Ignite your Minds

Ignite your Minds आजच्या परिस्थितीमध्ये जीवन कौशल्याच?

20/10/2024
24/09/2024

केपु. कर्नाटकातल्या अद्यानाडकाजवळचं एक छोटं गाव. एक माणूस तिथं सुपारी आणि नारळाच्या बागेत मजुरी करत होता. स्वतःचं ना घर ना जमीन. पण त्याचं समर्पण आणि प्रामाणिकपणा बघून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी 1978 मध्ये त्याला 2 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन एका टेकडीच्या माथ्यावर होती. पूर्ण नापीक आणि ओसाड. पाण्याचा मागमूसही नाही. आपल्यासारखा कोणी असता, तर जमिनीचा नाद सोडून दिला असता.

पण त्या माणसानं ह्या जमिनीवर सुपारीच्या बागेचं स्वप्नं बघितलं; आणि सुरू झाला एक शोध - संघर्ष अंगावर घेणार्‍या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा आणि जगण्याचा...

मग टेकडीच्या पायथ्याला कुटुंबासाठी झोपडी बांधायला सुरुवात केली. टेकडी सपाट करून घेतली. त्यासाठी भिंत बांधली. पाण्याचा प्रश्न होताच. विहीर खोदण्यासाठी पैसे नव्हते. मग ती स्वतःच खोदायचं ठरवलं आणि लागले कामाला. टेकडीच्या पायथ्याला असल्यानं पाणी साठवण्याच्या प्राचीन पद्धतीप्रमाणं आडवा अरुंद बोगदा खोदायला सुरुवात केली.

भटांच्या शेतात मजुरी करायची, आणि घरी आलं की चार पाच वातींचे दिवे घेऊन

बोगदा खोदायला निघायचं. कधीकधी हे काम रात्री 9 पर्यंत चालायचं.

एक बोगदा 20 मीटर पर्यंत खोदल्यावर कोसळला. मग दुसरा तिसरा करत चार बोगदे कोसळले, पण नाईकांची जिद्द थोडीसुद्धा कोसळली नव्हती.

शेवटी पाचवा बोगदा खोदायला सुरुवात केली. टेकडी आणि पाणी दोघांनीही ह्यांच्यापुढं हार मानली, आणि 35 मीटर खोडल्यावर एक पाण्याचा झरा लागला. सुपारीच्या खोडाचा पाईप सारखा वापर करून ते पाणी घरापर्यंत आणलं. पाणी साठवायला तिथं मोठा हौद तयार केला.

काही वर्षांपूर्वी बघितलेल्या एका वेड्या स्वप्नाच्या शोधात सुरू झालेला प्रवास एकट्यानं केला. लिहिताना किंवा वाचताना जरी हे सगळं एवढं सहज वाटत असलं, तरी नाईक यांनी ऑलम्पिकच्या स्विमिंग पुलापेक्षा दीड पट मोठा बोगदा खोदला होता. सतत आठ वर्षं आणि सुमारे 23000 तास काम करून...

पाण्याची किंमत कळायला प्रत्येकाच्या वाट्याला एवढा संघर्ष यावा, असं वाटतं कधीतरी. नाईकांच्या शेतात एक थेंब पाण्याचा अपव्यय होत नाही. पुनर्वापर केला जातो.

आज नाईक यांच्या शेतात 300 पेक्षा जास्त सुपारीची, 75 नारळाची झाडे, 150 काजूची झाडे, 200 केळीची आणि मिरचीची झाडं आहेत. संपूर्ण सेंद्रिय शेती आहे, आणि ऊर्जेचा वापर शून्य.

आज वयाची सत्तरी ओलांडली तरी नाईक शेतातली सगळी कामं आणि कष्ट स्वतः करतात. काल त्यांना कृषी विषयातला पद्मश्री जाहीर झालाय.

शिक्षण, तंत्रज्ञान, जमीन आणि साधनसंपत्ती यांपैकी काहीही नसताना निखळ मेहनतीच्या जोरावर प्रत्येक अडथळ्यांवर मात करून अशक्य गोष्टी वास्तवात बदलता येतात, त्यांनी सिध्द केलंय.

औद्योगिक महासत्ता होण्याच्या आपण कदाचित जवळ असू; पण कृषिप्रधान देश कृषी महासत्ता होण्यासाठी आपल्या सगळ्यांना नाईकांएवढे नाहीत, पण थोडेतरी प्रयत्न करावे लागणार आहेत...

✍🏼गिरीश

12/09/2024

मला भेटलेली एक सुंदर स्त्री!
एका संध्याकाळी सगळी कामं आटोपुन मंदिराबाहेरील एका आडबाजुच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती. घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणुन मोबाईल काढला.... बघतो तो हँग झालेला... बापरे बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे करायचे? मोबाईल चालु करण्याचा खटाटोप चालु झाला... वैताग आला... मोबाईल काही सुरु होईना ....

काय करावं या विचारांच्या तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगर्या आवाजात कुणीतरी विचारलं, कोण हाय ...? मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघुन भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी....

आधी घाबरलो पण नंतर चिडुन विचारलं , काय बाई हि काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येवुन अशी अंगावर हात ठेवतेस ... घाबरलो ना मी...!

तशी म्हणाली, आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती, या टायमाला मी हितंच बसुन भाकर खाती... मापी करा, मी जाती दुसरीकडं ... मी ओशाळलो, म्हटलं, नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे...

तिला बघुन अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो डोळे कशानं गेले? म्हणाली, लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली, नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, 17 वर्साची व्हते मी तवा....

अरेरे ! तुमच्या आईबापाच्या आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे , आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर हि वेळ नसती आली... बेअक्कल असतात लोकं... मी सहज बोलुन गेलो. यावर मला वाटलं माझ्याच सुरात सुर मिसळुन ती आता त्यांना शिव्या शाप देईल, पण नाही, ती म्हणाली, नाय वो कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं... खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटुन आपटुन माजा बाप गेला ...त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं... डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्या पेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया ... हसत म्हणाली...

वाईटातुन सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती हि बाई ?

तरी मी म्हणालो, मग भगताचं काय ... ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ?

म्हणाली, आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त ... माज्या नशीबाचे भोग हुते ते ... त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई... कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई... !
डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणुनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात... आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल...?
Intention is important behind every action या वाक्याचा सार या बाईने किती सहज सांगीतला ...!!!

पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहिही न बघता कशा राहु शकला?

म्हणाली, न बघता? काय बघायचं राहिलंय ... आवो सगळं बगुन मनात साटवलंय .... वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय, पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय .... तुमी काय बगीतलं ह्यातलं ...? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ?

तीच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे !

आज्जी तुमचं लग्न ....? चाचरत मी विचारलं... आज्जी म्हणाली, झालं हुतं की, त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला .... पदरात एक पोरगी टाकली, त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती ... म्हणलं चला चांगलं दिवस आलं ... पन त्योबी दोन वर्षातच गेला...... बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला.... !

आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? आज्जी भकास हसली,म्हणाली, तीच्या विसाव्या वर्षी ती गेली तीच्या बापामागं त्याला शोधायला ... आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील .... स्वर्गात म्हणं नाचगाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा..... असं म्हणुन आज्जी हसायला लागली...

पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना.... इतकं सगळं भोगुनही हि इतकी निर्विकार !

आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा ?

कुणाचाच न्हाई, परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला... आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ... भाकर मिळाली तर म्हणायचं आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु....
दोष कुनाला द्यायचा न्हाई... वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काहि कारणच नाही...

ते कसं आज्जी मला नाही समजलं ...

ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन... आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी बोलता येतंय ना मला ???

काय बोलावं मलाच कळेना, या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? वयामुळं हा पोक्तपणा आला असेल कि, भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ?

काहिही असो एव्हढ्या सुंदर विचाराची, वाईटातुन चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!!

08/05/2024

■■ *ॲाक्सिजन* ■■
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
मृण्मयी ॲाफिस मधून खूप दमून घरी आली होती. चार वर्षाच्या तन्वीला व पाच वर्षाच्या सोहमला डे केअर मधून आणल्यापासून तन्वीचं रडणं थांबत नव्हतं. तेवढ्यात बाबा घरी आला. कार्तिक, बघ रे हिचं काय बिनसलय! मृण्मयी म्हणाली. कार्तिक म्हणाला,”वेळ नाही ग मला आत्ता. पटकन जेवायला वाढ. मला एक कामाचा रिपोर्ट पाठवायचा आहे.”

मृण्मयी म्हणाली, “कार्तिक, मी आत्ताच घरी आलेय. मुलांचं बघू का तुझं बघू? स्वयंपाक झालेला नाही. बाईंनी आजारी आहे असं तासापूर्वी कळवलं. बाहेरून काहीतरी घेऊन ये.” कार्तिक भडकला. ताडताड खोलीत निघून गेला. तेवढ्यात तिच्या बॅासने तिला “अर्जंट” म्हणून पाठवलेली ईमेल तिच्या फोनवर झळकली. आईचा पण मेसेज आला होता, “बोलायचंय तुझ्याशी”

ही रोजचीच कथा होती. कामाच्या डेडलाईन्स, घरकामाच्या बायकांच्या सुट्ट्या, मुलांची आजारपणं, कमी झोप यात ती पिचून गेली होती. भरपूर पैसा घरी येत होता पण घराला घरपण नव्हतं. तन्वी अनेकदा विचारायची, “आई आपण आज घरी राहूया? आपण चित्र काढूया?” ती म्हणायची, “राणी, आज तू शाळेत जा. आपण रविवारी नक्की चित्र काढू. सोहमला लेगोचं ॲनिमल फार्म बनवायचं होतं. रविवारी करू म्हणत तो रविवार संपून सोमवार उजाडत असे आणि परत पुढच्या रविवारची आश्वासनं दिली जात.

काम सोडून द्यावेसे वाटायचे पण हे मोठ्ठालं घर दोन नोकऱ्यांशिवाय कसं उभं राहिल? खर्च कसे भागतील? तिची एकही मैत्रीण आता हाऊस वाईफ नव्हती. चालतच नाही नोकरी शिवाय हल्ली! मुली शिकायला लागल्या व भरपूर पैसा मिळवू लागल्या पण घर ही संस्था पार बदलून गेली.

मृण्मयीने रविवारी ॲाफिसला दोन दिवसाची सुट्टी टाकली. सोमवारी सकाळी तिनं कांदेपोहे केले. दही, लिंबाचं लोणचं घेऊन शांतपणे पोहे खाल्ले. ती फिरायला बाहेर पडली. आज काही न ठरवता जे मनात येईल ते करायचं होतं. मिनिट आणि सेकंदाचा हिशोब ठेवायचा नव्हता. टेक्स्ट, ई-मेल कडे बघायचे नव्हते. कॅाल्स घ्यायचे नव्हते.

कमी गर्दीच्या आतल्या रस्त्यावर ती चालायला गेली. वसंत ऋतुमुळे झाडांना पालवी फुटत होती. कोवळ्या पानाचा मोहक पोपटी रंग बघत ती शांत उभी होती. आकाशात निळे, सोनेरी, केशरी रंग चमकत होते. पक्षी उडत होते. काळ काहीवेळ थांबला आहे असं तिला वाटलं.

ती चालत पुढच्या गल्लीत गेली. अगबाई! डोंबाऱ्याचा खेळ का? खेळ सुरू झाला होता. जमिनीपासून सात आठ फुटांवर बांधलेली जाड दोरी, हातात बांबूची जाड काठी, डोक्यावर पितळी कलश घेतलेली ती आठ वर्षाची मुलगी जपून पाऊल टाकत होती. या जीवाला इतक्या लहान वयात तारेवरची कसरत करावी लागते?

ती मुलगी तोल सांभाळत फक्त पुढचं पाऊल कसं टाकायचं एवढाच विचार करत होती. दोराच्या दुसऱ्या टोकाला जाणं एवढच ध्येय होतं. बाकी काही नाही. मल्टीटास्किंग नाही. एक काम एका वेळी. दोर हलत होता पण पाय स्थिर होते कारण मन स्थिर होतं. श्वासाची गती लयबध्द होती कारण मन स्थिर होतं. ती मुलगी दोरीच्या दुसऱ्या टोकाशी पोचून आता खाली उतरली होती. मृण्मयीने तिच्या आईच्या पदरात पाचशे रुपयाची नोट टाकली.

समोर खानावळ होती. डोंबाऱ्याच्या कुटुंबाला तिथे जेवण करण्यासाठी तिने पैसे दिले. "आज पुढचे खेळ करू नका. व्यवस्थित जेवा आणि या मुलीला आज जे करायचं ते करू द्या" असं सांगून तिनं त्यांची नावं, माहिती विचारली. जेऊन तृप्त झालेले त्यांचे चेहरे बघून तिचं पोट भरलं होतं.

आता तिला काहीतरी उमगलं होतं. छप्पन गोष्टी बॅलन्स करताना आपला तोल ढळला आहे म्हणून आपण चिडचिड करतो. जीवनातील तारेवरची कसरत करताना ना पाऊल धड पडतंय ना श्वास सुखाने घेतला जातोय हे समजत होतं. ती घरी आली. तिनं कंपनीला ईमेल पाठवली. “मला आठवड्यात तीन दिवस काम करायचे आहे. उरलेले चार दिवस मला माझ्यासाठी हवे आहेत. मी एकाच वेळी कामावर मॅनेजर, घरी आई, पत्नी, सासरी सून, माहेरी मुलगी या सर्व भूमिका करू शकत नाही. या मल्टिटास्किंग मधे मी होरपळून गेले आहे. हे तुम्हाला मान्य नसेल तर मी नोकरी करू शकणार नाही. कृपा करून समजून घ्यावे.”परत विचार करून सेंड वर क्लिक केलं.

तिने मुलांच्या आवडीचा आंब्याचा शिरा बनवला. तन्वी बरोबर चित्र काढायची तयारी केली. सोहमचा ॲनिमल फार्म लेगो सेट बाहेर काढला. कार्तिकच्या आवडीची एग करी व पुलाव बनवला. आईला फोन केला. आणि मुलांना वेळेच्या आधी दोन तास आणायला पोचली. आई लवकर आलेली बघून मुलांचे चेहरे उजळले होते. ते बघून ती भरून पावली.

डोंबाऱ्याच्या मुलीला शाळेत घालण्यासाठी तिने तिच्या प्रिन्सिपॅाल मैत्रीणीला फोन केला. निदान आज पासून ती डोंबाऱ्याच्या मुलीची व स्व:तची तारेवरची कसरत थांबवणार होती. काम, घर, गाडी, फोन, फर्निचर या मृगजळाच्या मागे धावताना आपल्या जवळ काय आहे याचा विसर पडला होता.

तन्वी मजेत चित्र काढत होती. सोहम लेगो घेऊन ॲनिमल फार्म बनवण्यात गुंग झाला होता. कार्तिक हाताची बोटं चाटून एग करी आणि पुलाव खात होता. मुलांशी गप्पा मारत होता.

विमानातलं केबिन प्रेशर बदललं तर प्रथम मोठ्यांनी स्वत:ला ॲाक्सिजन मास्क लावायचा असतो अन् नंतर आपल्या मुलांना लावायचा असतो. आई बाबाच श्वास घेऊ शकत नसतील तर ते मुलांना काय मदत करणार?

आज तिनं स्वत:ला ॲाक्सिजन मास्क लावला होता. आज तिला सुखाने श्वास घेता येत होता. शांत, लयबध्द, दीर्घ! त्यामुळे पुढचं पाऊल स्थिर राहणार होतं. मन शांत होऊ लागलं होतं. आता बाकीच्यांची काळजी घेणं तसं सोपं होतं.

आज ती जगायला शिकली होती......!

©® ज्योती रानडे - All rights reserved.
~~~~~~~●●○○○●●~~~~~~~

11/04/2024

*तारूण्य* 🧏‍♀ 🙍‍♀

देवयानी एका लग्नाला जाण्यासाठी तयार झाली. अवघं २७ वर्षाचं वय आणि ईश्वराने फुरसत से बनवलेले रूप बघून अनेक माना तिच्याकडे वळत. हिरव्या काठाच्या केशरी नारायण पेठेत तिचा सुडौल बांधा अजूनच कमनीय दिसत होता. गळ्यात मोत्याची माळ, कानात टपोरे मोती, हातात मोत्याचे तोडे व लांब मंगळसूत्र घालून तिने आरशात बघितले. स्वत:चे सौंदर्य बघून ती हसली. परीक्षितनं मागणी घातली नसती तरच नवल म्हणत तिने मान कलती करून आरशात बघितलं. एक मूल आहे कुणाला वाटणार पण नाही म्हणत तिनं पोट सपाट दिसतय ना बघितलं व ती बाहेर पडली.

नुकतच MBA केलं होतं व परीक्षितच्या फर्म मधेच देवी मॅडमचं ॲाफीस होतं. उत्तम कथ्थक करणारी देवयानी “मला माझ्या रूप गुणांचा अजिबात अहंकार नाही” असे अनेकदा बोलून दाखवत असे. एवढी हूशार व रूपवान असूनही आपण सर्वांशी चांगले वागतो याचा तिला सार्थ अभिमान होता. आपण इतरांनाही खूप आवडतो असं तिला वाटायचं आणि ते काही अंशी खरं होतं.

पण बघता बघता चाळीशी उलटली. वय किती का असेना आजही आपण सुरेख दिसतो म्हणत तिनं आरशात बघितलं. अगबाई! गाल आज काही वेगळेच दिसत आहेत आणि डोळे इतके गळून गेल्यासारखे का दिसत आहेत? तिने घाईने काही क्रिम विकत आणली. दोन तीन आठवडे क्रिम लावून झाली. लिंबू, हळद वगैरेचा भरपूर वापर करून घरगुती उपचार सुरू झाले. पार्लरच्या ट्रिप्स झाल्या. पण वर्षांनंतरही उतरलेले गाल तसेच दिसत होते. दोन सुरकुत्या ठाण मांडून बसल्या होत्या ज्या जाण्याचे नावच घेत नव्हत्या. ती अस्वस्थ झाली.

अनेक बायका हल्ली Botox चे इंजेक्शन घेतात यासाठीच. आपण करून बघायला काय हरकत आहे म्हणत तिनं बोटॅाक्स हा मार्ग पत्करला. काही इंजेक्शन्स घेऊन परत एकदा पंचविशीत जाण्याचा प्रयत्न केला पण निसर्ग निष्ठूर होता. बोटॅाक्स मुळे तिचं मनमेकळं हसणंच हरवलं. चेहरा इस्त्री केल्यासारखा दिसू लागला..ती तारूण्य जपण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नात दमून जात होती. खर्चही प्रचंड वाढला होता. बोटॅाक्सची एक ट्रीटमेंट करून भागत नाही. दर चार महिन्यांनी ते इंजेक्शन घ्यायला लागायचं.

त्या दिवशी तिच्या ॲाफिसमधे सर्वात सिनिअर असलेल्या नलूताईंचा साठावा वाढदिवस साजरा होत होता. देवयानी नलूताईंकडे बघत होती. रूपेरी केसाचा अंबाडा, चष्मा, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यात लपलेले आयुष्यातले कडू गोड अनुभव, त्यातून आलेली प्रगल्भता स्पष्ट दिसत होती. वय, वजन, आजार लपवण्याचे काहीही प्रयत्न नव्हते. दासबोध, मनाचे श्लोक यावर पाच पन्नास बायकांसमोर निरूपण करणाऱ्सा नलूताई चार चौघींपेक्षा निराळ्या होत्या.

कार्यक्रम संपल्यावर देवयानीने न राहवून विचारलं, “ताई, गुडघे दुखतात का? त्रास होतो का साठी आल्याचा?”नलूताई हसली “देवयानी, त्रास कसला? निसर्गाचे काही अलिखित नियम आहेत. बाल्य, तारूण्य, वार्धक्य, मृत्यु हा प्रवास कुणाला चुकलेला नाही. प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाण्यातच खूप त्रास आहे.. शाळकरी नलू ते आत्ताची नलू यात फक्त बाहेरचं रूप बदललं ग! पण आतली मी बदललेली नाही. ती मी चिरतरुण आहे, अमर आहे, आनंदी आहे. आता बाहेरच्या रूपाकडे बघत त्रास करून घ्यायचा का जे बदलत नाही ते आतलं स्वरूप शोधायचं हे आपलं आपण ठरवायचं. आपण नक्की कोण आहेात याचा शोध घ्यायचा! ” नलूताई तिच्या पाठीवर हात थोपटत दोघी बाहेर पडल्या पण जिन्यावरून उतरताना त्यांच्या गुडघ्यातून कळ आली..व तोंडून शब्द आले.. आई ग! नंतर तोंडून आलेले पुढचे शब्द होते ..

देहेदु:ख ते सुख मानीत जावे।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे॥

देवी, I am okay. होतं असं कधी कधी! जरा बसते दोन मिनिटे!

देवयानीला कमाल वाटली. राग नाही, त्रागा नाही, चिडचिड नाही. डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसलं की मला केवढी चीड येते आणि ताईची ही प्रतिक्रिया! “लकी आहेस तू नलूताई!” ती म्हणाली. कळ कमी होताच दोघी खाली आल्या.. “देवी, लक आपल्या प्रयत्नाने आपण निर्माण करायचं असतं. The harder you work, the luckier you get असं असतं! बरं! ये उद्या निरूपणाला. आवडेल तुला उद्याचा विषय!”

देवीला वाटलं इतके वर्ष नलूताई बरोबर काम केलं पण तिच्या अंतरंगात कधी डोकावून कधी बघितलं नाही. अगदी लहानशी चण असलेल्या नलूताईची अध्यात्मिक उंची कधी जाणवलीच नव्हती!

दुसरे दिवशी ती साशंकतेनच निरूपणाला गेली. तिने आजूबाजूला बघितलं. २५ ते ८० वयातील १५-२० बायका जमल्या होत्या. आयुष्य रेषेवर वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्यांचं जणू एक चित्र साकार झालं होतं. त्या आयुष्य रेषेच्या मध्यावर आपण कुठेतरी धडपडत आहोत असं तिला वाटलं. नलूताईच्या मधूर वाणीतून निरूपण सुरू झालं..

देहेरक्षणाकारणे यत्न केला।
परी शेवटी काळ घेउन गेला॥
करी रे मना भक्ति या राघवाची।
पुढे अंतरी सोडि चिंता भवाची॥

देवी भारावून ऐकत होती. “देह नश्वर आहे. ययाती सारखे तारूण्याच्या मागे लागणारे कित्येक लोक आहेत. मौज मजा चैन यासाठी आयुष्य आहे अशी समजूत झाली आहे पण आपण कालचक्रातील प्रवासी आहोत. कधी काळ घेऊन जाईल..”.

त्या बोलत होत्या व देवीचे डोळे भरून आले होते. निरूपण संपवून बायका बाहेर पडल्यावर ताई तिला म्हणाल्या, “देवी, तू कायम म्हणायचीस ना की तुला तुझ्या रूप गुणांचा तुला अजिबात अभिमान नाही. पण खरं म्हणजे तुला तुझ्या रूपाचा अभिमान आहे. ते रूप आता बदललं म्हणून तू अस्वस्थ आहेस. अग बोटॉक्सचे हजारो side effects आहेत देवी. बाह्य रूप सजवूनही तू आतमध्ये दु:खी आहेस! याची जरूर नाही ग! तू जशी आहेस तशी परिपूर्ण आहेस.”

“तू जशी आहेस तशी परिपूर्ण आहेस” हे वाक्य डोक्यात घोळवत ती घरी आली. रूप गुणांचा अभिमान सोडून दे. तोवर तू कोण आहेस ते तुला कळणार नाही म्हणणाऱ्या नलूताईंकडे दर आठवड्याला तिच्यावर ज्ञानामृताचा वर्षाव होत होता. त्या वर्षावात पोकळ अभिमानाचे एकेक पदर वितळून जात होते. मन शांत होऊ लागलं होतं. रामदास स्वामींच्या अमृत बोलाने आतला कोलाहल तळाला गेला होता. जगाचा उध्दार करणाऱ्यासाठी आलेले हे महान संत महंत. त्यांच्या सान्निध्यात मन शांत होणारच!

दुसरे दिवशी सकाळी तयार होताना तिला वाटलं..आपण हल्ली किती तजेलदार दिसत आहोत. ते सुध्दा क्रिम्स, पार्लर आणि बोटॅाक्स शिवाय! मन ताजतवानं झालं आहे. याच आतल्या transformation ची मला जास्त गरज होती.. बाहेरच्या नाही..टीव्ही वर दिसणाऱ्या सिने तारकांचे इस्त्री केलेले चेहरे बघून तिच्या पोटात तुटलं!

तिनं फोन उचलून बोटॅाक्सची पुढची अपॅाईंटमेंट कॅन्सल केली.. आपण कोण आहेत याच्या शोधाचा एक धागा नलूताईमुळे हाती आला होता! त्याला धरून पुढची वाटचाल करायची होती. पुढच्या निरूपणाच्या श्लोकावर ताईनी विचार करायला सांगितलं होतं. तो कागद हातात घेऊन ती त्या श्लोकात बुडून गेली होती…

भये व्यापिले सर्व ब्रम्हांड आहे।
भयातीत ते संत आनंत पाहे॥
जया पाहिता द्वैत कांही दिसेना।
भयो मानसी सर्वथाही असेना॥

जय जय रघुवीर समर्थ॥

11/04/2024

*GRIT & GLORY..*

What a powerful story of this gritty woman! She exuded confidence when she made her speech. Its true.. dreams must be kept alive!

I’ve lived a life of borrowed dreams. I grew up in Delhi, in a Punjabi middle class family. To the world we were happy.. but no one knew what happened behind closed doors.

My family was allotted 1 room in a big house. Because of the fight between brothers over property, my mom was suppressed. They abused her. Once, the argument got to a point where they tried to burn her alive. My father called the police, grabbed us & ran out of there.

We built our life anew.

Eventually, my mom started dreaming of having a 3 bedroom house on a ground floor, with 3 steps by the entrance.. so specific!

I became determined to buy 1 for her. At 16, I started working while balancing schoolwork.. I sold cheese on the streets, was an announcer at PVR, a DJ, an anchor... you name it! In college, I began coming to Mumbai to work in films. I went from a coordinator to being a production manager.

Whatever I’d earn, I’d give it to my parents for our dream!

Slowly, we pooled our savings & booked a house. But by the time it was ready, I lost my parents within 6 months of each other. My mom had throat cancer & my dad’s kidneys failed.. I was heartbroken.

Needing a change, I packed my bags, sold the house & moved to Bombay for work. I channeled my energy into films. My dreams then became my director’s dreams. I was always on my feet & barely slept 4 hrs a day.

Each film was a challenge. Crowd-funding, international sales etc.. but I loved it!

I wanted to hear my mom’s ‘you did well’ or my dad’s ‘proud of you’. I still remember my father had sold his gold kadaa to send me on my 1st school trip to USA.. he wanted me to see the world, no matter how challenging it was for them.

So in my happiest times, whether it was at the Oscars, or when we produced Gangs of Wasseypur & The Lunchbox.. or when I launched my production house… all I wanted was my parents beside me.

But I know they’re at peace where they are. Someday I’ll see them again & get my ‘well dones.’ But for now, I’m going through life, collecting happy moments for them.

I hope they can be proud that I’ve finally stopped borrowing dreams. I’m my own person now & maybe that in itself is a dream come true! “

_This is *Guneet Monga,* the producer of The Elephant Whisperers, that got her the Oscar._

11/04/2024

If you find 10 faces in this picture, your brain is still young. If you find 12, your brain is super young! This is as per a Hongkong University study. Assess yourself.

*GRIT & GLORY..*

What a powerful story of this gritty woman! She exuded confidence when she made her speech. Its true.. dreams must be kept alive!

I’ve lived a life of borrowed dreams. I grew up in Delhi, in a Punjabi middle class family. To the world we were happy.. but no one knew what happened behind closed doors.

My family was allotted 1 room in a big house. Because of the fight between brothers over property, my mom was suppressed. They abused her. Once, the argument got to a point where they tried to burn her alive. My father called the police, grabbed us & ran out of there.

We built our life anew.

Eventually, my mom started dreaming of having a 3 bedroom house on a ground floor, with 3 steps by the entrance.. so specific!

I became determined to buy 1 for her. At 16, I started working while balancing schoolwork.. I sold cheese on the streets, was an announcer at PVR, a DJ, an anchor... you name it! In college, I began coming to Mumbai to work in films. I went from a coordinator to being a production manager.

Whatever I’d earn, I’d give it to my parents for our dream!

Slowly, we pooled our savings & booked a house. But by the time it was ready, I lost my parents within 6 months of each other. My mom had throat cancer & my dad’s kidneys failed.. I was heartbroken.

Needing a change, I packed my bags, sold the house & moved to Bombay for work. I channeled my energy into films. My dreams then became my director’s dreams. I was always on my feet & barely slept 4 hrs a day.

Each film was a challenge. Crowd-funding, international sales etc.. but I loved it!

I wanted to hear my mom’s ‘you did well’ or my dad’s ‘proud of you’. I still remember my father had sold his gold kadaa to send me on my 1st school trip to USA.. he wanted me to see the world, no matter how challenging it was for them.

So in my happiest times, whether it was at the Oscars, or when we produced Gangs of Wasseypur & The Lunchbox.. or when I launched my production house… all I wanted was my parents beside me.

But I know they’re at peace where they are. Someday I’ll see them again & get my ‘well dones.’ But for now, I’m going through life, collecting happy moments for them.

I hope they can be proud that I’ve finally stopped borrowing dreams. I’m my own person now & maybe that in itself is a dream come true! “

_This is *Guneet Monga,* the producer of The Elephant Whisperers, that got her the Oscar._

09/04/2024

लहानपणी मे महिन्यात सगळी भावंडं एकत्र जमलो कि पत्त्यात हा डाव रंगायचा. पण तेव्हा विंग्रजी फार यायचं नाही मग जो तो ज्याला जसं ऐकू आला उच्चार तसं म्हणायचा. नाॅटॅट होम, नाॅटॅ-ठोम काय वाट्टेल ते !!
तसंही आपण आपल्याच घरात तरी कुठे असायचो? ते ही Not At Home च.
कधीही मित्र मैत्रिणीच्या घरी जाऊन हुंदडायला मिळवायचं. येऊ का? वगैरे विचारण्याच्या formalities नव्हत्या.

"Challenge" ला पण चायलेन्ज, चाॅलेन्ज काय वाटेल ते म्हणायचो.
*"लॅडीज"* नावाचा खेळ फक्त लेडीजनीच खेळायचा असं आपलं उगीच वाटायचं मला. त्यात एक *वख्खई* बोलली जायची. लाडूची म्हणजे ३२ कळ्या किंवा अर्धा लाडू १६ कळ्या वगैरे. *झब्बू* पण असाच एक डाव. झब्बू देताना एक पानी आणि गड्डेरी. मजाच सगळी.
हे सगळे शब्द कुठून आले 🤔 देव जाणे?
काचापाणी, पट, सागरगोटे हे अजून काही प्रकार बैठ्या खेळातले. काचापाणीसाठी भांड्यांच्या काचा जमवायला अगदी कचराकुंडी पण गाठलीय.
सगळेच खेळ आपल्याला जिवंत ठेवायचे. वेगळा असा "स्पोर्टस् डे" नसायचा. रोजच खेळ. शाळा दुपारची असली की दप्तर फेकून 🏃🏻‍♂️🏃🏻‍♀️धावत सुटायचं! कारण उशीरा पोहचलं खेळायला तर *"कटाप"* करायचे (actually cut off) खेळातून.
तळहातावर थोडसं चाटून *"टॅम्प्लीज"* (टाईम प्लीज खरा शब्द) करणं, लपंडावात "धप्पा" म्हणणे, "रडीचा डाव खडी"असं चिडवणे, मग समोरच्यानी आपल्याला "जो म्हणतो तोच" असं बोट आपल्यापुढे नाचवत म्हणणे या सगळ्याची मजा काही औरच.
आजच्या मुलांना काय कळणार ती??

*लगोरीsss* असं सात ठिक-या एकमेकांवर ठेवून त्यावर पाय फिरवणे, तो नाही फिरवला तर लगोरी लागली असं धरत नसत. तसेच *"डब्बा ऐसपैस"*. पत्र्याचा एक फालतू डबा पण अनन्यसाधारण महत्व मिळालेला.
डालडाचा वनस्पती तुपाचा हिरवं नारळाचं झाड असणारा डबा पण फार महत्त्वाचा. तो कमरेला बांधून विहीरीत धपाधप उड्या मारणे हा रविवार सकाळचा कार्यक्रम.
"लपंडाव" खेळताना मुलं मुद्दाम एकमेकांचे शर्ट, टी शर्ट बदलून गंडवायचे आणि शर्टाची बाही दिसेल असे लपायचे. मग चुकीचं नाव घेतलं कि धप्पा मिळायचा "राज्य असणा-याला...😁.
राज्य असणा-यालाच पकडायला लावायचं हा काय न्याय!! पण अशा नियमांवर अपील नसायचंच.
"जोडसाखळी, रस्सीखेच" म्हणजे नुसती ओढाओढी.
*"दगड का माती"* म्हटले की जे म्हणेल त्यावर उभं रहायचं. दगडावर उभं रहायचं असेल तर तो सापडेपर्यंत फक्त धावायचं.
"विषामृत"मधे विष म्हणुन स्पर्श करायचा मग विष मिळाले कि स्तब्ध उभं रहायचं. मग कुणी तरी येऊन अमृत द्यायचं...काय एकेक मज्जा!!
पावसाळ्यात घरी बसू असं तर मुळीच नाही.
पावसाळ्यात "रूतवणी" हा खेळ.
एक लोखंडी सळई घेऊन चिखलात रुतवत जायचे. त्याचे पाॅईन्ट्स मोडायचा. सळई पडली कि दुसरा खेळायचा. पहिला औट.
*"आबाधूबी"* (अप्पा-रप्पी) लई भारी गेम. पाठ शेकुन काढणारा.
यात शक्यतो प्लास्टीकच्या बाॅल घेतला जायचा.
रबरी ट्यूब कच-यातून, भंगारातून शोधून तिचे तुकडे करून त्याचाही बाॅल केला जायचा.
साबणाचे फुगे करायला कागदाची बारीक सुरनळी करणे, करवंटीचे फोन, काडेपेटीत वाळू भरून टिचकीनी ती उगडून अंगावर उडवणे... what a creativity !!!

काही नाही तर बाॅल घेऊन "टप्पा- टप्पा" हा खेळ तरी व्हायचाच. ते मोजले जायचे ते ही सार्वजनिक रित्या, मोठ्याने बोंबलत.
क्रिकेट खेळताना फळकूट पण चालायचं. एखादी बोळ पण चालायची. टीम पाडायच्या. आपणच अनेक नियम बनवायचे. या कंपाउंड बाहेर गेला बाॅल की फोर, तिकडे सिक्स, एक टप्पा औट, रन आऊट चे नियम वेगळे.
कुणाच्या खिडकीची काच फोडली तर सार्वजनिक धूम ठोकणे हा अलिखित नियम.

मुली, मुलगे एकत्र खेळायचो तेव्हा.
सगळेच मुलींचे "दादा".
क्रिकेट; कबड्डी साठी टीम मेंबर कमी असले कि मुलींना डिमांड.

"टीपी टीपी टीप टॉप", व्हॉट कलर डू यू वाँट"? काहीतरी भारी रंग सांगायचा. मग नसेल तर औट करायचे. यातही धावायचंच.
"ढप, गोट्या" रिंगण आखून जो सांगितला जाई तो ढप किंवा गोटी रिंगणाबाहेर नेम धरून उडवायची.
ऑलिंपिक लेव्हलची नेमबाजी.!!
मग यात चंदेरी, पाणेरी, काळी, घारी अशी गोट्यांची वर्णनं.

एक जबराट खेळ होता. टायर्स फिरवणे. जुने टायर्स घेऊन ते काठीने बडवत पळवत नेऊन त्याची शर्यत लावायची. खूप धमाल यायची टायर्स पळवायला!

*''ठिक्कर पाणी''* हा फक्त मुलींचा खेळ समजला जायचा. एखादा मुलगा जरी यात आला तर *"मुलीत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा" 🐓* म्हणुन चिडवायचे. फरशीची खपटी घेऊन त्याला थुंकी लावुन ती रकान्यात फेकायची आणि एका बाजुने लंगडी खेळत जाऊन ती पायानेच सरकावुन चौकटीच्या बाहेर जाईल अशा रितीने फेकायची. रेषेवर पडली तर औट.

कांदाफोडी, डोंगराला आग लागली पळा पळा पळा, खांब खांब खांबोळी, शिवाजी म्हणतो, दोरीवरच्या उड्या, मामाचं पत्रं हरवलं, शिरा-पूरी भातुकली हे तर सगळे गर्ल्स स्पेशल खेळ. मुलींची monopoly.

नाव, गाव, फळ, फूल, नाटक/सिनेमा, रंग, प्राणी, पक्षी, वस्तू काय वाटेल ते. वह्याच्या वह्या भरायच्या.
भातुकली, दो-या बांधून घर घर खेळणं, दाण्याचे लाडू आणि चुरमु-याचा बात एवढाच कायम स्वैपाक असायचा भातुकलीत.
व्यापार, सापशिडी, सागरगोटे, काचापाणी हे दुपारचे खेळ.

वारा पडलेला असेल तर बॅडमिंटन.
पण तो श्रीमंती खेळ. जिच्या हाती रॅकेट ती/तो फार भाव खायचे. मग रॅकेट नसणारे एकत्र यायचे आणि बॅडमिंटन पेक्षा बाकी खेळ कसे भारी यावर वादावादी.
कॅरम पण तसाच श्रीमंती खेळ.
ते नको असायचे. त्यात धांगडधींगा करता यायचा नाही ना !!

*"पतंग बदवणे"* यात जो माहिर, तो सगळ्यात भारी.👌
मुली आपल्या ही काट, ती काट सांगायच्या आणि फिरकी धरायच्या. मग ती काटताना ढील देणे वगैरे प्रकार करावे लागायचे. काटता आली नाही पतंग की मग मांजा नीट नाही, कन्नी नीट बांधली नाही या तक्रारी.

दिवेलागणी झाली की परवचा म्हणून रात्री जेवणं झाली कि अंताक्षरी आणि भुताच्या गोष्टी.

*निव्वळ Nostalgic !!!*
समृद्ध, श्रीमंत बालपण होतं आपलं.
करता येईल का तसं आजच्या लहान मुलांचं???
काहीतरी जादू घडावी आणि होऊन जावं आपल्यागत.
नाही का ???
..✍🏼कॉपी पोस्ट

22/03/2024

गेल्या आठवड्यात लोकसत्तामध्ये ही बातमी वाचली.ही बातमी पहिल्या पेजवर नव्हती तर आतील कुठल्यातरी पेजवर होती.
लोकही वाचून थोडा वेळ हळहळतात आणि नंतर विसरून जातात.परंतु ज्या पालकांच्या मुलांनी आत्महत्या केली आहे.त्यांच काय होत असेल? आणि दिवसेंदिवस हे आत्महत्येच
प्रमाण वाढत चालले आहे.
जोपर्यंत एखादे संकट दुसऱ्याच्या दारात आहे तोपर्यंत त्याचे गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही.
मध्यंतरी आमच्या नात्यातील अकरावीत शिकणाऱ्या एका मुलाने आत्महत्या केली.आम्हाला खूप मोठा धक्का बसला.त्या रात्री आम्हाला झोप लागली नाही.मन विषण्ण झाले.एवढ कोवळ वय, पुर्ण आयुष्य जायच होते त्याचे आणि हा आईवडीलांना आयुष्यभरासाठी दु:ख देऊन निघुन गेला.फक्त 'अभ्यास झेपत नाही 'अशी चिठ्ठी लिहून?😔
दहावीला चांगले मार्क्स होते.स्वत:हून आयआयटी, जेईई च्या क्लासेसला प्रवेश घेतला होता.आईवडीलांचे फार काही शिक्षण झालेले नव्हते.त्यामुळे हेच तुला करायला हवे असेही बंधन नव्हते.झेपत नसेल तर सोडून द्यावे क्लासेस.घरच्यांचा काहीच प्रश्न नव्हता.अर्थात नक्की काय घडले हे देवच जाणे.
परंतु हल्ली काही मुलांची मानसिकता बदलत चालली आहे असे वाटते.एकुलत एक मुल असत.तो बोलेल ते त्याला मिळत असत.कधी घरी ओरडा मिळालेला नसतो.त्यामुळे बाहेर मुलांना कुणी ओरडले, त्यांना अपमानास्पद बोलले तर ते मुलांना सहन होत नाही.पुर्वीच्या काळी बाबांचा ओरडा जवळजवळ रोजच मिळे.आई आणि आजी समज काढत.तेव्हा शिक्षकांचा ओरडा खायला फारस काही वाटत नसे.कारण रोजच ओरडा खायची सवय असायची ना! 😂
माझ्या मुलीने दहावी झाल्यानंतर नीट च्या (MBBS प्रवेश परीक्षा)
तयारीसाठी क्लासेस जॉईन केले.क्लासेसवाले प्रत्येक विषयासाठी एवढाले पैसे घेतात.आणि त्यांचे क्लासेस नंबर -1 रहाण्यासाठी तेवढी मेहनत मुलांकडून करवून घेतात.या क्लासेस मध्ये प्रवेश मिळवण्यासाठीही मार्कांची अट असते.कारण त्यांना टॉपर्स हवे असतात.
क्लासेस वाले मुलांकडून अतिशय मेहनत करून घेतात पण कधीकधी एखाद्या मुलाला हे झेपत नाही.मग कधीतरी ही स्पर्धा जीवघेणी ठरते.
मधुला एका विषयाला जे सर होते ते थोडस चुकल तरी पुर्ण क्लाससमोर त्या विद्यार्थ्याचा पेपर फाडत असत आणि अपमानास्पद बोलत असत.मधू नेहमी क्लासला जाताना तिच्या चेहऱ्यावर भिती, टेन्शन जाणवायचे.आम्ही विचारले तर म्हणाली की ते सर इन्सल्ट करतात.जरास चुकल तरी पेपर फाडतात.माझ्या मैत्रीणीचा पेपर फाडला.फक्त दोन ,चार स्टुडंट्स आहेत त्यांचच कौतुक करतात.हे ऐकून शार्दुल चिडला,"दिदी,तुझा पेपर फाडला ना तर मला सांग,मी येऊन बघतोच मग!"(हा पठ्ठ्या तेव्हा आठवीला 😂)
आम्ही तिला विचारले सर कुणाला जास्त बोलत नाहीत?
मधू म्हणाली, काही मुलांना ते 'ढ' समजतात त्यांच्याकडे ते लक्षच देत नाहीत.(म्हणजे 'नीट' क्रॅक करू शकणार नाहीत असे.😀)आम्ही म्हटल की तू त्यांच्या क्लासमध्ये शांत रहा.जेवढ शिकता येईल तेवढ शीक.काहीही प्रश्न विचारु नकोस.बाकीच्या विषयाच्या शिक्षकांना तुझ्या शंका विचार.त्यामुळे मधू कडे त्या सरांचा मोर्चा वळला नाही.परंतु त्या सरांची एवढी दहशत तिला वाटायची की नंतर कितीतरी काळ त्या रस्त्याने जायचेही ती टाळत असे.
मुलांच्या कोवळ्या वयात कुठली गोष्ट त्यांना दुखावेल ते आपण नाही सांगू शकत.आत्ताच्या मुलांची मानसिक स्थिती ओळखण्यासाठी किंव्हा त्यांची मानसिकता सांभाळण्यासाठी पालकांना आणि शिक्षकांनाही क्लासेस लावावे असे कधीकधी वाटते.
मानवाने इतकी प्रगती केली परंतु कुणाच्या मनात काय चालू आहे हे नाही ओळखू शकत.हे जमल असत तर कितीतरी आत्महत्या टाळता येऊ शकल्या असत्या.
तरिही आपल्याला जमेल तेवढे प्रयत्न करणे आवश्यक आहे.मुलांना नकार किंव्हा अपयश पचवण्याची शक्ती येऊद्या.सगळ्याच गोष्टी बोलल्याबरोबर त्यांना देऊ नका.कधीतरी नाही बोला किंव्हा नंतर देणार सांगा.दार लावून तासनतास मुल काय करतात? अभ्यास च चाललाय ना?हे सुद्धा बघायला हवे.
आपल्या काळात कुठे अभ्यासासाठी स्वतंत्र बेडरूम,स्पेस वैगरे असायची? आत्ताच्या मुलांना मोबाईल (ज्याच लॉक आपल्याला कधीच उघडता येणार नाही.😃)
लॅपटॉप, स्वतंत्र रुम देताना त्या गोष्टींचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का?हे सुद्धा पाहणे पालकांचे कर्तव्य आहे.
मुलांशी संवाद साधणे, त्यांना बोलत करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.कधीकधी आईवडील अशिक्षित आणि मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असतात.मग मुलांना वाटते आपल्या आईवडिलांना काही कळत नाही.अशा वेळी त्यांना आईवडिलांचा आदर करायला शिकवणे गरजेचे आहे.(कारण मी उल्लेख केलेल्या प्रकरणात साधारण हेच चित्र होते.आईवडिल हवे तेवढे पैसे पुरवत होते.पण मुलगा दिवसभर एकटा लॅपटॉप वर काय करतोय हे त्यांना माहीत नव्हते.)
याउलट दुसर उदाहरण.आमच्या परिचयाचे एक उच्चशिक्षित, श्रीमंत कुटुंब.
घरात कशाचीही कमी नाही.मुलगी उच्च शिक्षणासाठी परदेशात.मुलगाही हुशार.काही दिवसांनी तोही उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणार होता.परिक्षा चालू होती.अचानक मध्यरात्री उठून टेरेस वरुन खाली उडी मारली.वॉचमन रात्री सगळ्यांची दारे ठोकून विचारत होता कुणाचा मुलगा हा? आईवडिलांचा जीव काय झाला असेल त्या प्रसंगी? आम्हाला तो प्रसंग आठवला की अजूनही अंगावर शहारा येतो.अतिशय शांत, नम्र आणि हूशार मुलगा! काय विचार करुन या मुलाने ही टोकाची भूमिका घेतली असेल?
या दोन्ही प्रसंगातील पालक आपले रहाते घर सोडून दुसरीकडे रहायला गेले.आणि कुठे गेले हे कुणालाही न सांगता.का त्यांना अस कराव लागल असेल? तरुण मुलाच्या जाण्याचे दु:ख हे आयुष्यभरासाठी आहेच.ते कधीही न संपणारे आहे.शिवाय शेजाऱ्यांच्या नजरेत त्यांना दया,कीव, संशय, शंका,पालक म्हणून त्यांना आलेल नाकर्तेपण(लोकांच्या नजरेत)हे सगळ सोसाव लागत असेल का?'हा बघ,हा बघ याच्याच मुलाने आत्महत्या केली ना?'लोकांच्या अशा चर्चा टाळण्यासाठी घर सोडावे लागत असेल कदाचित!😔
हे कुठेतरी थांबायला हवे.
मुल आणि पालक यांच्यात सुसंवाद हवाच.
सौ.स्नेहा प्रसाद पाटील

Address

'Atmaprabha' Tilak Nagar
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ignite your Minds posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Ignite your Minds:

Shortcuts

Share

Category