Late. Nirdhanrao Patil Waghaye Art's & Science College Chopa/Mohadi

  • Home
  • India
  • Gondia
  • Late. Nirdhanrao Patil Waghaye Art's & Science College Chopa/Mohadi

Late. Nirdhanrao Patil Waghaye Art's & Science College Chopa/Mohadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Late. Nirdhanrao Patil Waghaye Art's & Science College Chopa/Mohadi, Education Website, At. , Th. Goregao, Dist. Bhandara, Gondia.

स्व. निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय चोपा जि. गोंदिया येथे 03/01/2025 ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले...
03/01/2025

स्व. निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय चोपा जि. गोंदिया येथे 03/01/2025 ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कार्यकारी प्राचार्या प्रा. छंदा समरित यांच्या अध्यक्षते खाली साजरी करण्यात आली.

स्व. निर्धनराव पाटिल वाघाये महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा.           भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्...
08/09/2024

स्व. निर्धनराव पाटिल वाघाये महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा.
भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय चोपा येथे 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या समरीत मॅडम ह्या होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार हे शिक्षकच असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या गुरु विषयी सन्मानपूर्वक आदर करायला पाहिजे व त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा आपल्यातील विविध अध्यापन कौशल्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना घडवण्याची कार्य केले पाहिजे असे म्हटले.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ.भैसारे ,प्रा.डॉ. बावनकर ,प्रा. शहारे, प्रा. जाधव यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाविषयी सखोल मार्गदर्शन केले. आणि आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना टिकून राहायचे असेल तर अखंडपणे परिश्रम करायला पाहिजे असे सांगितले त्यानंतर शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रा. महिंद्रकुमार फुलझेले आणि प्रा.देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक वाघाये मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन कु.सलोनी बीसेन व यामिनी हरिणखेडे या विद्यार्थिनींनी केले.महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त सेमिनार स्पर्धा घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. कामिनी फुंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि प्रा.वाघाये, प्रा. खुणे व प्रा. थेरे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्या समरीत मॅडम, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

*स्व. निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय चोपा मध्ये 78 वा स्वतंत्र दिवस उत्साहात संपन्न झाला*लक्ष्मी शिक्षण स...
05/09/2024

*स्व. निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय चोपा मध्ये 78 वा स्वतंत्र दिवस उत्साहात संपन्न झाला*
लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रिडा मंडळ केसलवाडा /वाघ द्वारा संचलित स्व. निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय चोपा ता. गोरेगांव जि. गोंदिया मध्ये महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या कु. छंदा समरीत यांचा हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. चंद्रकांतजी खंडेलवाल महाविद्यालय विकास समिती सदस्य होते. तसेच वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जगदिश भैसारे, डॉ. डी. वाय. बावनकर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, चोपा गावातील पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सतिश शहारे यांनी केले.

*महाविद्यालयात एनई‌पी व विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न*चोपा गोरेगांव तालुक्यातील स्व. निर्धन पाटील वाघाये कला व वि...
05/09/2024

*महाविद्यालयात एनई‌पी व विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न*

चोपा गोरेगांव तालुक्यातील स्व. निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय चोया/मोहाडी ता. गोरेगाव येथे बी.ए आणि बी. एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्यायासाठी दिनाक. १३/०८/२०२४ ला नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० था विषयावर इन्डक्शन प्रोग्राम (प्रेरणा कार्यक्रम) महाविद्यालया च्या कार्यकारी प्राचार्या प्रा.कु. छंदा समरीत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाँ. जगदीश भैसारे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. प्रकाश धोटे, रविंद्र विद्यालय चोपा येथील मुख्याध्यापक श्री. डी. एच. भगत सर, कल्पना बहेकार माजी सरपंच चोपा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. डी. वाय. बावनकर व प्रा. एम.एच. फुलझेले यांनी नविन शैक्षणिक धोरण बद्दल बी. ए. व बी. एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अंतिम टप्याला महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या प्रा. कु.छंदा समरित यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगीतल की नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रम बघुन विद्यार्थ्यांनी गडबडून न जाता आणि भीती न बाळगता त्या अभ्यासक्रमाला समजुन घेऊन व त्याला सामोरे जाऊन यश संपादन करावे.
नविन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करणारे आहे. सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा. पांडुरंग कुंडगर व प्रा. प्रेरणा बिसेन यांनी केले, व कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन, प्रा. रजनी वाघाये यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रा. सतिश शहारे, प्रा.नितीन जाधव, प्रा. गोविंद भेंडेकर, प्रा. चुन्नीलाल पावरा, प्रा. जोतिराम साळुंके, प्रा. नरेंद्र जगनित, प्रा. मुखेश मेंढे, प्रा. रेखा खुणे प्रा. तोषिका थेरे, प्रा. परमेश्वर भुस्से व सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट अल्पोपहारांने झाला.

National Sport Day Late N. P. W. Art's & Science College, Chopa/Mohadi. Dist. Gondia Date:- 29/08/2024
30/08/2024

National Sport Day
Late N. P. W. Art's & Science College, Chopa/Mohadi. Dist. Gondia
Date:- 29/08/2024

26/08/2024
26/08/2024

Address

At. , Th. Goregao, Dist. Bhandara
Gondia
CHOPA

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late. Nirdhanrao Patil Waghaye Art's & Science College Chopa/Mohadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share