Swapnapurti Foundation

Swapnapurti Foundation This is the official page of Swapnapurti Foundation. this foundation is a group of friends which is interested in Educational, Social works.

since 20 july 2012 this foundation has been working. Prashant Waghaye is the founder president of this foundation

At Drishtikon 2030, organised by Policy, Law and Network Foundation in association with Swapnapurti Foundation, image-bu...
12/10/2025

At Drishtikon 2030, organised by Policy, Law and Network Foundation in association with Swapnapurti Foundation, image-building expert and director of Sahastrajith Ms. Sayali Nalavade-Kavitkar, shared her deep insights on Personal branding, Image management, Public relations, Strategic planning and the Power of social media.

She emphasized how professionals across sectors can craft a strong, authentic presence, one that truly reflects their values, vision and purpose. Her session offered a fresh lens on visibility, communication and the delicate balance between perception and reality. A thought-provoking talk that reminded delegates in leadership and in life, image matter- when it’s rooted in integrity.

The session was hosted by PhD scholar Neha Jangam along with Chevening Scholar and practicing lawyer at Nagpur Bench of Mumbai HC Adv. Deepak Chatap.

Deepak Chatap

In a deeply rooted and eye-opening session at Drishtikon 2030, senior journalist, author, and rural life scholar Mr. Sam...
09/10/2025

In a deeply rooted and eye-opening session at Drishtikon 2030, senior journalist, author, and rural life scholar Mr. Sampat More spoke about the importance of understanding rural India, its culture, its cooperative movements and its leadership.

He emphasized that true national development cannot happen unless we include and engage with rural realities. From changing cultural landscapes to the need for policy rooted in ground-level understanding, his session made a strong case for reconnecting with our villages and learning from them.

The session was hosted by Adv. Ashvini Mehetre, President of Rayat Kranti Shetkari Sanghatna (Youth Wing) along with CM Fellow Aniket Nagarkar.

संपत लक्ष्मण मोरे Deepak Chatap

19/07/2025

नमस्कार!

२० जुलै २०१२ पासून सुरू झालेला स्वप्नपूर्ती फाउंडेशनचा प्रवास उद्या, २० जुलै २०२५ रोजी १३ वर्षे पूर्ण करत आहे.

या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला, आजवरच्या या सुंदर, प्रेरणादायी प्रवासाची माहिती देणारी डॉक्युमेंटरी आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहोत, याचा आम्हाला मनःपूर्वक आनंद होत आहे.

या प्रवासात आमच्या सोबत असलेल्या सर्व पदाधिकारी, सदस्य, सहकारी, प्रायोजक, हितचिंतक आणि समाजातील प्रत्येक घटकांचे मन:पूर्वक आभार!

आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आणि विश्वासामुळेच आज स्वप्नपूर्ती फाउंडेशन हे नाव सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण करू शकले आहे.

यापुढेही हे स्वप्न, ही वाटचाल न थांबता, न थकता सुरूच राहील...

पुनश्च सर्वांचे मनस्वी धन्यवाद आणि १३ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या आईचा वाढदिवस ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बॅग वाटप करणे, वृक्षारोपण करणे अशा कल्पक उपक्रमांनी साजरा कराव...
25/06/2025

आपल्या आईचा वाढदिवस ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बॅग वाटप करणे, वृक्षारोपण करणे अशा कल्पक उपक्रमांनी साजरा करावा, असा विचार करणारे युवक आज समाजात आहेत, ही एक महत्वाची उपलब्धी आहे. स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे सहकारी अनिकेत नगरकर यांना अलीकडेच त्यांचे पहिले विद्यावेतन (stipend) मिळाले, त्याचा सदुपयोग करत त्यांनी मातोश्री सौ. रंजना अविनाश नगरकर यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून जि. प. प्राथमिक शाळा खुर्शीपार येथील विद्यार्थ्यांना बॅग वाटप केले. सोबतच वृक्षारोपणही केले.

या कार्यक्रमाला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनीलभाऊ मेंढे, जि. प. सदस्या डॉ. मनिषाताई चंद्रकांत निंबार्ते, स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे सल्लागार किशोरभाऊ वाघाये, स्थानिक सरपंच विनायकजी मडावी, उपसरपंच रत्नाकरजी नागलवाडे, मुख्याध्यापक बी. पी. राघोर्ते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदराव उरकुडे, शिक्षक अविनाशजी नगरकर, सौ. रंजना नगरकर, सेवानिवृत्त शिक्षक बाळाजी लांडगे, सुरेशजी वाघाये आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे सहकारी विशाल हटवार, नितेश टिचकुले, भीष्म लांडगे, लिखित पुडके, दीपक टिचकुले यांनी केले.

Sunil Mendhe Manisha Nimbarte Kishor Waghaye

मा. सुनीलभाऊ मेंढे, आपल्या उपस्थितीसाठी आपले मनःपूर्वक आभार... धन्यवाद... Sunil Mendhe
25/06/2025

मा. सुनीलभाऊ मेंढे, आपल्या उपस्थितीसाठी आपले मनःपूर्वक आभार... धन्यवाद... Sunil Mendhe

आपणास या कार्यक्रमाचे सस्नेह निमंत्रण...Sunil Mendhe Manisha Nimbarte
24/06/2025

आपणास या कार्यक्रमाचे सस्नेह निमंत्रण...

Sunil Mendhe Manisha Nimbarte

4 वर्षांपूर्वी...भंडारा युवक बिरादरी आणि स्वप्नपूर्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'डिजिटल संवाद' या कार्यक...
24/06/2025

4 वर्षांपूर्वी...

भंडारा युवक बिरादरी आणि स्वप्नपूर्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'डिजिटल संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन कोरोना काळात 4 वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यासंबंधी तत्कालीन वेळी विविध माध्यमांमध्ये प्रकाशित वृत्त.

सदर कार्यक्रमाची दखल विविध माध्यमांनी तर घेतली होतीच मात्र समाजातूनही अनेक मान्यवर, सामाजिक, शैक्षणिक संस्था यांनी 'डिजिटल संवाद' या अतिशय उपयुक्त संकल्पनेबद्दल भंडारा युवक बिरादरी आणि स्वप्नपूर्ती फाऊंडेशनचे अभिनंदन केले होते आणि शुभेच्छा दिल्या होत्या.

या उपक्रमासाठी सर्व सन्माननीय तज्ञ डॉक्टर्स आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी देखील त्यांच्या त्यांच्या सत्रामध्ये व्यस्त वेळातुन देखील वेळ दिला हे खुप महत्वाचं होतं कारण त्याशिवाय कार्यक्रम अशक्य होता. सर्व अतिथी मान्यवरांचे, या उपक्रमाचे कौतुक करणाऱ्या लोकांचे आणि हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या माध्यमांचे खूप खूप धन्यवाद.

Yuvak Biradari Swapnapurti Foundation

स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे सहकारी अनिकेत नगरकर यांची मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी निवड झाली. त्यानिमित्त स्वप्नपूर्ती फाउं...
19/06/2025

स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे सहकारी अनिकेत नगरकर यांची मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी निवड झाली. त्यानिमित्त स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने अनिकेत यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लाखनीचे तहसीलदार मा. धनंजय देशमुख साहेब, चेव्हनिंग शिष्यवृत्ती प्राप्त वकील दीपक चटप, जि. प. सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते, स्वप्नपूर्तीचे मोती आणि मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत निंबार्ते उपस्थित होते. या छोटेखानी सोहळ्याला स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत वाघाये, सचिव सुधीर काळे, सहसचिव निलेश राऊत मार्गदर्शक संजय वनवे, उमेश सिंगनजुडे, अंगेश बेहलपांडे तसेच नगरकर कुटुंबीय आणि नातेवाईकही आवर्जून उपस्थित होते.

याप्रसंगी सर्वांनी अनिकेतचे मनःपूर्वक अभिनंदन केले. अनिकेतने दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून नुकतेच डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये मास्टर्स पूर्ण केले आहे. याशिवाय विद्यार्थी दशेपासून तो स्वप्नपूर्ती फाउंडेशनचा भाग म्हणून सक्रीयपणे कार्यरत आहे. दरम्यान, अनिकेतचे हे यश भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शासन-प्रशासनासोबत काम करून अनिकेत अनेक चांगले अनुभव घेईल आणि त्याचा फायदा आगामी काळात आपल्या जिल्ह्यासह विद्यार्थ्यांनाही होईल ही सदिच्छा व्यक्त करत सर्वांनी अनिकेतला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्वप्नपूर्तीच्या यंग ब्रिगेडने विशेषतः विशाल हटवार, लिखित पुडके, दीपक टीचकुले, नितेश टिचकुले, उत्कर्षा पंचबुद्धे, भीष्म लांडगे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांचे कौतुक आणि अभिनंदन...

आपणास या कार्यक्रमाचे सस्नेह निमंत्रण...
18/06/2025

आपणास या कार्यक्रमाचे सस्नेह निमंत्रण...

आमचे सहकारी अनिकेत नगरकर यांची 2025-26 च्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन... अनि...
10/06/2025

आमचे सहकारी अनिकेत नगरकर यांची 2025-26 च्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...

अनिकेत आलेल्या शालेय जीवनापासून स्वप्नपूर्ती फाउंडेशनसोबत काम करत आहेत. अनेक उपक्रमांमध्ये योगदान देत काही उपक्रमांचे ते नेतृत्वही करतात. आजवर स्वप्नपूर्ती फाउंडेशनसह विविध संस्थांसोबत भंडारा, पुणे, मुंबई, दिल्ली अशा विविध ठिकाणी त्यांनी उत्तम काम केलंय.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात पुढच्या वर्षभरात ते प्रशासनासोबत जवळून काम करतील. नव्या गोष्टी शिकतील, प्रशासन समजून घेतील आणि आपलं मौल्यवान योगदानही देतील. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...

प्रिय अनिकेत, स्वप्नपूर्ती फाउंडेशनला आपला अभिमान आहे.

लाखनीमध्ये!स्वप्नपूर्ती फाउंडेशन प्रस्तुत 2 दिवसीय वक्तृत्व प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळातज्ज्ञ मार्गदर्शक, ...
24/04/2025

लाखनीमध्ये!

स्वप्नपूर्ती फाउंडेशन प्रस्तुत 2 दिवसीय वक्तृत्व प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

तज्ज्ञ मार्गदर्शक, सराव सत्रं, मर्यादित प्रवेश

तयार व्हा चांगलं व्यक्तिमत्त्व घडवायला!

Address

Lakhni
441804

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swapnapurti Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share