Sardar Vallabhbhai Patel Highschool, Lonar

Sardar Vallabhbhai Patel Highschool, Lonar शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना शाळेची माहिती मिळावी.

चला आज पुन्हा..... लहान होऊया!एकत्र बसून खाल्लेले डबे, निकालाच्या दिवसांची भीती, बोर्डाच्या परीक्षा, हातावर खाल्लेल्या छ...
10/10/2025

चला आज पुन्हा..... लहान होऊया!

एकत्र बसून खाल्लेले डबे, निकालाच्या दिवसांची भीती, बोर्डाच्या परीक्षा, हातावर खाल्लेल्या छड्या, मैदानावर खेळलेले खो-खो कबड्डी चे डाव, मन पिळवटून टाकणारा तो शेवटचा दिवस आणि आता उरलेल्या त्या गोड आठवणी....

चला तर मग आता पुन्हा एकदा या गोड आठवणींना उजाळा देऊया, गप्पांच्या मैफलीत रंग भरूया. रविवार दिनांक २५ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ०९ वाजता सर्वांनी उपस्थित राहावे.
आपली उपस्थिती प्रार्थनीय.

20/09/2025
23/06/2025

आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी,त्याच्या गगनभेदी भरारी करिता आजच आपला प्रवेश निश्चित करा.
#माझीशाळा

लवकरात लवकर प्रवेशासाठी आपले नाव नोंद करा
20/06/2025

लवकरात लवकर प्रवेशासाठी आपले नाव नोंद करा

सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल, लोणारची उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम🌹लोणार-स्थानिक सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलची विद्या...
16/05/2025

सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल, लोणारची उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम

🌹लोणार-स्थानिक सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलची विद्यार्थिनी कु.हर्षदा राजू गाभणे दहावीच्या परीक्षेमध्ये 95.40 टक्के गुण मिळवत तालुक्यातून द्वितीय येण्याचा तर शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तसेच शाळेतून द्वितीय क्रमांकाचा मान कु.शरयू राजेंद्र जाधव हिला मिळाला असून तिला 94.80 गुण मिळाले आहे.यासोबतच कु.साक्षी गजानन थोरवे हिने 94.40 % गुण घेत शाळेतून तिसरा क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन करत सर्वांची मने जिंकली.
स. व. प. हायस्कूल,लोणार चा निकाल 92.18% लागला असून प्राविण्यश्रेणीत 11 विद्यार्थी असून प्रथम श्रेणीत 56 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीमध्ये 50 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत शाळेच्या या यशाबद्दल स.व.प.स्मारक शिक्षण समितीचे अध्यक्ष अॕड.भास्करराव सांगळे व संचालक यांनी गुणानुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर डोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक नंदकिशोर सांगळे शारीरिक शिक्षक गजानन वाघ व सहाय्यक शिक्षक विष्णू बचाटे, संतोष तनपूरे,रामेश्वर मोरे वरीष्ठ लिपिक, शरद जाधव कनिष्ठ लिपिक आदि उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक प्रवीण इंगळे यांनी केले.

स. व.पटेल हायस्कूल लोणार चl विद्यार्थी अभिषेक समाधान कुकडे ह्यास JEE NTA मध्ये 97.48%गुण प्राप्त झाले आहे त्याबद्दल त्रि...
19/04/2025

स. व.पटेल हायस्कूल लोणार चl विद्यार्थी अभिषेक समाधान कुकडे ह्यास JEE NTA मध्ये 97.48%गुण प्राप्त झाले आहे त्याबद्दल त्रिवार अभिनंदन.आपली उत्तरोत्तर प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🌹🥇

17/02/2025

सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल, लोणार येथे योग शिबीर.

आज सुलतानपुर येथे झालेल्या तालूकास्तरीय  #विज्ञान प्रदर्शनामध्ये स.व.प.हायस्कूल लोणारचा माध्यमिक गटात कु.सान्हवी प्रविण ...
30/12/2024

आज सुलतानपुर येथे झालेल्या तालूकास्तरीय #विज्ञान प्रदर्शनामध्ये स.व.प.हायस्कूल लोणारचा माध्यमिक गटात कु.सान्हवी प्रविण इंगळे व कु.रोहिणी शिवदास वराडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
#दोघींचेअभिनंदन.

*शाब्बास रोहित..... शाब्बास!*   आमच्या शाळेतील माझी विद्यार्थी रोहित प्रभाकर नेवरे रा.लोणार यांनी आपल्या वडिलांच्या वर्ष...
16/09/2024

*शाब्बास रोहित..... शाब्बास!*
आमच्या शाळेतील माझी विद्यार्थी रोहित प्रभाकर नेवरे रा.लोणार यांनी आपल्या वडिलांच्या वर्षेश्राद्ध निमित्त आपल्या पिढीतील तरुणांना एक आदर्श निर्माण करून शाळेतील गरीब आणि गरजू होतकरू 50 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी व शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडवून,शाळेची गोडी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने, आई वडीलांचे छत्र हरवलेल्या, आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात रहावे जेणेकरून जेव्हा रोहितचे वडील कोरोना काळात त्याला सोडून गेल्यावर त्याने जे अनुभवले. म्हणून इतरांना अशी आर्थिक झळ बसू नये म्हणून फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण काम करायचे या उद्देशाने त्याने सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप केले.
त्याच्या या कार्याची दखल घेत शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामेश्वर डोळे यांनी रोहित नेवरे यांचा शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी श्री.प्रवीण गुलाबराव इंगळे यांनी सूत्र संचालन केले तर प्रमुख उपस्थितीत पर्यवेक्षक श्री.नंदकिशोर सांगळे ,जेष्ठ शिक्षक गजानन वाघ तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

विद्याजंली 2.0 उपक्रमा अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनीना स्वयंम रक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यामध्ये सेन्साई सुनी...
25/08/2024

विद्याजंली 2.0 उपक्रमा अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनीना स्वयंम रक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यामध्ये सेन्साई सुनील चव्हाण यांनी मुलींना स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
#माझीशाळासुंदरशाळा #स्वच्छतामॉनिटर

  महाराष्ट्र वाचन चळवळ #माझीशाळासुंदरशाळा
24/08/2024

महाराष्ट्र वाचन चळवळ
#माझीशाळासुंदरशाळा

Address

Lonar

Telephone

+919921190006

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sardar Vallabhbhai Patel Highschool, Lonar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category