22/08/2022
निफ्टी २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२२ ह्या आठ्वड्यासाठीचा अंदाज
निफ्टी, बँक निफ्टी आणि सर्व सेक्टर्स चा दर आठवड्याचा डिटेल मध्ये अंदाज आपण युट्युब विडिओ च्या माध्यमातून बांधतो. तर विडिओ नक्की बघा आणि चॅनल ला सब्स्क्राइब करा.
https://www.youtube.com/watch?v=WhASbbp6wdI
मागच्या आठवड्यात लेख आणि विडिओ बनवायला वेळ झाला नाही. चार्टर्ड वेल्थ मॅनेजर हि परीक्षा असलेने विडिओ बनवायला झाले नाही. ८ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट ह्या आठवड्याच्या अंदाजात आणि विडिओ मध्ये आपण सांगितले होते की निफ्टी ला अल्टिमेट १७७०० हे टार्गेट आहे आणि तेथून एक करेक्शन निफ्टीमध्ये यायची शक्यता आहे पण तेथून निफ्टी १८००० पर्यंत गेला आणि आठवडा क्लोज होताना १७७५० ला क्लोज झाला.
आता आपण ह्या आठवड्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया.
१. निफ्टी ची टाइम्फ्रेम विकली ठेवावी.
२. निफ्टी ला १७८०० ते १८१०० हा एक रेसिस्टन्स झोन मिळत आहे. निफ्टी ने १८००० टच करून तोडण्याचा प्रयत्न केला पण निफ्टी ला ते जमले नाही आणि निफ्टी खाली १७७५० पर्यंत येऊन क्लोज झाला.
३. निफ्टी ची १८ ऑक्टोबर १७ जानेवारी आणि ४ एप्रिल हे हाय जोडून एक ट्रेन्डलाईन खेचली आहे, त्या ट्रेन्डलाईन ला निफ्टी आटा क्लोज झालेला आहे. डेली वर नीट बघितले तर निफ्टी ह्या ट्रेन्डलाईन च्या खाली थोडासा क्लोज झाला आहे.
४. निफ्टी ची विकली कॅण्डल बघितली तर ती एक शूटिंग स्टार ह्या प्रकारची बनलेली दिसून येत आहे. निफ्टी ला आता परत काही आठवडे बेअरीश मोमेन्ट दिसेल असे आपल्याला जाणवत आहे.
५. १८००० हा निफ्टी साठी मेजर रेसिस्टन्स आहे आणि १६७४० ते १६८५० हा एक सपोर्ट झोन निफ्टीला दिसत आहे. निफ्टी चे सध्या तरी टार्गेट हाच सपोर्ट झोन दिसत आहे. अर्थात हे टार्गेट ह्याच आठवड्यात येईल असे नाही कदाचित पुढचा आठवडा पण लागू शकतो.
६. म्हणजेच ह्या आठवड्याचा आपला अंदाज निगेटिव्ह आहे, आणि आपण निफ्टी मध्ये १८००० चा पूट घ्यायचा विचार करत आहोत ज्याला १८००० हाच स्टॉप लॉस असेल आणि १६७०० हे टार्गेट दिसत आहे.
७. स्विंग ट्रेडर्स नि आत्ता आपल्या ट्रेंड्स ना बुक करून बाहेर पडणे चांगले ठरेल. लॉन्ग टर्म इन्वेस्टर्स नि घाबरून न जाता इन्व्हेस्टमेंट होल्ड ठेवली पाहिजे पण नवीन बाय साठी सध्याचे मार्केट योग्य दिसत नाही आहे.
शेअर मार्केट चे अपडेट्स मिळवायचेत? बोनस, स्प्लिट, IPO ह्यांसारख्या अनेक अपडेट्स साठी जॉईन करा अर्थवृद्धी ला फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम वर सुद्धा.
आपल्याला पण असा अंदाज बांधण्यास शिकायचे आहे का? तर वाट कसली बघताय. आत्ताच खालील लिंक वर क्लिक करा.
https://bit.ly/3CocgUS
शेअर मार्केट विषयी व्हिडिओस साठी आमच्या युट्युब पेज ला सबस्क्राईब करा.
https://bit.ly/3QsZW9y
आमच्या फेसबुक पेज ला जरूर लाईक करा.
https://www.facebook.com/arthvruddhi
इंस्टाग्राम पेज ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.instagram.com/arthvruddhi
इन्व्हेस्टमेंट, स्विंग ट्रेडिंग, आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंग च्या आयडियास साठी जॉईन करा अर्थवृद्धी इक्विटी इन्साईट्स हे टेलिग्राम चॅनेल.
https://bit.ly/3GwosTp
अर्थवृद्धी अकॅडमी
लेखक - रुचिर थत्ते