Mauli Shikshan Prasarak Mandal, Latur

  • Home
  • Mauli Shikshan Prasarak Mandal, Latur

Mauli Shikshan Prasarak Mandal, Latur जो जे वांछील तो ते लाहो !

माऊली विद्यार्थी विकास केंद्र लातूर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. याप्रसंगी संस्था सचिव श्र...
24/02/2025

माऊली विद्यार्थी विकास केंद्र लातूर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. याप्रसंगी संस्था सचिव श्री गंगाधर आरडले ,कोषाध्यक्ष श्री तानाजी बेवनाळे पाटील, प्राचार्या सौ. कविता आरडले,
उपप्राचार्या काळे भाग्यश्री,व संपूर्ण शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

माऊली शैक्षणिक संकुल, लातूरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न, स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माननीय श्री विनोदी जी कुचेरिया...
24/02/2025

माऊली शैक्षणिक संकुल, लातूरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न,
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माननीय श्री विनोदी जी कुचेरिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री शिवाजीराव काळे हे होते.स्नेहसंमेलनात विविध आकर्षक नृत्यांचा समावेश होता.

माऊली शैक्षणिक संकुल लातूर व पानगाव या दोन्ही विभागाची सहल सयाजी राजे वॉटर पार्क अकलूज या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न ...
21/01/2025

माऊली शैक्षणिक संकुल लातूर व पानगाव या दोन्ही विभागाची सहल सयाजी राजे वॉटर पार्क अकलूज या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली...सर्व विद्यार्थ्यांनी लेझर लाईट शो ,एडवेंचर लँड बोटिंग व वॉटर पार्क चा मनसोक्त आनंद लुटला...

मराठवाडा एज्युकेशन conclave 2024 25 मध्ये माऊली शिक्षण प्रसारक मंडळाने आपल्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचे प्रकटीकरण करण्यास...
21/01/2025

मराठवाडा एज्युकेशन conclave 2024 25 मध्ये माऊली शिक्षण प्रसारक मंडळाने आपल्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचे प्रकटीकरण करण्यासाठी एक दालन उघडले होते त्यात अनेक शिक्षण प्रेमी व्यक्तींनी व मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली तसेच मराठवाडा conclave समारोप समारंभात माऊली शिक्षण प्रसारक मंडळाला मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

*माऊली शैक्षणिक संकुल ,लातूर येथे वर्ल्ड मेडिटेशन डे साजरा*✍️🧘🏻‍♀️आज दि.23 डिसेंबर रोजी माऊली विद्यार्थी विकास केंद्र, म...
21/01/2025

*माऊली शैक्षणिक संकुल ,लातूर येथे वर्ल्ड मेडिटेशन डे साजरा*✍️🧘🏻‍♀️
आज दि.23 डिसेंबर रोजी माऊली विद्यार्थी विकास केंद्र, माऊली इंटरनैशनल माँडेल स्कूल ,लातूर येथे पहिला वर्ल्ड मेडिटेशन डे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यामध्ये विद्यार्थ्यांना उबाळे मँडम यांनी औडियो क्लिपच्या माध्यमातून लाईव्ह मेडिटेशन शिकवले. तसेच यात क्रिएटिव्ह टिमने टेबल डेकोरेशन तयार केले, व इयत्ता पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मेडिटेशन क्रिएटिव्ह पेंटिग्स , बटरफ्लाय, हैप्पीनेस इमोजी असे नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स तयार केले.याप्रसंगी पुजा मँडम यांनी विद्यार्थ्यांना मेडिटेशन बद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यालयाच्या प्राचार्या सौ.आरडले मँडम यांनी विद्यार्थ्यांना दररोज मेडिटेशन करण्याचे आवाहन केले. यावेळी उपप्राचार्या काळे मँडम संपूर्ण शिक्षक वृंद उपस्थित होते.
सर्वांनी आज मेडिटेशन करण्याचा अनुभव घेतला.

लातूर येथे आंबेजोगाई रोडवरील माऊली शैक्षणिक संकुल येथे प्रकल्प व विज्ञान प्रदर्शन उद्घाटन सोहळा संपन्न झाला, याप्रसंगी उ...
18/12/2024

लातूर येथे आंबेजोगाई रोडवरील माऊली शैक्षणिक संकुल येथे प्रकल्प व विज्ञान प्रदर्शन उद्घाटन सोहळा संपन्न झाला, याप्रसंगी उद्घाटक मा. श्री रमेश जी चिल्ले ( जेष्ठ कवी साहित्यिक )प्रमुख पाहुणे मा. श्री दिगंबर डि.गवारे (फ्रि लाईन आर्टिस्ट) यांची उपस्थिती होती.

18/12/2024
माऊली विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात संपन्न.प्रमुख पाहुण्या मा. सुलोचना बाहेती नोगजा मॅडम यांच्या शुभहस...
17/09/2024

माऊली विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात संपन्न.
प्रमुख पाहुण्या मा. सुलोचना बाहेती नोगजा मॅडम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक प्रकल्प सादर केले व उत्कृष्ट भाषणे करून उपस्थित त्यांची मने जिंकली.

*विद्यालयात गणेश चतुर्थी संपन्न*🙏🌹आज दि.07/9/2024 वार शनिवार रोजी गणेश चतुर्थी निमित्त माऊलीचा राजाची प्रथम दिवसीय आरती ...
07/09/2024

*विद्यालयात गणेश चतुर्थी संपन्न*🙏🌹
आज दि.07/9/2024 वार
शनिवार रोजी गणेश चतुर्थी निमित्त माऊलीचा राजाची प्रथम दिवसीय आरती संस्था सजीव श्री आरगले सर यांचे पिताश्री *माननीय श्री व्यंकटरावजी आरडले (पिताजी व मोठ्या आई)* यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या आरडले मॅडम,उपप्राचार्या काळे मॅडम , संपूर्ण शिक्षक वृंद ,कर्मचारी उपस्थित होते.

माऊली शैक्षणिक संकुल लातूर येथे आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात स्वातंत्र्...
15/08/2024

माऊली शैक्षणिक संकुल लातूर येथे आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात स्वातंत्र्यसेनानींच्या आठवणी व उत्कृष्ट म्युझिकल लेझीम कवायत सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री भावठाणकर सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी संस्था सचिव श्री आरडले सर प्राचार्य आरडले मॅडम, उपप्राचार्या काळे मॅडम सर्व शिक्षक वृंद पालक विद्यार्थी उपस्थित होते.

माऊली शैक्षणिक संकुल , लातूरची आषाढी दिंडी संपन्न. या आषाढी दिंडीमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर ...
17/07/2024

माऊली शैक्षणिक संकुल , लातूरची आषाढी दिंडी संपन्न.
या आषाढी दिंडीमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले तसेच या दिंडीमध्ये सर्व पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

06/02/2024

Address


Telephone

+18007773175

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli Shikshan Prasarak Mandal, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mauli Shikshan Prasarak Mandal, Latur:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share