Dahiwad दहिवद

Dahiwad दहिवद दहिवद, ता.अमळनेर. जि.जळगाव Dahiwad is a village in Amalner taluka and Jalgaon district in the state of Maharashtra, India.

दहिवद गावाचं शैक्षणिक बाबतीत एक वेगळं महत्व आहे. तालुक्यात दहिवद गावाच्या राजकीय, सामाजिक आणि संस्कृतीचा प्रभाव नेहमीच महत्वाचा ठरतो.

दहिवद गावातील राजकीय घडामोडींवर अमळनेर तालुक्याचे लक्ष लागून असतं. कारण तालुक्याच्या राजकारणावर दहिवद गावातील राजकीय कौलाचा नेहमीच प्रभाव दिसून येतो.


गुलाबराव वामनराव पाटील यांनी अमळनेर तालुक्याचं पंधरा वर्ष आमदारपद भूषवलं आहे. गावात बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. शासकीय आश्रम शाळाही दहिवद गावाला आहे.

गावातील खंडेरायाची यात्रा हे यात्रोत्सवाचं खास वैशिष्ठ म्हणावं लागेल. यात्रेला बाराबैलगाड्या ओढणे तसेच रात्री रामायणावर आधारीत वन्हांचा कार्यक्रम, हे या यात्रेचं खास वैशिष्ठ आहे. गावाच्या संस्कृतीवर मराठा (पाटील) तसेच माळी, बौद्ध, पारधी, कोळी, भील, गोसावी अशा अठरा पगड जातांचा प्रभाव आहे. It is located around 19 kilometers from Amalner. Dahiwad is home to Navbharat Secondary & Higher Secondary High School.

लग्नात फुलांच्या साजचा नवा ट्रेन्डहळदी, लग्न ते डोहाळे जेवणदहिवमध्ये उपलब्ध
24/03/2025

लग्नात फुलांच्या साजचा नवा ट्रेन्ड
हळदी, लग्न ते डोहाळे जेवण
दहिवमध्ये उपलब्ध

उद्या १२ फेब्रुवारी दहिवदची जत्रा , या बरं
11/02/2025

उद्या १२ फेब्रुवारी दहिवदची जत्रा , या बरं

*दहिवदच्या विचारांची श्रीमंती हरवली*शेतकरी नेते चिमणरावदादा पाटील यांचं निधन झालं, तेव्हाचे शेतकरी नेते शरद जोशी यांच्या...
01/03/2024

*दहिवदच्या विचारांची श्रीमंती हरवली*

शेतकरी नेते चिमणरावदादा पाटील यांचं निधन झालं, तेव्हाचे शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विचारांच्या मुशीत वाढलेले, चिमणरावदादा, शेतकरी आंदोलनासाठी आघाडीवर असतं. शेतकरी राजावरचा अन्याय झाला, तर तो त्यांना कधीच सहन होत नव्हता.

तालुक्याला आणि दहिवदला आंदोलन करण्याची एक संस्कृती चिमणरावदादा यांनी निर्माण केली.

दहिवदच्या स्टॅन्डवर बस अडवून रास्तारोको करणारे दादा, त्या पिढीला आजही आठवतात.
कर्जमुक्तीसाठी नागपूर अधिवेशनात मोर्चा नेणारे दादा, कर्जमुक्तीसाठी सुप्रीम कोर्टाला पत्र लिहिणारे दादा, नामांकित वृत्तपत्रांसाठी लेख लिहिणारे दादा…

चिमणदादा खूप लिहायचे, वाचायचे. दादा कविता करायचे, एकदा त्यांनी घरी नेऊन कविता ऐकवल्या होत्या, त्यात *माझं घर गळकं* अशी एक कविता होती. दादांच्या नंतरच्या कविता, लेख या गळक्या घराच्या पाण्यातच भिजून गेल्या.

दादा आणि त्यांच्या समोरील व्यक्तीच्या वयात ३० ते ४० वर्षांचं अंतर असलं तरी कोणत्या विषयावर बोलायचंय, सध्याचा ट्रेन्ड काय आहे, हे दादांना कळायचं हे विशेष.

चिमणदादा आणि गुलाबराव बापू यांचे राजकीय विचार वेगवेगळे होते. चिमणदादांनी आमदारकीची निवडणूकही लढवली होती.

दादांना जिथे पटायचं नाही तिथे ते सहज एका वाक्यात विषय संपवायचे, मंडळी ऐकत नाही. दादांनी वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत आंदोलनाची, भाषणाची, परखड लिहिण्याची तयारी ठेवली, दादा शेतीचे तेवढेच अभ्यासक होते.

दादांच्या चेहर्यावर कधीच म्हातारपणाचा थकवा दिसला नाही, दहिवदमध्ये असे पर्यंत तरी. दादा गेले असं वाटतंय दहिवदच्या विचारांची श्रीमंतीच गेली.

दादा शेतकरी कर्जमुक्तीची गुढी उभारत असतं, दादा जिथेही असतील तिथे अन्याय मुक्तीसाठी झटण्याच्या तयारीत असतील.

*भावपूर्ण श्रद्धांजली*

जयवंत अशोक पाटील
दहिवद, ता अमळनेर, जळगाव

दु:खद बातमीशेतकरी संघटनेचे नेते चिमणरावदादा पाटील हे आपल्याला सोडून गेले आहेत. माजी आमदार गुलाबराव पाटील यानंतर चिमणदादा...
01/03/2024

दु:खद बातमी
शेतकरी संघटनेचे नेते चिमणरावदादा पाटील हे आपल्याला सोडून गेले आहेत. माजी आमदार गुलाबराव पाटील यानंतर चिमणदादा यांचं जाणं दहिवद आणि तालुक्यासाठी पोरकं झाल्यासारखं आहे.

दादांचे चिरंजीव डॉ श्री चंद्रशेखर पाटील- ओम क्लिनिक यांना दुःखातून सावरण्याचे बळ मिळो.

श्री चिमणराव रामराव पाटील दहिवद वय ९० यांचे दि ०१/०३/२४ रोजी रात्री १०:३०ठिक वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि ०२/३/२४ रोजी दुपारी ठिक१२:०० वाजता डॉ चंद्रशेखर पाटील यांच्या कृषी नगर- ढेकू सीम रोड अमळनेर येथील राहत्या घरापासून निघेल, असं कळविण्यात आलं आहे.

हायस्कूलच्या एका बॅचचं गेट टुगेदर, दहिवद ग्राम पंचायतसमोर जमलेल्या कार
25/02/2024

हायस्कूलच्या एका बॅचचं गेट टुगेदर, दहिवद ग्राम पंचायतसमोर जमलेल्या कार

दहिवदची खंडोबाची जत्रा
24/02/2024

दहिवदची खंडोबाची जत्रा

15/01/2024

गावंमा आपला आपला मां भांडू नका,
गावना तमासा जगसमोर मांडू नका
मनतून गोडगोड बोला

स्पष्टवक्ते, प्रसंगी मवाळ, सर्वांना हवे हवेसे, बापू नथ्थू पाटील गेलेदहिवद गावातील स्पष्ट वक्ते, पण तेवढेच साधे, आपली स्व...
06/08/2023

स्पष्टवक्ते, प्रसंगी मवाळ, सर्वांना हवे हवेसे, बापू नथ्थू पाटील गेले

दहिवद गावातील स्पष्ट वक्ते, पण तेवढेच साधे, आपली स्वतंत्र राजकीय भूमिका ठेवणारे बापुराव नथ्थू पाटील यांचे दहिवद.ता.अमळनेर येथे निधन झाले. अमळनेर तालुक्यात बापूंचं एक मोठं राजकीय वर्तुळ होतं. बापू नथ्थू पाटील यांचे स्पष्ट बोलणे, तरुण, लहान मुलं, ते सम वयस्क या सर्वांना हवं हवंस वाटायचं.

बापूंचा स्वभाव अतिशय मवाळ होता. बापू एक शेतकरी होते, त्यांच्या वागण्याबोलण्यामुळे त्यांचं नाव दहिवदच्या आठवणींमध्ये निश्चितच सन्मानाने घेतले जाईल. स्पष्ट बोलण्याची भूमिका असल्याने बापूंनी मोठा संघर्ष देखील केला. बापू असे अचानक गेल्याने प्रत्येक दहिवदकरासाठी हा धक्का आहे.

बापू नथ्थू पाटील यांची अंतिम यात्रा दहिवद येथे, सोमवारी ७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८ वाजता असल्याचे समजते.

05/02/2023
09/11/2022

दहिवदला दवाखान्यासाठी आमदाराने शिफारस केली नाही, पराभवसाठी तयार राहा #दहिवदकर

Address

Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dahiwad दहिवद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share