Balbhavan Aarvi Latur

Balbhavan Aarvi Latur "Every child is a special child. We belive in the child learns naturally. Learning is a natural process.

We give freedom & opportunity to the child for growing naturally with his own natural quality."

आज श्री. गणेशजी नरारे सर आणि मॅडम यांचा लग्नाचा वाढदिवस.*"कोणत्याही स्वरूपाच्या यशामध्ये व्यासपीठामागील मंडळी कायम दुर्ल...
23/04/2024

आज श्री. गणेशजी नरारे सर आणि मॅडम यांचा लग्नाचा वाढदिवस.

*"कोणत्याही स्वरूपाच्या यशामध्ये व्यासपीठामागील मंडळी कायम दुर्लक्षित असतात; एव्हाना दुर्लक्षित राहून जातात."*
*बालभवनचा प्रवास खऱ्या अर्थाने कोरोना काळातच सुरू झाला. ज्यावेळी माणूस म्हणून आम्ही जगू की मरू अशी परिस्थिती असताना मोठ्या दिमाखात बालभवनची उभारणी झाली. कोरोना काळातील अनेक पातळीवरील अविश्वासाच्या वातावरणात बालभवनच्या उभारणीमध्ये कायम पडद्यामागची खंबीर कलाकाराची भूमिका बजावणारे सन्माननीय नरारे दाम्पत्याचा उल्लेख मोठ्या अभिमानाने करावा वाटतो. अतिशय विश्वासाने लातूर येथील आर्वी भागांमध्ये असलेल्या बालभवनच्या क्रीडांगणासाठी अतिशय मोठ्या मनाने जागा उपलब्ध करून देण्यात नरारे पती-पत्नी यांनी मोठी भूमिका बजावली आहे. अशा या अनेक पडद्यासमोरील आणि पडद्यामागील नायकांमुळे त्यांच्या भरभरून दिलेल्या साथीमुळे बालभवन दोन शाखांच्या पातळीवरून बालशिक्षणामध्ये मोठ्या दिमाखात पालकांच्या विश्वास पात्र उतरून तसेच बालशिक्षण तज्ञ आणि मार्गदर्शकांच्या साथीने शिक्षण क्षेत्रात काम करीत आहे. नरारे दाम्पत्याच्या या भरीव योगदानासाठी उच्चतम जीवन विकास प्रतिष्ठान आर्वी लातूर ही संस्था आपल्या कायम ऋणात राहणंच पसंत करेल! अशा या व्यक्तिमत्त्वाचा आज लग्नाचा वाढदिवस. आजच्या या मंगलदिनी बालभवन परिवारातर्फे आपणास खूप खूप शुभेच्छा. आपले वैवाहिक जीवन सातत्याने असेच रंगतदार होऊन आपल्या जीवन शैलीचा सुगंध मित्रपरिवारामध्ये दरवळत राहो आणि प्रेरणादायक होवो; हीच आजच्या या मंगलदिनी मनोकामना. खूप खूप शुभेच्छा.*

*Happy Anniversary Sirji & Madamji*

बंकट पवार
बालभवन परिवार
8668773120
लातूर

*बालभवनच्या सर्व सुजाण पालकांना, ताई-दादांना सस्नेह नमस्कार.**शैक्षणिक वर्ष 2019- 20 पासून बालभवन परिसरातील त्याचबरोबर आ...
31/01/2024

*बालभवनच्या सर्व सुजाण पालकांना, ताई-दादांना सस्नेह नमस्कार.*

*शैक्षणिक वर्ष 2019- 20 पासून बालभवन परिसरातील त्याचबरोबर आर्वी गाव, सरस्वती नगर, सोमवंशी नगर, नांदगाव, लातूर जिल्हा कारागृह परिसर, साई, आराजखेडा, नवीन रेणापूर नाका, धायगुडे नगर, बनसोडे हॉस्पिटल परिसर येथील सर्व पालकांनी दाखवलेल्या मोठ्या विश्वासामुळे, उच्चतम जीवन विकास प्रतिष्ठान आर्वी लातूर द्वारा संचलित, "बालकांच्या सर्वांगीण विकासाची पहिले पाऊल...!" बालभवन उद्या दिनांक- 01 फेब्रुवारी 2024, वार- गुरुवार रोजी तिसरा वर्धापन दिन साजरा करीत आहे.*

*मोठ्या दिमाखात बालभवन परिवार चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि विश्वासाच्या पाठबळावर उद्याचा सोहळा संपन्न होणार आहे.*

*सन्माननीय श्री. दयानंदजी पाटील साहेब - सहाय्यक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल, पोलीस विभाग, जिल्हा लातूर यांच्या शुभहस्ते उद्याच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन होत आहे. "माहिती तंत्रज्ञानाच्या जगात तसेच सोशल मीडियाच्या वावटळीमध्ये बालिका, मुली, विद्यार्थीनी, महिला या सर्वांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी! याबद्दल साहेब मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर स्वतःचा शालेय जीवन ते आजचे पोलीस प्रशासन विभागातील व्यवसायिक जीवन हा सर्व प्रवास साहेब शब्दांकित करणार आहेत." आपण सर्व पालकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.आपण सर्वजण या सोहळ्यासाठी निमंत्रित आहात.*
*धन्यवाद.*

मुख्याध्यापिका
बालभवन

🌷🙏🏻

16/12/2022

*कृतीपाठ - सूक्की मोड मटकीची उसळ बनवणे*

*विषय* - कार्यानुभव
*घटक* - सूक्की मोड मटकीची उसळ बनवणे
*वर्ग* - अभ्यासगट 1 सर्व मुले
*संचलन* - रेखा ताई
*साहित्य* - मोड आलेली मटकी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मीठ, तिखट, , बतई, मोठा चमचा,

*फायदे*
🟣 कामाचा अनुभव मिळतो.
🟡 निरीक्षण क्षमता वाढते.
🔵 वस्तू, पदार्थांची ओळख होते.
🟢 स्वतः केलेल्या कामाचा आनंद मिळतो.
🟠 स्वावलंबी होण्यास मदत होते.
🟤 उसळ करण्याची कृती समजते.👇👇

*दर्गा क्षेत्रभेट -3*-------------------------आज दिनांक 29 सप्टेंबर  2022 गुरूवार रोजी           *बालभवन*   'आनंदी विश्व...
29/09/2022

*दर्गा क्षेत्रभेट -3*
-------------------------
आज दिनांक 29 सप्टेंबर 2022 गुरूवार रोजी
*बालभवन*
'आनंदी विश्व, आनंदी मन '
सेमी माध्यम
या आपल्या बालवाडीत क्षेत्रभेट संपन्न झाली. मुलांना दर्ग्यामध्ये नेवून पुढील घटकांना अनुसरून विविध माहिती दिली.

👉 दर्गा हे ठिकाण मंदिरासारखंच आहे. येथे देवासाठी प्रार्थना केली जाते.
👉आपण सर्वजन देवाच्या प्रार्थनेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातो (दर्गा,मंदिर,चर्च) पण सर्वांचा देव एकच आहे.
👉 वेगवेगळ्या धर्मामध्ये देवाला प्रार्थना करण्याची पध्दत जरी वेगळी असली तरी त्यामागचा भाव, श्रध्दा ही सारखीच असते.
👉 अल्लाह, गॉड, देव हे एकच आहेत .

मुख्याध्यापक
बालभवन
आनंदी विश्व,आनंदी मन

आज 15 ऑगस्ट 2021          *बालभवन**आनंदी विश्व, आनंदी मन*       *आर्वी, लातूर*या आपल्या बालवाडीत मोठ्या उत्साहात 75 वा स...
15/08/2021

आज 15 ऑगस्ट 2021
*बालभवन*
*आनंदी विश्व, आनंदी मन*
*आर्वी, लातूर*
या आपल्या बालवाडीत मोठ्या उत्साहात 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
उच्चतम जीवन विकास प्रतिष्ठान, आर्वी, लातूर संस्थेचे मार्गदर्शक श्री. माणिकराव लिंबराज पवार यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यासाठी *उज्वल* संस्थचे संचालक श्री. संतोष पवार तसेच सौ. कौशल्या पवार, समृद्धी पवार, बालभवनच्या मुख्याध्यापिका संजीवनी पवार उपस्थित होत्या.
🌷🙏🏻

*संजीवनी पवार*
एम. ए. मराठी,
डी. एड., डी. एस. एम.
*मुख्याध्यापिका*
*बालभवन*
*आनंदी विश्व, आनंदी मन*
*आर्वी, लातूर*

*संपर्क - 8668708486*
*8668773120*

🌸🌱☘️🙏🏻🌷🌱☘️🌸

08/04/2021

*दिनांक - 08-04-2021*
*वार --- गुरुवार*

सर्व पालक,
मित्रपरिवार यांना
सस्नेह नमस्कार.

COVID-19 प्रादुर्भाव असलेल्या या काळात आपलं
*बालभवन*
'आनंदी विश्व, आनंदी मन'
~~~~~~~~~~~~~
खास छोट्या दोस्तांसाठी विविध विषयांच्या माध्यमातून ज्ञानाबरोबरच मनोरंजन करणारे मजेशीर व्हिडीओ घेऊन येत आहे.
आजचा विषय आहे.
अंकज्ञान.

अंकज्ञानातील गणनपूर्व अनुभव म्हणजेच मोजणे संबंधित क्षमता विकसित करण्यासाठी *वस्तूभाषेतून अंकांची ओळख* हा एक महत्वाचा भाग आहे.

*विषय* - अंकज्ञान
*घटक* - मोजणे
*पद्धती* - वस्तूभाषा
*सादरीकरण* - संजीवनी पवार
*सहभाग* - अवीर पवार
- देवांश जाधव *स्थळ* - बालभवन, आर्वी, लातूर

*वस्तूभाषेतून 'मोजणे' कृतीसाठी आवश्यक गोष्टी*

🌷 वस्तू चिंचोके, गोट्या, चमचे, वाट्या, ग्लास इत्यादींपैकी एक.

🌷 स्पष्ट उच्चारात एकदा अथवा गरजेनुसार 1 ते 10 अंक मोजून दाखवणे.

🌷 व्हीडिओतील कृतीप्रमाणे गरजेनुसार ही कृती करून दाखवणे; व मोजणे ही कृती करून घेणे.

*अंकज्ञानात मोजणे या कृतीसाठी 'वस्तूभाषेचे' फायदे*

🌳 विविध वस्तूंवर आधारित मोजण्याची मजेशीर क्रिया, अंकज्ञान व गणिताविषयी आवड निर्माण करते.

🌳 वस्तूभाषेतून मोजणे ही कृती घेतल्याने अंकांची ओळख होण्यास मदत होते.

🌳 अंकाची गणिती भाषा शिकण्याच्या सिद्धांतानुसार 'ध्वनी-वस्तू-चिन्ह' माध्यमातून ओळख होते.

🌳 अंक लेखनपूर्व आवश्यक भक्कम तयारी होते.

🌳 वस्तूंच्या मदतीने मोजणे ह्या कृतीतून अंक व चिन्हे यांची एकत्रित ओळख सहजपणे करून देता येते.

🌳 सर्वसाधारणपणे अवघड वाटणाऱ्या गणित या विषयाविषयीची गोडी निर्माण करून पाया मजबूत करता येतो.

*पालकांना विनंती*
घरातील उपलब्ध वस्तू जसे चिंचोके, चमचे, वाट्या, ग्लास, प्लेट यांचा वापर करून, अंकज्ञानातील वस्तूभाषा पद्धतीने मोजणे ही कृती करून घ्यावी.
30-60 सेकंदाचा व्हीडिओ करून बालभवनच्या whatsapp group वर पाठवावा.

🙏🏻🌷
*उच्चतम जीवन विकास प्रतिष्ठान, आर्वी, लातूर*
संचलित,
*बालभवन*
*'आनंदी विश्व, आनंदी मन'*
आर्वी, लातूर

*मुख्याद्यापिका*
संजीवनी पवार
D.T.Ed. - DSM
M.A.Marathi

संपर्क -
*8668708486*
*8668773120*

*बालभवनला*
*एकवेळ अवश्य भेट द्या*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*follow us*
*youtube* - बालभवन आर्वी, लातूर
*whatsapp* - बालभवन आर्वी, लातूर
*page* - बालभवन आर्वी, लातूर
*facebook* - Ujval Aarvi Latur
*E- mail* - [email protected]
🌱🌸🌱🌸🌱🌸🌱

Address

KamalKaushalya, P. No. 26, Bembalkar Nagar, Near Agrawal Industries, Beside Of Aarvi Grampanchayat, Sai Road, Aarvi
Latur
413512

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 3pm
Sunday 10am - 12pm

Telephone

+918668773120

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balbhavan Aarvi Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Balbhavan Aarvi Latur:

Shortcuts

Share

Category