Gcc-Tbc

Gcc-Tbc Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gcc-Tbc, Education, Maharashtra.

21/04/2016

[21/04 08:15] Adwait Gaidhani: MS-Excel स्टेटमेंटचा 4 नंबरचा प्रश्न:
--------------------------------------------
विद्यार्थी शार्ट-कट कीज वापरतात. सिलेक्शन व्यवस्थित करीत नाहीत. बरेचशे प्रॉब्लम्स विद्यार्थ्यांना चुकीच्या ऑपरेशन मुळे येतात.
-----------------------------------------------
MS-EXCEL मध्ये स्टेटमेंट करताना Cut / Copy / Paste / Undo करु नये. सर्व डेटा एकाच वेळी सिलेक्ट करुन जर Delete अथवा Cut कमांड वापरली तर संपूर्ण डेटा जातो. WORD सिलेक्ट करुन ड्रैग करु नये. Column ची रुन्दी सेट (equal sized) करताना column letters ना क्लिक न करता तीनही कॉलमचे सेल सिलेक्ट करुन Column Width (equal sized) सेट करावी अथवा single column एक एक याप्रमाणे सिलेक्ट करुन column width सेट करावी. सेलमधे डेटा manipulate करताना योग्य सेल सिलेक्ट केला आहे का याची विद्यार्थ्यांनी खात्री करुन घ्यावी.

…. प्रश्नांकरिता पेज-लेआऊट,लाईन स्पेसिंग, फॉन्ट डिफाँल्ट असणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यात बदल करू नये.

[A] ISM च्या डेस्कटॉपवरील आयकॉनला राईट-क्लिक करून Run as Administrator ला क्लिक करून खालील नुसार सेटिंग्ज करणे.
Font Type: Bilingual web
Keyboard type: Typewriter/Custom: Re*****on Marathi,
Switch key: scroll lock,
Font name to be used: DVBW-TTSurekh

ISM मध्ये सेटिंग्ज केल्यावर minimize करणे.

मराठी मध्ये अंक आणणेकरिता मेन की-पॅड वरील अंकदर्शक कीज चा वापर करावा.

[B] Question Paper च्या Excel Sheet मध्ये असेल त्याच प्रमाणे Answersheet मधील Excell sheet वरील Cell मध्ये Statement Type करणे आवश्यक आहे. उदा. B3. आधी संपूर्ण टायपिंग करून घ्यावे, नंतर Formatting करावे.

दुचाकी वाहनांची विक्री दर्शविणारा तक्ता
Main Heading / मुख्य मथळा टाइप करावा.

क्रमांक वाहनाचे नांव २००९ २०१० २०११
सर्व रकान्यांचे मथळे (Column Heading) प्रत्येकी वेगळ्या column मध्ये टाइप करावेत.
(मराठी मध्ये अंक आणणेकरिता मेन की-पॅड वरील अंकदर्शक कीज चा वापर करावा.)

क्रमांक आणि त्याचे सर्व Particulars / विवरण (वाहनाचे नांव) टाइप करावे. सर्व Statistics म्हणजे शेवटचे तीनही रकाने टाइप करत असतानाच Thousand separator दाखविण्यासाठी स्वल्पविराम म्हणजे Comma चा वापर करावा. या बाबीसाठी परीक्षेत Formatting Tools चा वापर करू नये, याची कृपया नोंद घ्यावी.

[C] आता Formatting सुरू करावे. क्रमांक च्या कॉलम ची रुंदी योग्य तितकी करून घ्यावी. Particulars / विवरण च्या कॉलमची रुंदी योग्य तितकी करून घ्यावी. शेवटच्या तीन रकान्यांची Width ज्यामध्ये Statistics असते, तीनही रकाने एकसारखी Width असणे आवश्यक आहे. त्यासाठी तीनही सेल एकाच वेळी सिलेक्ट करून योग्य ती Width एकसारखी करून घ्यावी.

… Main Heading हे Bold & Underline करावे. नंतर संपूर्ण तक्त्याचे मध्यभागी येईल अशाप्रकारे सिलेक्शन करून Heading ला Merge & Center कमांड लागू करावी.
.. सर्व रकान्यांचे मथळे सिलेक्ट करावेत व त्यांना Bold करावे, तसेच Center Alignment लागू करावी.
.. आता सर्व क्रमांक सिलेक्ट करावेत व त्यांना Center Alignment लागू करावी.
.. आता Main Heading सोडून सगळे रकाने सिलेक्ट करून त्याला All Borders लागू करावी.

दुचाकी वाहनांची विक्री दर्शविणारा तक्ता

क्रमांक वाहनाचे नांव २००९ २०१० २०११
१ अॅक्टिव्हा २,५३४ ४,३२४ ६,५२२
२ प्लेजर ६,३४२ ७,२३१ ४,२३४
३ करिज्मा ३,५३१ ५,३४३ २,४५७
४ शाईन ४,२४२ ५,२३५ ५,३४६
५ पल्सर १,२३५ २,३४५ २,३५५
६ यूनिकॉर्न ४,२२३ १,२४५ ५,३४४
७ स्प्लेंडर ५,२३२ ६,४३२ ३,३४६
८ यामाहा ३,२३१ २,३४६ ३,६४५
[21/04 08:33] Adwait Gaidhani: MS-WORD मध्ये पत्र तयार करणे
------------------------------------------------
गुण: 15 कालावधी: 30 मिनिटे, टायपिंग: 7.5 मार्क्स, प्रेझेंटेशन: 7.5 मार्क्स
प्रश्नासाठी आवश्यक असलेले Page Setup, Line Spacing, Font Size या बाबी By Default असणार आहेत, त्यात विद्यार्थ्यांनी बदल करू नयेत.
[A] संपूर्ण पत्र प्रथम खालीलनुसार टाइप करून घ्यावे. विद्यार्थ्यांनी MS-WORD मध्ये पत्र आणि गती उतारा करीत असताना खालील बाबी लक्षात ठेवाव्यात.
(1) पूर्ण विराम (.) नंतर दोन स्पेस.
(2) प्रश्न चिन्ह (?) नंतर दोन स्पेस.
(3) स्वल्प विराम (,) नंतर एक स्पेस.
(4) विसर्ग (:) नंतर आणि अगोदर स्पेस देण्याचा नाही किंवा Question विंडोनुसार Answer विंडो तयार करणे. डावीकडील Question Window नुसार उजवीकडील Answer Window मध्ये पत्र तयार करायचे आहे.
------------------------------------------------
[B] यानंतर आवश्यक त्या ठिकाणी Enter द्यावेत
------------------------------------------------
[C] आणि त्यानंतर Formatting सुरू करावे.
.. कंपनीचे नांवास Bold, Underline, Center Align करावे. नंतर कंपनीचे नांव, पत्ता माऊसने एकाच वेळी सिलेक्ट करून त्यास Center Align करावे. कंपनीचे नांव, पत्ता व जावक क्रमांक यांचेमध्ये एक Blank ओळ दिसेल.
.. जावक क्रमांक व दिनांक यांचेमध्ये किमान 3 किंवा 3 पेक्षा जास्त tab ठेवा, तसेच जावक क्रमांक व प्रति यांचे मध्ये एक Blank ओळ दिसेल.
.. पत्ता व विषय यांचे मध्ये एक Blank ओळ दिसेल. संदर्भ व महोदय यांचे मध्ये एक Blank ओळ दिसेल.
..विषय आणि संदर्भ पूर्वी दोन Tab वापरुन त्यास Bold करा.

… Paragraph च्या सुरूवातीस एकदा टॅब की प्रेस करा. दोन पॅराग्राफ मध्ये Blank लाइन नको. धन्यवाद च्या आधी Tab की द्या. पॅराग्राफला Justify Alignment करावी. धन्यवाद नंतर Blank लाइन नको. आपला विश्वासू नंतर हुद्दयापूर्वी दोन Blank लाईन्स असाव्यात. आपला विश्वासू पासून हुद्दयापर्यंत माऊसने सिलेक्शन करावे व रूलरचा
वापर करून चौकोनावर क्लिक करून संपूर्ण Indent 3.5 लाच drag करावे. या सिलेक्शनला Center Alignment लागू करावी. सोबत च्या शेवटच्या अक्षरानंतर स्पेस किंवा Enter देवू नये.

अहमदनगर येथील GCC - TBC   परीक्षा केंद्राचे उद्घाटन करताना महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य श्री. कराळे सर आण...
20/04/2016

अहमदनगर येथील GCC - TBC परीक्षा केंद्राचे उद्घाटन करताना महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य श्री. कराळे सर आणि सहकारी. राज्य भरात शासनमान्य GCC - TBC परीक्षेस उत्साहात सुरवात

Address

Maharashtra

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gcc-Tbc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category