11/10/2021
महर्षी वाल्मिक आमुचे गुरू शैक्षणिक मंडळ जळगाव यांचे वतीने - प्रा .प्रमोद चिंचाळे कोळी ( BE Computer , MSW (Social Work ) ) यांच्या हस्ते आज दिनांक -10/10/2021 सकाळी 8 वाजता विखरण ता. एरंडोल जि. जळगाव गावातील कोळी समाजाचे प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे (वह्या , रजिस्टर , पेन , कंपास , चित्रकला वह्या, स्केच पेन इत्यादी) वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा टक्का आणि दर्जा वाढावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत , समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा ध्यास घ्यावा काही मदत लागल्यास आम्ही खंबीरपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन प्रा. प्रमोद चिंचाळे कोळी (टार्गेट अकॅडमी) यांनी केले.
सदर कार्यक्रमास श्री. गोपाल भाऊ कोळी , श्रावण दादा कोळी , शरद चिंचाळे , सुखदेव कोळी ,समाधान कोळी ,गोरख कोळी , अशोक बाविस्कर , गोरख चिंचाळे , योगेश सोनवणे , प्रा. विनोद सोनवणे (टार्गेट अकॅडमी व अभ्यासिका ), गणेश भाऊ कोळी व इतर नागरिक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित उपस्थित होते.