DMI TEST

DMI TEST Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DMI TEST, kk towar , near shvji chok , new railway Road, Latur.

26/08/2020

लातूर जिल्ह्यातील व्यावसायिकांसाठी विशेष

लातूर जिल्ह्यातील खालील दुकानांमध्ये कॅशबॅक कुपन चे डिस्ट्रीब्यूटरशिप देणे आहे.

झेरॉक्स दुकान, सायबर कॅफे, CSC सेंटर, आधार केंद्र, E सेवा केंद्र, जनरल स्टोअर ,किराणा दुकान, टेलरिंग शोप, नाश्त्याचे हॉटेल, पान टपरी, कटिंग चे दुकान ,लॉन्ड्री, ब्युटी पार्लर, मोबाईल रिपेरिंग दुकान व रिचार्ज सेंटर, टू व्हिलर गॅरेज, कार वॉशिंग सेंटर, मेडिकल दुकान ,पिठाची गिरणी कॉफी सेंटर, मंगल सेवा केंद्र, स्वीट मार्ट, ट्युशन क्लासेस, शिक्षक, विमा प्रतिनिधी , सेवा उद्योग ,
घरगुती व्यवसायिक महिला ,इ. ठिकाणी डिस्ट्रीब्यूटरशिप द्यायची आहे.

वरील सर्व दुकान मालक दररोजचे 400/- ते 500/- रुपये कमवू शकतात

अधिक माहितीसाठी संपर्क करा
8459471571

26/07/2019

बाळाचे पाय पाळण्यात नाही तर
DMIT मध्ये दिसतात..
कसे...????
हे समजून घेण्यासाठी शिक्षक व जागृत पालक यांनी हा video नक्की पहा

*Ravi Tandale*
*Genius Brian DMI TEST Research Centre*
*Latur*
*8459471571*

आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या मुलाचं करिअर हा आई-वडिलांसाठी खूप संवेदनशील विषय असतोआजकाल आपल्या सर्वच समस्या अगदी टोका...
18/06/2019


आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या
मुलाचं करिअर हा आई-वडिलांसाठी खूप संवेदनशील विषय असतो

आजकाल आपल्या सर्वच समस्या अगदी टोकापर्यंत गेल्या आहेत. शिक्षण, नोकरी, लग्न, संतती, त्यांचे प्रश्न....यादी संपतच नाही.

*‘‘आमचा मुलगा ऐकतच नाही..’’*

‘‘आमची मुलगी अभ्यास करते, पण ऐन परीक्षेत काय होते कोणास ठाऊक..’’
‘‘इतका खोडय़ा करतो आहो हा.. रोज तक्रारी..’’
‘‘आमचा बंटी फारच हायपर आहे. कसे त्याला आवरावे तेच कळत नाही.’’
‘‘त्याच्या लक्षात कसे राहात नाही तेच कळत नाही.’’असे संवाद आपण रोज कुठे ना कुठे ऐकत असतो. त्यांची समस्या खरी असते. पण त्यावर नेमके काय करायचे तेच समजत नसते. खरेतर प्रत्येकामध्ये काही वैगुण्य तर काही चांगली वैशिष्टय़े निसर्ग बहाल करीत असतो. ती वेळीच ओळखता आली नाही तर पैसा, श्रम व मुख्य म्हणजे वेळ (वय) वाया जातो. म्हणजे कल्पना करा,
आपण मुलाला इंजिनीअरिंगला टाकले.
पहिल्या वर्षी एक दोन विषय गेले. दुसऱ्या वर्षी असाच मागे पडला आणि नंतर ते जमत नाही, दुसरे काय...असा विचार सुरू झाला तर? अट्टहास कोणाचा का असेना, पण गेलेली दोन वर्षे, त्याचेसाठी भरलेली गलेलठ्ठ फी आणि त्याने काहीका होईना पण घेतलेले श्रम हे भरून येणार? त्याहीपेक्षा त्याचा आत्मविश्वास खालावला तर? मग तर काय, त्यासाठी किती डॉक्टर्स, किती समुपदेशक.. काही विचारूच नका.
कुंडली किंवा इतर पारंपरिक साधनांनी याची उकल करता येते. पण मुलांचा कल ठरवण्यासाठी शास्त्रीय किंवा वैज्ञानिक अशी एक पद्धत आहे ...
हॉवर्ड गार्डनर हे एक नोबेल विजेते. मुले का मागे पडतात किंवा पुढे जातात याचा विचार करताना त्यांनी असा सिद्धांत मांडला की, ‘प्रत्येक मूल हे हुशार असतेच. फक्त प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या आघाडय़ांवर हुशार असते. काही मुले काही बाबतीत खूप पुढे असतात, पण तीच मुले काही बाबतीत फार मागे असतात.’याचा अर्थ प्रत्येक जिवामध्ये काही ना काही तरी गुणवैशिष्टय़े निसर्ग बहाल करीत असतो. ती वैशिष्टय़े वेळीच ओळखून त्याप्रमाणे त्याला किंवा त्याच्या पालकांना योग्य असे मार्गदर्शन करू शकलो तर खूप काही चांगले घडू शकते.गार्डनर यांनी अशी आठ वैशिष्टय़े नमूद केली आहेत. आपल्याकडे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यातले हे आयाम अगदी चांगल्या पद्धतीने सांगण्याचे काम त्यांनी केले आहे.

*आठ गुणवैशिष्टय़े*

*ती पुढीलप्रमाणे-१)स्वत:ची ओळख : काही मुलांचा आत्मविश्वास खूप दांडगा असतो. आणि त्याप्रमाणे ते आपापले मत मांडून त्याप्रमाणे स्वत:ला सिद्धही करीत असतात. अशी मुले कुठेही यशस्वी होऊ शकतात. कारण सगळे कसे आखीवरेखीव, शिस्तबद्ध आणि पूर्वनियोजित असे असते. अंतर्मुख होऊन ती योग्य विचार करायला सक्षम असतात.२) तार्किक : योग्य असा तर्कशुद्ध विचार करणे. आपले मत समोरच्याला पटेल असे मांडणे. ही मुले नियोजन क्षेत्रात, सॉफ्टवेअर डिझाइनिंग, मार्केटिंग अशा क्षेत्रात जाऊ शकतात.३) बहुभाषिकत्व : भाषा चांगली असणे, प्रभावी असणे, एकापेक्षा अनेक भाषांमध्ये पारंगत असणे या गोष्टींची आजच्या जगात गरज आहे.४) निसर्गाविषयी : निसर्गाची आवड, जाण, ओढ या गोष्टी काही जणांना उपजत असतात. त्यांना प्राणी, पक्षी, वृक्ष व त्यांची भाषाही अवगत असते.५) सामाजिक जाण : काही मुले एकलकोंडी असतात तर काहींचे मित्रमैत्रिणींशिवाय पान हलत नाही. इतरांच्या भावना समजून घेणे, त्यांना वेळोवेळी मदत करणे हेही एक बुद्धिमत्तेचे लक्षण सांगितले आहे. यांची भाषाजाण चांगली असेल तर साहित्यिक होऊ शकतात. तर निसर्गजाण चांगली असेल तर चांगले समाजसेवक तयार होतात.६) दृश्यात्मक जाण : दृश्य अशा सर्व गोष्टींचे ज्ञान असणे हे एक कौशल्य आहे. रंग, रचना, आकार, चित्र, शिल्प इत्यादींची जन्मत: जाण असणे हे एक उत्तम कलाकाराचे लक्षण असते.७) शारीरिक कौशल्य : काही मुले ही कायम मैदानात दिसतात. त्यांना शालेय अभ्यासही घरापेक्षा मैदानातच करायला आवडतो. खरे तर अभ्यासापेक्षा खेळातच त्यांना रस जास्त असतो. चपळता, उत्साह, गती, शारीरिक नियंत्रण यामुळे त्यांना खेळाचीच जास्त आवड असते.८) संगीतकौशल्य : जणू मागच्या जन्मात कोणीतरी महान गायक असावा आणि राहिलेली संगीत सेवा पूर्ण करायला आत्ता जन्म घेतला असावा अशी ताल-स्वर-लय यांची जाण काही मुलांना लहानपणीच असते. अशांना संगीतात करिअर करू न देता अभ्यासात मागे पडला म्हणून फटके मारत बसलो तर काय होईल*?अशा या अष्टपैलूंचा विचार त्यांनी मांडला. यावर बऱ्याच संशोधनाअंती एक पद्धत विकसित केली गेली. त्याला आजकाल डीएमआयटी *(DMIT – Dermatoglyphics Multiple Intelligence Tests)* या नावाने संबोधले जाते.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
http://www.dmitestlatur.blogspot.com

*रवी तांदळे सर*
*Tandale Education &DMI Test Research Center Latur*
8459471571

12/06/2019
05/06/2019

मित्रांनो, नमस्कार...🙏🏻🙏🏻🙏🏻
*खास.. जाग्रुत पालकांसाठी....
महाराष्ट्रात इ.१० वी ,१२ वी चा निकाल📄 जाहीर होत आहे.उद्या पासुन सर्व पालक ११ वी तसेच इतर ठीकाणी ॲडिमिशन साठी धाव🏃 घेतील पण त्या आधी खालील प्रश्नांचा एकदा विचार करा..??

*प्र.१) तुम्ही तुमच्या अपुर्ण इच्छा जबरदस्ती तुमच्या मुलांकडुन पुर्ण तर करत नाहीत ना ??

*प्र.२) मुलांच्या आवडी प्रमाणे निर्णय घ्यायला मुले तेवढी जाणकार व सक्षम आहेत का ??

*प्र.३) स्कोप नुसार करियर निवडुन भविष्यात तुम्ही निवडलेल्या करियर चा स्कोप कमी झाला तर???

*प्र.४) तुम्ही जे करियर निवडत आहात ते खरच त्या मुलासाठी उत्तम आहे का ??
*प्र.५) लाखो रुपये 💸💷शिक्षणास खर्च करत आहात पण तो योग्य ठिकाणी करत आहात का ???
या सगळ्यावर उपाय फक्त एकच आहे..
ते म्हणजे तुमच्या मुलांची जन्मजात गुण तपासणी (DMI Test ( करुन घेणे..जी की पुर्णपणे वैज्ञानिक आहे..अर्थात तुम्ही या ब्रेन टेस्ट 😳द्वारे जाणुन घेवु शकता तुमच्या मुलांची जन्मजात क्षमता 🔼🔽व त्यांचे योग्य करियर....✅
तर उशिर करता मुलांच्या उज्वल भविष्यासाठी...आजच निर्णय घ्या व
संपर्क करा .

"कारण मुलांचे योग्य करियर त्यांचे पुर्ण जीवन बदलु शकते"..

*Ravi Tandale*
*Tandale education & DMIT research centre Latur* *Maharashtra*
*8459471571*

हे सगळे थांबायला हवेविद्यार्थ्यांची वर्गवारी ‘इंजिनीअर, डॉक्टर वा अपयशी’ या तीनच प्रकारांमध्ये करण्याची पालकांची मानसिकत...
05/06/2019

हे सगळे थांबायला हवे

विद्यार्थ्यांची वर्गवारी ‘इंजिनीअर, डॉक्टर वा अपयशी’ या तीनच प्रकारांमध्ये करण्याची पालकांची मानसिकता वाढतच चालली आहे. यामुळे आपल्या आयुष्यालाच काही अर्थ नाही या टोकाच्या नकारात्मकतेकडे अनेक मुलांचे विचार जात आहेत. तेलंगणामध्ये बारावीत नापास झालेल्या २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने विद्यार्थ्यांच्या करिअरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यानिमित्ताने पालकांनी आपली इच्छा मुलांवर न लादता त्यांची आवड व बौद्धिक कुवतीनुसार त्याला शिक्षण घेऊ देणेच कसे योग्य, याची चर्चा करणारा लेख.

तेलंगणात बारावीच्या निकालानंतर एकापाठोपाठ एक अशा २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. ज्यांनी आपली मुलं गमावली त्यांच्या दुखाची तीव्रता नक्कीच खूप जास्त आहे, पण तरीही आज ही काळजी, हे दुख आणि हा प्रश्न या बाबी केवळ त्यांच्यापुरत्याच सीमित राहिलेल्या नाहीत. परीक्षेतील यशालाच सर्वस्व समजणारी आणि त्या दृष्टीनेच प्रगतिपुस्तकांत वा गुणपत्रिकांत व्यक्तिमत्त्व शोधणारी पालकांची, शिक्षकांची, शाळांची आणि अनेकदा मुलांची स्वतचीच मानसिकता हा आज प्रत्येक घराच्या दारापाशी दबा धरून बसलेला प्रश्न आहे. पालकांच्या आणि शिक्षकांच्याही सुजाणतेला हे मोठे आव्हान आहे. या समस्येचे मर्म कळाले तर जिवाशी खेळणाऱ्या अशा कठीण गाठी मुलांच्या मनात मुळात बसणारच नाहीत आणि चुकून बसल्या तरी त्यांची उकल करण्याचे मार्ग आपोआपच त्यांना उपलब्ध होतील.

मुलांच्या विचारांना दिशा देणारा घरातील संवाद आणि त्यांना ‘काय येत नाही’ हे शोधण्यापेक्षा ‘काय येते’ याचा माग घेणारे शाळांमधील शिक्षण या दोन खांबांवरच मुलांच्या आनंदी आणि अर्थपूर्ण शिक्षणाचा मोठा पूल तोलला जात असतो. हे दोन आधार बळकट असतील तरच देश घडवणारी विद्यार्थ्यांची प्रत्येक पिढी सुदृढ निपजते. कोणत्याही परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही तर आपले आयुष्यच कवडीमोलाचे समजून ते संपवायचे असा विचार ज्या समाजात विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग सातत्याने करतो आहे तो समाज निरोगी म्हणता येणार नाही.

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासताना आणि नंतर गुणपत्रिका तयार करताना तेलंगणा राज्याच्या उच्च माध्यमिक मंडळाने या वर्षी अभूतपूर्व घोटाळे केले. अकरावीत शेकडा नव्वद ते शंभर गुण मिळवणाऱ्या अनेकांना बारावीत आपण नापास झालो आहोत वा आपल्याला अगदीच कमी गुण मिळाले आहेत याचा मोठा धक्का बसला. सग़ळीकडून दबाव वाढला तेव्हा या मूल्यांकन प्रक्रियेत मोठा गोंधळ झाल्याचे सरकारने मान्य केले आणि नापास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या जातील असा निर्णय जाहीर केला, पण तेव्हा वेळ टळून गेली होती. अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे आपले भविष्यच आता संपले या धक्क्यातून न सावरता आल्याने मुलांनी आपले आयुष्यच संपवून टाकले. आपणच निर्माण केलेल्या शैक्षणिक संस्कृतीच्या या धोकादायक प्रवाहाची समाजाचे सर्वच स्तर आज शिकार ठरत आहेत.

तेलंगणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेला परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेचा गलथानपणाच केवळ कारणीभूत आहे असे समजणे याचा अर्थ या प्रश्नाचे खरे आकलनच आम्हाला झाले नाही असा आहे. यंत्रणेतील हा गलथानपणा हे या घटनेचे एक कारण आहे, पण एकमात्र कारण नक्कीच नाही. मुळात परीक्षेतील या तथाकथित अपयशाने कोलमडून पडेल इतकी कमकुवत मानसिकता एका रात्रीत वा एका घटनेने तयार होत नाही. आयुष्याकडे ‘यश दाखव वा हार स्वीकार’ या केवळ दोनच अंगांनी बघण्याची सक्ती हे या कमकुवततेचे खरे कारण. अकरावी-बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावरचा असह्य़ ताण, अपयशाची भीती, किंचितही रुची नसलेल्या विषयात दबावाखाली अभ्यास करताना होणारी त्यांची दमछाक, पुढे इंजिनीअिरगला आल्यानंतर न झेपणारा अभ्यासक्रम, मागे पडत जाण्यातील निराशा आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे आपल्या आयुष्यालाच काही अर्थ नाही या टोकाच्या नकारात्मकतेकडे जाणारे त्यांचे विचार या सगळ्या गोष्टी मी गेली २० वष्रे खूप जवळून अनुभवतोय. वाढणारी लोकसंख्या, दर्जेदार शिक्षण देणाऱ्या मोजक्याच संस्था, त्यातून अपरिहार्यपणे निर्माण झालेली पराकोटीची स्पर्धा आणि मुलांच्या स्थिर व संपन्न आयुष्याची स्वप्ने पाहणारी पालकांची ‘चाकोरीबद्ध’ मानसिकता हे चारही घटक स्वतंत्रपणे पाहिले तर चूक नाहीत, पण मुलांच्या मानसिकतेवर पडणारा त्यांचा एकत्रित प्रभाव मात्र चिंताजनक आहे. हे चारही घटक नजीकच्या काळात बदलतील याची सुतरामही शक्यता आज दिसत नाही. पण या घटकांच्या नकारात्मक प्रभावाला पुरून उरणारी ऊर्जा पालक आणि शिक्षक मुलांच्या मनात नक्कीच निर्माण करू शकतात. गरज आहे ती आपणच मारलेली ही गाठ डोळसपणे उकलण्याची आणि आपल्या व मुलांच्याही दृष्टिकोनात संवेदनशील बदल करण्याची.

मुलाची अजिबात इच्छा नसताना व त्याची ती क्षमताही नसताना त्याने इंजिनीअरिंगलाच गेले पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या एका पालकाला माझ्या सहकारी शिक्षकाने मार्मिक प्रश्न विचारला, ‘तुमचे तुमच्या मुलावर प्रेम आहे की त्याने जे व्हावे असे तुम्हाला वाटते त्याच्यावर तुमचे प्रेम आहे?’ पालकांच्या मनातील हा ‘भ्रम’ हा या समस्येचे खरे उगमस्थान आहे. खलील जिब्रान हा कवी त्याच्या विशिष्ट अशा गद्य-कवितांसाठी प्रसिद्ध होता. शंभर वर्षांपूर्वीच त्याने पालक आणि मुलांच्या संबंधातील ताण-तणावाची कारणमीमांसा करताना लिहिले होते-‘‘Your children are not your children. They are the sons and daughters of Lifels longing for itself. They come through you but not from you, and though they are with you yet they belong not to you… तुमची मुले ही तुमच्याच मनाप्रमाणे बनतील असा हट्ट करू नका आणि तुमची स्वप्ने त्यांच्या डोळ्यांत वाचण्याचा वृथा प्रयत्नही करू नका!’’

तेलंगणा व आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही समस्या अधिक तीव्र बनली आहे कारण विद्यार्थ्यांची वर्गवारी ‘इंजिनीअर, डॉक्टर वा अपयशी’ या तीनच प्रकारांमध्ये करण्याची मानसिकता वर्षांनुवष्रे या ठिकाणी वाढतच चालली आहे. गेल्या २०-२५ वर्षांत इंजिनीअिरगच्या क्षेत्रातील बदल, संधी आणि त्यातून मिळणारी संपन्नता हे सगळे डोळे दिपवून टाकणारेच आहे. आपल्या मुलांच्या डोळ्यात पालक साहजिकच हीच स्वप्ने पाहतात. याचाच फायदा उठवीत शाळाही तशीच जाहिरात करतात. शाळा कमी पडल्या तर कोचिंग क्लासेस आहेतच.

विद्यार्थ्यांची नसíगक क्षमता, त्याचा कल, विशिष्ट विषयातील त्याची रुची या सर्वाचा एकत्रित विचार करून व्यक्तिमत्त्व विकासाच्या सहज संधी त्याला उपलब्ध करून देणे हे खरे तर शाळा आणि शिक्षकांचे मुख्य काम असायला हवे. त्याच दृष्टीने पालकांशी सुसंवाद साधून ही प्रक्रिया अधिक आनंददायी करण्याचा स्वाभाविक प्रयत्न असायला हवा. अभ्यासेतर उपक्रमांमधला मुलांचा उत्स्फूर्त सहभाग त्यांना स्वतच्या खऱ्या क्षमतांची ओळख पटविण्यास मदत करतो. या आत्मविश्वासाच्या बळावर ही मुलं कठीण विषयांचाही मग जिद्दीने अभ्यास करतात. यातील प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे. त्या वगळून मुलांना एकदम स्पध्रेमध्ये ढकलल्यानेच समस्येचा गुंता अधिकच वाढतो.

पुरेसा आत्मविश्वास नसणारी, स्पध्रेलाच सर्वस्व समजणारी आणि त्यातील अपयश जिव्हारी लावून घेणारी मुलं मग एका विचित्र मानसिक आवर्तनात सापडतात. अभ्यासात हुशार असणारी मुलंही आपल्याला मिळणारे गुण वा श्रेणी म्हणजेच ‘आपण’ आहोत असे समजून आयुष्याला अधिकाधिक संकुचित करतात. ‘निरुपयोगी विद्यार्थी’ या संकल्पनेवर हाडाचा शिक्षक कधीच विश्वास ठेवत नाही. प्रत्येकातील उत्तम गुण हेरून त्या गुणांच्या वाढीसाठी अवकाश उपलब्ध करून देण्याचे काम शिक्षकाचे. पण आज अशा शाळा आणि असे शिक्षक मुळात पालकांना चालणार आहेत का आणि पालकांची इच्छा असली तरी अशा शाळा आणि असे शिक्षक खरोखरच त्यांना मिळणार आहेत का हे दोन्ही प्रश्नच मुळात एकमेकांतून निर्माण झाले आहेत. शालेय जीवनात प्रत्येक इयत्तेत आपला पाल्य पहिला येणे याची जाहिरात करणे किंवा आपल्या मुलांना मिळणारी टक्केवारी कौतुकाने सांगणे यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रत्येक वर्षी नव्याने कोणती भर पडली आहे याचा विचार व चर्चा करणे अधिक महत्त्वाचे असते.

इंजिनीअिरग किंवा मेडिकलच्या अभ्यासासाठी आवश्यक असणारे गणित आणि शास्त्र हे विषय सर्वच विद्यार्थ्यांना समजायला सोपे असतील असे नाही. त्यात गती असणे हे जसे सहजपणे स्वीकारले जाते तसा कुणाला त्या विषयांचा तिटकारा असणेही स्वाभाविक समजले पाहिजे. या विषयांत मिळणारे गुण हे संपूर्ण आयुष्यालाच आकार देतात हा भ्रम आहे हे ठासून सांगितले पाहिजे. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शक्य तितक्या सुलभतेने हे विषय शिकवले पाहिजेत आणि मुलांना त्यात रुची वाटेल यासाठी शक्य ते सर्व प्रयत्नही केले पाहिजेत. भीती न दाखवता त्या विषयांची उपयोगिता सांगितली पाहिजे आणि त्यात अधिक गुण मिळावेत म्हणून उद्युक्तही केले पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढे सर्व प्रयत्न करूनही त्या विषयात आवड निर्माण होत नसेल तर अकरावी-बारावीच्या टप्प्यावर ते विषय सोडण्याचा पर्याय उपलब्ध होताच तसे करण्याचे व वेगळी वाट निवडण्याचे स्वातंत्र्यही मुलांना दिले पाहिजे.

विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेऊन बनवलेला दहावीपर्यंतच्या वर्गासाठीचा सक्तीचा व समान अभ्यासक्रम आणि विषयांच्या निवडीला भरपूर वाव असणारा व संधींच्या विविध वाटांकडे घेऊन जाणारा पदवी अभ्यासक्रम या दोन्हींच्या मध्ये ‘+२’ नावाचा एक िपजरा आपल्याच शिक्षणव्यवस्थेने ठेवला आहे. आजच्या काळातील स्पध्रेची अपरिहार्यता समजून घेता या टप्प्यावरील परिश्रमांना आज तरी कोणताच पर्याय उपलब्ध नाही. पण आवडीच्या विषयातील परिश्रम ओझे बनत नाहीत हे लक्षात ठेवून विषय निवडताना मुलांचा कल प्रथम पाहिला पाहिजे. परिश्रमाचे यश आणि त्याच्या मर्यादाही मुलांना सांगितल्या पाहिजेत. पालक म्हणून प्रथम त्या आपल्याही लक्षात आल्या पाहिजेत.

अकरावी-बारावीच्या या दोन वर्षांत अधिक परिश्रमांना व चुरशीच्या स्पध्रेला सामोरे जाताना तो सध्याच्या शिक्षणपद्धतीचा अपरिहार्य नसला तरी आवश्यक भाग आहे आणि तेवढय़ापुरते त्याचे महत्त्व आहे हे आवर्जून मुलांना सांगितले पाहिजे. देशातील हजारो अभियांत्रिकी महाविद्यालयांतून दरवर्षी बाहेर पडणाऱ्या पदवीधारकांची संख्या आणि उद्योगांना हवे असणारे कौशल्य अंगी बाणवलेल्या पात्र उमेदवारांची संख्या यातील प्रचंड तफावत सांगणारे नॅसकॉमचे अहवाल नेमक्या याच वैगुण्यावर बोट ठेवतात. चेहरा हरवलेली एक पिढी अनेक मानसिक प्रश्नांशी सामना करीत, कण्हत-कुंथत शिक्षण पूर्ण करते आणि या प्रवासात जगण्याचा आनंदच हरवून बसते.

हे सगळं थांबवायला हवं.

पालक म्हणून प्रथम आपला दृष्टिकोन बदलणे आणि मुलांना या स्पध्रेपलीकडेही असणारे अर्थपूर्ण आयुष्य दाखवणे हेच या समस्येचे शाश्वत उत्तर आहे!
Writer -Anown.......
*Ravi Tandale*
*DMI Test*
*DMIT trainer, counselor expert*
*Latur 8459471571*

😄Good morning all of you 😄सुरतमध्ये कोचिंग क्लासेसच्या बिल्डिंगला आग लागली.जीव वाचवण्यासाठी म्हणून मुलांनी चौथ्या माळ्या...
27/05/2019

😄Good morning all of you 😄

सुरतमध्ये कोचिंग क्लासेसच्या बिल्डिंगला आग लागली.

जीव वाचवण्यासाठी म्हणून मुलांनी चौथ्या माळ्यावरुन उड्या मारल्या त्यात १५ मुलं गेली.

ही घटना थोड्या वेगळ्या अनुषंगाने पाहिला हवी.

त्या मुलांनी उड्या का मारल्या?

कारण ह्या परिस्थितीचा सामना कसा करायचा ह्याची कल्पना त्यांना नव्हती.

आपल्याकडे शाळेत आता तर अगदी १२वी पर्यंत पीटी/पीई नावाचा निरर्थक विषय असतो.

ज्याचे तास बहुतेक वेळा इतर शिक्षकच आपला सिल्याबस पुर्ण करण्यासाठी घेतात.

ह्या अश्या विषयां पेक्षा आपात्कालीन परीस्थिती कश्या हाताळायच्या ह्याचे शिक्षण द्यायला हवे.

आग, भुकंप, पुर, बलात्कार, महिलांवरील अत्याचार, गोळीबार ह्यांसारख्या आपात्कालीन परिस्थितींना कसं हाताळायचं. त्याचबरोबर हार्ट पेशंट, बेसिक फर्स्ट एड ह्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग द्यायला हवं

आणि

ह्या विषयांचे तास कोणत्याही इतर विषयांच्या शिक्षकांनी न घेता मॉक ड्रिल घेण्यात यावेत.

बर्‍याच ठिकाणी आग आटोक्यात आणायची उपकरणं असतात पण ती वापरायची कशी हेच नेमकं कोणाला माहिती नसतं.

ही उपकरणं हाताळण्याचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग मुलांना द्यायला हवे. आग लागली म्हणून उडी मारणं हा पर्याय नाही पण ह्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा हे कळल्या न मुळे आजची दुर्घटना घडली आहे.

शिक्षण पद्धतीत बाकी कोणता नाही पण हा बदल केला तर बरं होईल.

*भारताला गरज शिक्षण सुधारणेची*

27/05/2019

Address

Kk Towar , Near Shvji Chok , New Railway Road
Latur
413515

Telephone

+918459471571

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DMI TEST posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share