01/03/2025
*लोकसेवा फार्मसी महाविद्यालयामध्ये क्लिनिकल रिसर्च या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन*
ज्या प्रक्रियेत नवीन औषधांवर संशोधन केले जाते त्या प्रक्रियेस क्लिनिकल रिसर्च असे म्हणतात. या प्रक्रियेत दोन घटक मुख्यत्वे तपासले जातात. एक म्हणजे सुरक्षितता आणि दुसरी म्हणजे (औषधांची) काम करण्याची क्षमता. एखाद्या नवीन औषधाची निर्मिती करण्यासाठी लागणारा कालावधी हा साधारणतः १२ वर्षे असतो आणि त्यासाठी ५०० मिलियन (५०० दशलक्ष म्हणजे ५० कोटी) ते १ बिलियन (१०० कोटी) अमेरिकी डॉलर खर्च येतो.इतका खर्च येण्याचे कारण यात मानवप्राण्यावर प्रयोग केले जातात. आणि थोडीशी चूकही ज्याच्यावर प्रयोग केला जातो अशा रुग्णाच्या(प्रयुक्त्याच्या) जीवावर बेतू शकते वा त्याच्या आरोग्याची मोठी हानी करू शकते. क्लिनिकल रिसर्चमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम केले जाते.क्लिनिकल रिसर्चचे मुख्यत्वे यात ४ टप्पे असतात . अशाप्रकारे क्लिनिकल रिसर्च या विषयाची सखोल माहिती निलेश जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या व्याख्यानातून दिली. या व्याख्यानाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून व लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आचल वाडेकर व आभार प्रदर्शन आरती खाडे यांनी केले. या व्याख्यानाचे आयोजन प्रा. पूनम गवारी व प्रा. अफरोज मुलानी यांनी केले. तसेच महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.