22/11/2021
*डिजिटल हिंगोली सुपरफास्ट न्यूज अपडेट* 22/11/21
*💪🏻जिद्दी आहे म्हणून स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यात Busy आहे...‼️*
🎒दिवाळी सुट्टीनंतर अखेर आज, सोमवारपासून राज्यातील बहुतांश शाळा होणार सुरू; एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसमोर शाळेत पोहोचण्याचा प्रश्न
🦠 ११ ते २० वयोगटातील १,७११ मुले कोरोनाबाधित ; २० दिवसांत रुग्णसंख्येत वाढ, चिंतेचे कारण नसल्याचे तज्ज्ञांचे मत
🚌एसटी संपामुळे विद्यार्थ्यांचीही अडचण ; आजपासून शाळा सुरू, मात्र प्रवासाचा प्रश्न
🥃“…सस्ती दारू, महंगा तेल!”; सुधीर मुनगंटीवारांनी उडवली ठाकरे सरकारची खिल्ली
विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी कमी करण्याच्या निर्णयावरुन सरकारवर टीका
⛈️राज्यात आजही पावसाची शक्यता ; मुंबईत मध्यम सरी
पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
🔰मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, आठ जखमी; प्रवासी वाहन ट्रकच्या मागच्या बाजूने धडकले
🔰 विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने आयारामांना संधी देण्याची परंपरा ठेवली कायम; वरिष्ठ सभागृहातील पक्षाच्या एकूण आमदारांपैकी एकतृतीयांश हे अन्य पक्षांतून भाजपमध्ये दाखल झाले आहेत
💉 मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासन अनुकूल, मात्र लहान मुलांच्या लसीकरणानंतर शाळा सुरु करण्याचा कोविड टास्क फोर्सचा आग्रह
👮🏻♀️ सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील गांजे गावातल्या ग्रामस्थांनी गावातील पहिल्या महिला फौजी शिल्पा चिकणे हिचे जंगी आणि फुलांच्या वर्षावात केलं स्वागत
🔰अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल राणेंनंतर अजून एका भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल; आरोग्यमंत्री टोपेंना….
🔰विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती.मागील काही दिवसांपासून हरियाणामध्ये भाजपाचे प्रभारी म्हणून देखील ते काम पाहत होते.
🌱आंदोलनावर शेतकरी ठाम; हमीभाव कायदा हवाच; पंतप्रधानांना पत्र.हमीभाव, मृतांना आर्थिक मदत आणि दाखल गुन्ह्यांचं काय?”, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीतील ४ प्रमुख मागण्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. यानंतर आता शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारा संयुक्त किसान मोर्चा (SKM) काय भूमिका घेतो यावर सर्वांचेच लक्ष लागले आहे.
🎒दिल्लीत हवेच्या प्रदूषणामुळे शाळा प्रत्यक्ष उपस्थितीसाठी पुढील आदेशापर्यंत राहणार बंद; ऑनलाईन वर्ग आणि बोर्डाच्या परीक्षा राहणार सुरू; शिक्षण संचालनालयाकडून जाहीर
🏥 रिलायन्स हॉस्पिटल आणि धिरुभाई अंबानी स्कूल सर्व्हेमध्ये अव्वल; निता अंबानीच्या व्यवस्थापनाचे यश; प्रतिष्ठित टाईम्स ऑफ इंडिया रँकिंगमध्ये अव्वल स्थान
🎬 अभिनेत्री कंगना रनौतने इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी शीख समुदाय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे
🏏भारतानं टी-20 मालिका जिंकली; अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडचा 73 धावांनी पराभव; या विजयासह भारतानं 3-0 फरकानं मालिका जिंकली
🙏 *सहकार्य करा -इतरांना देखील अवश्य शेअर करा*
=======
💁🏻♂️ *सर्व महत्त्वपूर्ण Update मिळण्यासाठी खालील लिंक जॉईन करा*👇
📲 *[ https://bit.ly/3cbmQA1 ]*
=======================
📢 *डिजिटल हिंगोली* वर *जाहिरात करण्यासाठी संपर्क📲 7769000056*
प्रत्येक बातमीवर डिजीटल नजर..!