03/01/2025
ख्रिसमस दिनानिमित्त जुपिटर एज्युकेट इन्स्टिट्यूट नांदोरी स्क्वेअर हिंगणघाट येथे आनंद मेलाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये क्लास पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये विद्यार्थ्यांनी एकूण 30 स्टॉल लावले होते त्यामध्ये पाणीपुरी भेळपुरी समोसे मंचुरियन आलू नारडे यासारखे अनेक पदार्थ स्टॉलमध्ये होते प्रत्येक विद्यार्थ्यांनी या आनंदमय स्टॉलचा आस्वाद घेतला व व्यावसायिक शिक्षणाचे धडे घेतले.
जुपिटर अकॅडमी मध्ये नेहमीच अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनाची सांगड घालण्यासाठी त्यांना व्यवसायिक मार्गदर्शन मिळण्यासाठी व कोणताही व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो तर त्यामागे खूप मेहनत असते यांचे प्रॅक्टिकल रूपात दर्शन घडवण्यासाठी हा कार्यक्रम घेत असते.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्राध्यापक के डी नवघरे सर तसेच रॉक अड्डाचे कुक आदरणीय राकेश कवडे सर अमोल घोडे सर सचिन झळवाडे सर भाग्यश्री कुठे रोशनी कांबळी प्रिया भोमले निकिता भोमले यांचे विशेष योगदान लाभले.