविद्यालयाचे इन्चार्ज प्राध्यापक विश्वास पगार, पर्यवेक्षक सुरेश भामरे , कार्यालयीन प्रमुख जितेंद्र विसपुते, संजय सूर्यवंशी व्याख्याते क्रीडाशिक्षक जे. टी. ठाकरे, राजेश धनवट उपस्थित होते.व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते राजे छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रुद्र पाटील व साईश गवळी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. व्याख्याते जे.टी.ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले व कविता सादर केली.
विद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.प्रतिभा शेवाळे यांच्या संकल्पनेतून पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नारायण महाजन प्रथम, वेदांत सोनवणे द्वितीय, गितेश साळुंखे ने तृतीय क्रमांक पटकावला तसेच हितेश शेलार, जय अहिरे ,रुद्र पाटील, भावेश जाधव ,संकेत खरे, सोहम मोरे यांनीही अतिशय मधुर आवाजात पोवाडा सादर केला. पोवाडे गायन स्पर्धेत चिमुकल्या शिवशाहीरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन शिवरायांच्या कार्याचे गुणगान पोवाडे द्वारे सादर केले. परीक्षक म्हणून प्राध्यापक बाळासाहेब ठाकरे व अशोक माने यांनी कामकाज बघितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कैलास दाभाडे (आण्णासाहेब) यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती विशद करून विनम्र अभिवादन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेंद्र शेवाळे यांनी केले. आभार राजेश धनवट यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील सूर्यवंशी, हेमंत पगारे, सौ आशा पगार, गायन विभागाचे श्रीकांत पाटील, जेष्ठ क्रीडा शिक्षक योगेश गांगुर्डे, जे.टी.ठाकरे , तसेच शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक,शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर बंधू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच विविध उपक्रमांनी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.