ABVP Gadchiroli

Contact the school

ABVP Gadchiroli Student power nation power....

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) छात्र संघ एवं सीनेट चुनाव में अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने 9 में से...
03/09/2026

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) छात्र संघ एवं सीनेट चुनाव में अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने 9 में से 9 सीटों पर शानदार विजय प्राप्त कर एक बार फिर इतिहास रच दिया है।

इस चुनाव में उपाध्यक्ष पद पर मिथिलेश माहोरे भारी बहुमत से विजयी हुए। उनकी इस ऐतिहासिक जीत के उपलक्ष्य में "छात्र-चेतना भवन" विदर्भ प्रांत कार्यालय, नागपूर में भव्य स्वागत समारोह आयोजित किया गया।

इस अवसर पर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के राष्ट्रीय सह-संगठन मंत्री देवदत्त जोशी तथा नागपुर महानगर के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे।

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) च्या विद्यार्थी संघ व सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने ...
03/09/2026

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) च्या विद्यार्थी संघ व सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने ९ पैकी ९ जागांवर ऐतिहासिक आणि दणदणीत विजय मिळवला आहे.
हा विजय विद्यार्थ्यांचा ABVP वरील अढळ विश्वास, विद्यार्थीहितासाठी ABVP ने सातत्याने केलेला संघर्ष आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचे फलित आहे.
सर्व विजयी उमेदवारांचे व मेहनती कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन! तसेच महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदगडचिरोली जिल्हा अभ्यासवर्गाचे उद्घाटन आज दि. २२ ऑगस्ट रोजी पार पडले यावेळी प्रमुख उद्घाटक म्...
22/08/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
गडचिरोली जिल्हा अभ्यासवर्गाचे उद्घाटन आज दि. २२ ऑगस्ट रोजी पार पडले यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगरसंघचालक विजय जी ठकरानी उपस्थित होते तसेच जिल्हा प्रमुख प्रा विकास चित्ते , जिल्हा संयोजक उत्कर्षा बावनथडे व इतर विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कुरखेडा शाखेद्वारे सदस्यता अभियान राबवण्यात आला यावेळेस शाखेचे अध्यक्ष नागपूरकर सर, नगर मंत...
21/08/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कुरखेडा शाखेद्वारे सदस्यता अभियान राबवण्यात आला यावेळेस शाखेचे अध्यक्ष नागपूरकर सर, नगर मंत्री पुरोहित कार, व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

🚩अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिल्हा गडचिरोलीशाखा : वडसा🇮🇳 वडसा येथे भव्य तिरंगा यात्रा उत्साहात संपन्न 🇮🇳स्वातंत्र्यदि...
15/08/2026

🚩अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिल्हा गडचिरोली
शाखा : वडसा

🇮🇳 वडसा येथे भव्य तिरंगा यात्रा उत्साहात संपन्न 🇮🇳

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिल्हा गडचिरोली, शाखा वडसा यांच्या वतीने आज आदर्श महाविद्यालय, वडसा ते तहसील कार्यालय क्रीडा संकुल मैदान या मार्गावर भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या तिरंगा यात्रेचा शुभारंभ मोतीलालजी कुकरेजा यांच्या हस्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ध्वज दाखवून करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

यावेळी संकेत मस्के, विकास बोदलकर, प्रा देवेंद्र शिवणकर सर, आकाश बांगरे यांच्यासह आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी प्राध्यापक गण आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🇮🇳“भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” च्या जयघोषात तिरंगा यात्रा उत्साहात संपन्न झाली.🇮🇳

15/08/2026
08/08/2026

*विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे गोंडवाना विद्यापीठावर आंदोलन*

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गडचिरोली विभागाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित शैक्षणिक समस्यांच्या निराकरणासाठी आज गोंडवाना विद्यापीठावर आंदोलन करून कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनामध्ये परीक्षा निकाल वेळेत जाहीर करणे, Withheld निकाल तात्काळ घोषित करणे, निकालावरील चुकीच्या तारखा दुरुस्त करणे, उपस्थित विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखविण्याच्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करणे, उत्तरपत्रिका तपासणीतील त्रुटी दूर करणे, पुनर्मूल्यांकनातील अनियमितता, डिजिटल उत्तरपत्रिकांमधील चुका, "कमवा व शिका" योजनेचे मानधन वेळेवर देणे, विद्यार्थी विकास विभागाच्या कार्यक्रमांची माहिती वेळेत देणे, PET परीक्षा, संशोधकांच्या समस्या तसेच NEP संदर्भातील विविध मागण्या मांडण्यात आल्�

भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली विभागविद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी, परीक्षेतील अनागोंदी थांबवण्यासाठी आणि वेळेत नि...
06/08/2026

भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली विभाग

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी, परीक्षेतील अनागोंदी थांबवण्यासाठी आणि वेळेत निकाल, प्रमाणपत्र व प्रवेश प्रक्रियेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोलीच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

🗓️ दिनांक: ७ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ: सकाळी ११:०० वाजता
📍 स्थळ: गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज बुलंद करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा

दिनांक 31 जुलै 2026, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली नगर द्वारा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे घेण्यात आलेल्या ...
31/07/2026

दिनांक 31 जुलै 2026, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली नगर द्वारा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी 2026 परीक्षेचे प्रलंबित निकाल तात्काळ जाहर करणे तसेच विद्यार्थ्याना आवश्यक प्रमाणपत्रे विहित कालावधीत उपलब्ध करून द्यावे असे निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी गडचिरोली नगर मंत्री संकेत म्हस्के, नगर सह- मंत्री सौरव ढवळे, तन्मय कोडपे, अनिरुद्ध गद्दामवार, रितेश बुरमवार व इतर विद्यार्थी कार्यकर्ता उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गडचिरोली नगराच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने गोंडवाना विद्यापीठातील कुलगुरू, प...
29/07/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गडचिरोली नगराच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने गोंडवाना विद्यापीठातील कुलगुरू, प्र-कुलगुरू, परीक्षा नियंत्रक, सर्व प्राध्यापकवृंद तसेच कर्मचारीवर्ग यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा पत्रक देण्यात आले.

भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे जतन व ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यापीठातील शिक्षक व कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त करत त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली नगर मंत्री संकेत म्हस्के , विकास बोदलकर तसेच परिषदेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Address

Garhchiroli
442603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Gadchiroli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ABVP Gadchiroli:

Shortcuts

Share