Entity Finishing School & Junior College, Sonali, Taluka - Kagal

  • Home
  • Entity Finishing School & Junior College, Sonali, Taluka - Kagal

Entity Finishing School & Junior College, Sonali, Taluka - Kagal Place that Change the LIFE

15 ऑक्टोबर आपल्या देशाचे महान सुपुत्र, मिसाईल मॅन थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती....
11/10/2019

15 ऑक्टोबर
आपल्या देशाचे महान सुपुत्र, मिसाईल मॅन थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती.
संपूर्ण देशात हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.
थोडंस इतिहासात डोकावलं तर डॉ कलाम यांच जीवन शिक्षण व पर्यायाने पुस्तके किंवा वाचन यांच्याशिवाय कल्पनाच करू शकत नाही. त्यांचं अग्निपंख नावाचं पुस्तक जणू वाचन, विचार, कृती आणि मग मिसाईल मॅन सर्वांसमोर अवतरतो.
आपल्या मुलांना वाचन, मनन, मग मुद्देसूद आवश्यकतेनुसार बोलणं किंवा असच कांहीस लक्षात आणून देण्यासाठी केलेला हा अल्पसा प्रयत्न. 👏🏼

3 पैकी एका विषयावर जो स्पर्धेवेळी स्वतःच्या हाताने येईल त्या विषयावर म्हणजेच सर्व विषयांची तयारी करावी लागेल. अधिक माहितीसाठी आवश्यक त्या विद्यार्थ्यांना शाळेत पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांचा आधार घेता येईल. आम्हीही हा विषय किंवा या विषयाविषयी कस लिहायचं याविषयी मार्गदर्शन करणार आहोत.
हो सगळं इंग्रजी मधूनच लिहायचं आहे. मुलांना सहभागासाठी प्रोत्साहन द्या. 10 रु फी.
बक्षीस म्हणून पुस्तकच देणार आहोत. ज्या पालकांना किंवा आमच्या हितचिंतकांना शक्य आहे त्यांनी आम्हाला पुस्तक अवश्य भेट द्यावं.
प्राचार्या
इंटिटी फिनिशिंग स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज सोनाळी

नमस्कार,आज दसरा. सर्वांना शुभेच्छा 💐💐परवा गांधी जयंती झाली आणि आमच्याकडून more@गांधी ही स्पर्धा कांही तांत्रिक कारणाने प...
07/10/2019

नमस्कार,
आज दसरा. सर्वांना शुभेच्छा 💐💐
परवा गांधी जयंती झाली आणि आमच्याकडून more@गांधी ही स्पर्धा कांही तांत्रिक कारणाने पुढे ढकलली. आज ती परीक्षा घेण्यात आली.
या स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थाला इंग्रजीतून गांधीजींच्या विषयी कांही प्रश्न विचारण्यात आले होते. यातून मुलांचं वाचन, प्रश्नाचं आकलन, योग्य उत्तर निवडण्यासाठी तार्किक बुद्धी व वेळेचं बंधन पाळत यशस्वी होणं हे सगळं अजमावण्यासाठी या परीक्षेचं आयोजन केलं होतं. दुर्दैवाने या परीक्षेला दुसऱ्या कुठल्याही शाळेची मुलं बसली नाहीत. हे जग फार मोठं आहे, आपल्यापेक्षा कितीतरी चांगल्या भव्य दिव्य गोष्टी इथे भरून उरल्या आहेत. ते आपण मुलांना दाखवायला हवं हे पालकांनी लक्षात न घेतलेंन म्हणा किंवा पालकांनी अट्टाहास न धरलेने म्हणा. असो. जेवायला घातलं, चांगले कपडे दिले, गावाला नेलं किंवा लाड पुरवले किंवा फी भरली म्हणजे जबाबदारी संपत नाही. शिक्षण हा एकमेव उपाय आहे जे आपला वृद्धापकाळात सुंसंस्कृत शिक्षित मुलाच्या रूपाने कामाला येऊ शकेल.

माझ सर्व पालकांना आवाहन आहे आम्हाला अशा दुसऱ्या शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देत चला. आम्ही आमची मुलं नक्की पाठवुन देऊ. आम्ही कमी पडलो तर परत जिद्दीने प्रयत्न करून यशस्वी होऊ. दुसऱ्याच्या यशाचा आनंद साजरा करण्याची खिलाडी वृत्ती आपल्या मुलांच्यात आहे. आपल्या सर्वच मुलांनी कमीत कमी कालावधीत परीक्षा दिली.
या यशस्वी विद्यार्थ्यांच कौतुक करण्यासाठी सोनाळी गावचे सुपुत्र व नेहमी शैक्षणिक कार्याला शक्य ती सर्वतोपरी मदत करणारे श्री रमेश म्हातुगडे, अपूर्वा मेडिकल बिद्री चे श्री संजय खाडे यां दोघांनीही स्वतः उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन दिले. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते दिले. संस्थेचे अध्यक्ष मा श्री सर्जेराव म्हातुगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या सौ म्हातुगडे मॅडम, सुपरवायझर कोंडेकर मॅडम व त्यांची संपूर्ण टीम अशा सर्वांच्या एकत्रित साधनेतून आपल्या मुलांच्या भविष्याला आकार देण्याचं काम इंटिटी मध्ये सातत्याने सुरू आहे. आमच्या अशा उपक्रमांना नेहमीच साथ देणाऱ्या पालकांचं मनापासून आभार व्यक्त करत आहे.
या वर्षी आम्ही मुलांच्या लिखाणातून वाचनाकडे लक्ष देऊन आहोत. इतकंच नाही तर त्यांचा शब्द संग्रह वाढत राहील याची काळजी घेत आहोत. उच्चार स्पष्ट व योग्यच व्हायला हवा याची काळजी घेत आहोत.
पालकांनी जागरूकपणे सतत आम्हाला मार्गदर्शन करत रहावे.
आजच्या कार्यक्रमाची कांही क्षणचित्रे .....

प्रथम क्रमांक -
स्वरांजली संतोष रानमाळे 7 वी
दुसरा क्रमांक -
देवराज दिनकर लाळगे 7 वी
तिसरा क्रमांक -
प्रणव तानाजी डावरे 7 वी
चौथा क्रमांक -
विनायक तानाजी परीट 8 वी
पाचवा क्रमांक
यशराज दत्तात्रय खोळंबे 7 वी

05/10/2019

Trying to shape myself

05/10/2019
04/10/2019

Pre Primary students are on tour at jungle

04/10/2019

Fear...... who care

01/10/2019

Address

Sonali - Pirachiwadi Road

416219

Alerts

Be the first to know and let us send you an email when Entity Finishing School & Junior College, Sonali, Taluka - Kagal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Entity Finishing School & Junior College, Sonali, Taluka - Kagal:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share