Math-Science Dears गणित विज्ञान मित्र

Math-Science Dears गणित विज्ञान मित्र To get interesting facts about Maths and Science join my page and to improve speed and accur

26/12/2025

*जग पुर्णपणे बदलणाऱ्या मोबाईल च्या मुळ पुरुषाचा आज जन्मदिवस.
त्रिवार वंदन👏🏻👏🏻👏🏻

* मार्टीन कूपर*

*मोबाईल फोनचे जनक*

*जन्म - २६ डिसेंबर १९२८

मोबाईल फोनचे जनक मार्टीन कूपर यांचा जन्म अमेरिका मधील शिकागो येथे झाला. जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. तशी पोर्टेबल फोन या संकल्पनेची सुरूवात १९४६ मध्ये अमेरिकेत झाली होती. तत्कालीन मोबाईल फोन्स आताच्या फोन्सच्या तुलनेत अजस्त्र म्हणता येतील इतके मोठे आणि वजनाला अंदाजे ८० पाऊंड (३६ किलो) होते. सुरूवातीला या फोन्सवर फक्त ३ चॅनल्सच्या माध्यमातून संवाद साधता येत असे. ही सेवा १९७०-७२ पर्यंत केवळ कारसाठीच मर्यादित होती. त्यामुळे मार्टिन कूपर यांना ही कल्पना आवडली नाही. त्यांनी विचार केला की, शंभर वर्षांपासून लोक बोलण्यासाठी आपली घरे आणि ऑफिसातील टेबलाला चिकटून आहेत. तारेत बांधले गेले आहेत आणि आता ते मोटारीला चिकटून राहतील. पण आताची वेळ वैयक्तिक सुसंवादाची तसेच पोर्टेबल मोबाइल हँडसेटची आहे. मार्टिन यांनी मोटोरोला कंपनी बरोबर सेलफोनवर काम सुरू केले. १९७३ साली मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर यांनी असा चालताबोलता वापरावयाचा म्हणजेच भ्रमणध्वनी निर्माण केला. ३ एप्रिल १९७३ या दिवशी मोटरोलाचे इंजिनिअर आणि मोबाईल कम्युनिकेशन तंत्रज्ञानावर काम करत असलेल्या पथकाचे प्रमुख मार्टिन कूपर यांनी पहिला मोबाईल कॉल न्यूयॉर्कच्या सहाव्या अॅन्हेन्यू मधून पत्रकार परिषदेला जाण्यापूर्वी आपल्या मोबाईल वरून पहिला फोन न्यूयॉर्क वरून न्यू जर्सीला केला होता. हा कॉल त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बेल लॅबचे जोल इंग्लर यांना केला होता. या कॉल बद्दल मार्टिन म्हणाला होता, "जेव्हा मी न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून हातात फोन धरून बोलत चाललो होतो, तेव्हा रस्त्यावरील लोकांनी मला भर गर्दीतही वाट मोकळी करून दिली होती. त्या वेळी चालता चालता मी बरेच कॉल्स केले, ज्या पैकी एक मी रस्ता ओलांडताना न्यूयॉर्क रेडिओच्या निवेदकाला केला होता, जी तोपर्यंत मी केलेली सर्वात धोकादायक गोष्ट होती." हा जगातला पहिला मोबाईल फोन त्या काळी $ ३९९५ ला विकला गेला होता आणि त्याचं नाव होतं 'द ब्रिक'. त्यावेळी त्याची किंमत पाहता हे उपकरण जनमानसांत लोकप्रिय होईल, अशी सुतराम शक्यताही वाटत नव्हती. पहिल्या मोबाईल फोनचे वजन होते १.१ किलो होता. हा मोबाईल फोन १३ से.मी मोठा व ४.४५ से.मी जाडा होता. त्या काळी त्याची तुलना वीटे बरोबर केली गेली होती. हा मोबाईल फोन १० तास चार्ज केल्यावर २० मिनिट चालायचा. हा अर्थातच खूप जड होता आणि तो बाळगण्यासाठी दुसरी एक बॅग सोबत ठेवावी लागे. त्या नंतर या क्षेत्रात अतिशय वेगाने बदल घडत गेले. १९७९ साली जपानमध्ये टोकियोच्या काही भागांसाठी सेवा देणारं NTT हे जगातलं पहिलं कमर्शियल सेल्युलर नेटवर्क उभं राहिलं. १९८० च्या सुरुवाती पासून मध्यापर्यंत संपूर्ण Automatic Cellular Network विकसित झाले. यालाच 1G असेही म्हणतात. पहिली Automatic मोबाइल फ़ोन सिस्टम ही १९८१ मध्ये विकसित झालेली Nordic Mobile Telephone System (NMTS) ही होती. इथपर्यन्त सगळे मोबाइल हे अवजड होते.

१९८८ सालापासून Handheld म्हणजेच हातात मावण्याजोगे मोबाइल अस्तित्वात आले. त्यांची किंमत स्वस्त असल्याने व वजनाने हलके असल्याने ते लवकरच जगभर प्रसिद्ध झाले. तरीही, नागरिकांसाठी पहिला फोन जवळपास बऱ्याच वर्षांनी बाजारात आला. तो होता, मोटोरोला DynaTAC 8000X. ६ मार्च १९८३ रोजी हा फोन बाजारात आला. हा फोन $२९९५ ला विकला गेला. गंमत म्हणजे, याचा टॉकटाईम होता फक्त ३० मिनीटं आणि याची बॅटरी चार्ज करण्यासाठी वेळ लागत असे १० ते ११ तास. त्या पाठोपाठ मोटोरोलानेच आपला पॉकेट साईझ फोन १९८९ मध्ये बाजारात आणला. हा दिसायला DynaTAC 8000X सारखाच होता, पण आकाराला बराच लहान आणि $१९९५ या किंमतीचा होता. स्मार्टफोन म्हणवता येईल असा पहिला फोन बाजारात आणला IBM ने १९९४ मध्ये. IBM Simon Personal Communicator या नावाचा हा फोन होता जवळपास $११०० ला. भारतात मोबाईल फोन्स यायला ९०चे दशक उजाडावं लागलं होतं. ३१ जुलै १९९५ रोजी भारतात मोबाईलवरून पहिला कॉल केला गेला होता. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकात्याच्या रायटर्स बिल्डिंगमधून नवी दिल्लीतील केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना हा कॉल केला होता. हा कॉल मोदी टेल्स्ट्रा (आताची स्पाईस) या कंपनीच्या नेटवर्कवरून केला होता व यासाठी नोकिया-२११० हा हॅंडसेट वापरला गेला होता. त्यावेळी फ़क्त मूलभूत सुविधा असलेला मोबाईल तब्बल २५ ते ४५ हजारांना होता तर सध्या ४-५ हजारांत 4-G तंत्रज्ञानासहीत स्मार्टफ़ोन मिळू शकतो. त्यावेळी मोबाईलचा outgoing कॉल १६ रुपये प्रतिमिनिट होता तर incoming साठी ८ रुपये प्रतिमिनिट मोजावे लागत होते. मागे पाहताना चाळीस वर्षात या मोबाईलने फारच मोठे अंतर कापले असल्याचे लक्षात येत आहे.

आयफोन, फेसबुक, सॅमसंग गॅलॅक्सी सारख्या स्मार्टफोनने जगाची बाजारपेठ ओसंडून वाहत असताना आणि मोबाईल हे आता सर्वसामान्यांच्या हातातही विराजमान झाले असताना मोबाईल फोनने आपली चाळीशी पार केली, हे अनेकांच्या स्मरणातही राहिलेले नाही. मोबाईलच्या चाळीसाव्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आपल्या आठवणींना उजाळा देताना कूपर म्हणाले होते, "आम्ही हा फोन पोर्टेबल करायचा निश्चयच केला होता कारण माणसे सतत मोबाईल असतात. कुठेही कुठूनही माणसाला फोनवरून संवाद साधता आला पाहिजे यासाठीच आमचा प्रयत्न होता. त्याचवेळी आमची प्रतिस्पर्धी कंपनी 'बेल लॅब' कार फोन तयार करून त्यात आपली मोनापोली मिळविण्याच्या मागे होती. त्या इर्षेवरच आम्ही मोबाईल बनविला. त्याच बरोबर मोबाइलची निर्मिती झाली त्यावेळी त्याचा आकार आणि वजन खूपच होते. पण आता मुठीत सामावणारे मोबाइलही बाजारात आले आहेत. ते पाहून डोळे भरून येतात," अशी भावपूर्ण प्रतिक्रियाही कूपर व्यक्त करतात. अर्थात कूपर यांच्या या शोधा साठी वर्षाच्या सुरवातीलाच 'ड्रेपर प्राईस' देऊन सन्मान केला गेला.

संकलन
गणित विज्ञान मित्र

*राष्ट्रीय गणित दिन* निमित्तानेसमस्त गणित शिक्षक व गणित प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!*💐💐💐💐💐💐💐💐
22/12/2025

*राष्ट्रीय गणित दिन*
निमित्ताने
समस्त गणित शिक्षक व गणित प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!*
💐💐💐💐💐💐💐💐

*विज्ञानाच्या परीभाषेत दिवाळी शुभेच्छा.*Covalent bond  सारखी तुम्हाला आपल्या लोकांची साथ मिळो ,  Diamond सारखी hard तुम्...
21/10/2025

*विज्ञानाच्या परीभाषेत दिवाळी शुभेच्छा.*
Covalent bond सारखी तुम्हाला आपल्या लोकांची साथ मिळो ,
Diamond सारखी hard तुम्हाला सुरक्षा मिळो ,
तुमच्या प्रगतीला Addition reaction चे पंख मिळो,
Carbon compound चे सामर्थ्य तुम्हाला लाभो ,
Vitamins, carbohydrates, proteins पेक्षा चांगली तुमची आकलन शक्ति होवो ,
तुमच्या आयुष्यात कधीच Elimination सारखी reaction होऊ नये , तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचे ionization होवो ,
Acetone पेक्षा थंड झोप तुम्हाला रोज लागो ,
तुमच्या प्रत्येक स्वप्नाला fuel Cell ची POWER मिळो ,
Fullerene पेक्षामोठा आनंद तुमच्या आयुष्यात येवो ,
तुमच्या चेहऱ्यावर Gold पेक्षा जास्त चमक येवो ,
तुम्हाला दीपावलीच्या रासायनिक शुभेच्छा !

*Happy pollution free Diwali*
🌄🌹🌹🌄
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇✨📐
गणिताच्या परीभाषेत दिवाळी शुभेच्छा.*
*सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*! 🔢✨

👉
"जीवनाचे *प्रत्येक समीकरण* उजेडाने भरू दे,
दुःखाचे घटक *शून्य* होऊ दे,
आनंदाचे *गुणाकार* वाढत राहू दे,
आणि यशाचा परिणाम *अनंत* होऊ दे!"

🎇
दीपांच्या प्रकाशात नवे *संख्याज्ञान* उजळू दे,
मनाचे *त्रिकोण* प्रेमाने भरू दे,
संबंधांचे *वर्तुळ* अखंड राहू दे,
आणि सुखाचा *ग्राफ* सतत वर जाऊ दे!
📚
ज्ञानमय आणि आनंदमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎆🪔

🎆 शुभेच्छुक
डॉ. पंकज वामनराव मत्ते
गणित विज्ञान मित्र
www.mathsciencedears.com

✨✨✨✨✨✨
🎇🎇🎇🎇🎇🎇

गणित व विज्ञान यांचे सौंदर्य, सामर्थ्य आणि या विषयातील आव्हाने स्विकारण्यातला आनंदानुभव अतुलनीयच असतो. या सर्वा....

१९९० च्या सुरुवातीचा काळ होता. जपानमधला एक साधासुधा इंजिनियर नाव - मसाहिरो हारा. त्या वेळी बारकोड म्हणजे जरा किचकटच काम ...
11/10/2025

१९९० च्या सुरुवातीचा काळ होता. जपानमधला एक साधासुधा इंजिनियर नाव - मसाहिरो हारा. त्या वेळी बारकोड म्हणजे जरा किचकटच काम होतं. स्कॅन करायला वेळ लागायचा, माहिती थोडीच ठेवता यायची. पण गाड्यांची इंडस्ट्री मात्र झपाट्यानं पुढं जात होती. हारा यांच्या डोक्यात रोज हाच प्रश्न फिरायचा की “यासाठी काहीतरी जलद आणि सोपं उपाय नाही का?”

एक दिवस संध्याकाळी तो आणि याचे मित्र “गो” नावाचा खेळ खेळत बसले होते. काळे-पांढरे दगड चौकटीत ठेवताना त्यांच्या लक्षात आलं की, “अरे, माहिती असंच साठवता आली तर?”
आणि तिथंच जन्म झाला “QR Code” चा.

एक छोटा चौकोन ज्यामध्ये कोणत्याही कोनातून स्कॅन होणारा, थोडाफार खराब झाला तरी चालणारा, आणि बारकोडपेक्षा शंभरपट जास्त माहिती ठेवणारा.

हारा आणि त्यांची टीम (Denso Wave) यांनी हा शोध विकायला नाही किंवा स्वतःच्या नावावर पेटंट करून नाही घेतला.या उलट सगळ्यांसाठी फुकट ठेवला “जो वापरू इच्छितो, तो वापरा.”
आणि बघता बघता तो QR Code जगभर पसरला.

आज आपण सगळे त्याचाच वापर करतो आहे. जेवणाचा मेन्यू बघण्यासाठी, पेमेंट करण्यासाठी, दुकानात बिल स्कॅन करायला, इव्हेंटचं आमंत्रण उघडायला.

मसाहिरो हारा यांनी कधी प्रसिद्धी साठी काम केलं नाही पण त्यांनी केलेली ती शांत कल्पना आज आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग बनली आहे. अगदी आपोआप वापरला जाणारा, पण सगळ्यांना जोडणारा.
सोप्या भाषेत ✍🏻

25/09/2025

*नवरात्र उत्सवानिमित्त*

*रोजालिंड फ्रँकलिन : DNA ची गूढता उलगडणारी विज्ञानदेवी*

नवरात्रात आपण देवीची विविध रूपे स्मरतो – ज्ञान, शौर्य, करुणा, त्याग आणि जिद्द यांचे प्रतीक म्हणून. खऱ्या आयुष्यात काही स्त्रिया या गुणांचे मूर्तिमंत उदाहरण ठरतात. अशा तेजस्विनींपैकी एक म्हणजे रोजालिंड फ्रँकलिन विज्ञानविश्वातील एक दुर्लक्षित परंतु क्रांतिकारी संशोधक. तिच्याशिवाय DNA ची दुहेरी हेलिक्स रचना इतक्या लवकर समोर आली नसती.
DNA म्हणजे जीवनाचा आराखडा – तो आपल्या प्रत्येक पेशीत साठवलेली माहिती ठरवतो आपण कसे दिसू, शरीर कसे काम करेल आणि रोगांशी कसा सामना करू. आजच्या काळात DNA मुळे जीनोमिक्स, औषधनिर्मिती, वंशावळ आणि रोगनिदान शक्य झाले आहे.

रोजालिंडचा जन्म २५ जुलै १९२० रोजी लंडनमध्ये, एक विद्वान यहुदी कुटुंबात झाला.ती लहानपणापासून अभ्यासू, शिस्तप्रिय आणि काटेकोर होती. खेळण्यांपेक्षा तिला प्रयोग आणि वाचन अधिक आवडायचे.
शाळेत असतानाच तिने विज्ञानात करिअर करायचे ठरवले. त्या काळी विज्ञानात स्त्रियांचा सहभाग अत्यल्प होता, तरीही ती डगमगली नाही.
केंब्रिज विद्यापीठातून तिने नैसर्गिक विज्ञानात उच्च शिक्षण घेतले.कडक शिस्त, स्वच्छ विचार आणि अभ्यासातील प्रामाणिकपणा ही तिची बलस्थाने होती.
रोजालिंडने संशोधनासाठी X-ray diffraction या तंत्राचा वापर सुरू केला. या तंत्राने एखाद्या अणू किंवा रेणूची अंतर्गत रचना अभ्यासता येते.
सुरुवातीला तिने कोळशाच्या अणुरचनेचा अभ्यास केला.
तिचे संशोधन आजही कोळशाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते.
यातूनच तिला अत्यंत सूक्ष्म व अचूक संशोधन करण्याची सवय लागली, जी पुढे DNA च्या कामात निर्णायक ठरली.
१९५१ मध्ये रोजालिंड लंडनमधील किंग्स कॉलेजमध्ये काम करू लागली. तिच्या हातात आला DNA च्या रचनेचा गूढ प्रश्न.तिने DNA वर X-ray diffraction प्रयोग केले.१९५२ मध्ये तिने घेतलेले एक छायाचित्र – “फोटो ५१” – हे विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे चित्र ठरले.या छायाचित्रात DNA ची दुहेरी हेलिक्स (Double Helix) रचना स्पष्टपणे दिसत होती.
पण रोजालिंडच्या परवानगीशिवाय हे छायाचित्र इतर संशोधकांना दाखवण्यात आले. त्यावर आधार घेऊन वॉटसन आणि क्रिक यांनी DNA चा मॉडेल सिद्ध केले.
१९६२ मध्ये वॉटसन, क्रिक आणि विल्किन्स यांना DNA च्या रचनेसाठी नोबेल पुरस्कार मिळाला. पण रोजालिंडचे नाव तिथे नव्हते.
याचे कारण म्हणजे ती १९५८ मध्येच निधन पावली होती (नोबेल मृत व्यक्तींना दिले जात नाही).
पण त्याहूनही मोठे कारण म्हणजे त्या काळात स्त्रियांचे योगदान वारंवार दुय्यम मानले जायचे.
आज मात्र विज्ञानविश्व मान्य करते की DNA च्या शोधामागे रोजालिंड फ्रँकलिनचे कार्य अमूल्य होते.
रोजालिंडने केवळ DNA पुरतेच मर्यादित काम केले नाही.कोळशाची रचना – तिच्या कामामुळे उद्योग व ऊर्जा क्षेत्राला दिशा मिळाली.
व्हायरस संशोधन – पोलिओ व इतर व्हायरसची संरचना उलगडून दाखवली. हे वैद्यकीय संशोधनात महत्त्वाचे ठरले.

दीर्घकाळ X-ray radiation मध्ये काम केल्यामुळे तिच्या शरीरावर परिणाम झाला.१९५६ मध्ये तिला गर्भाशयाचा कर्करोग झाला.३७ व्या वर्षी, १६ एप्रिल १९५८ रोजी तिचे निधन झाले.
तिचे आयुष्य लहान होते, पण तिचे कार्य आजही विज्ञानाला दिशा देत आहे.

संकलन -www.mathsciencedears.com

नवरात्री निम्मित... *एडा लव्हलेस : जगातील पहिली संगणक प्रोग्रॅमर*       आपण जेव्हा संगणक, मोबाईल, ऍप्स, इंटरनेट या सगळ्य...
25/09/2025

नवरात्री निम्मित...

*एडा लव्हलेस : जगातील पहिली संगणक प्रोग्रॅमर*

आपण जेव्हा संगणक, मोबाईल, ऍप्स, इंटरनेट या सगळ्या गोष्टी वापरतो, तेव्हा आपल्याला वाटतं की हा सगळा तंत्रज्ञानाचा चमत्कार पुरुष शास्त्रज्ञांनी घडवला असेल. पण खरं सांगायचं तर या संगणक विश्वाचा पाया घालणारी व्यक्ती होती एक स्त्री – एडा लव्हलेस (1815–1852, इंग्लंड).

ती केवळ गणितात तरबेज नव्हती, तर कल्पनाशक्तीतही आघाडीवर होती. म्हणूनच तिला “जगातील पहिली संगणक प्रोग्रॅमर” म्हणतात.
एडाचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. तिचे वडील होते प्रसिद्ध कवी लॉर्ड बायरन, पण त्यांनी लहान वयातच कुटुंब सोडले. त्यामुळे एडा आईकडे वाढली. आईला वाटायचं की मुलगी वडिलांसारखी केवळ कल्पनाविलासी नको व्हायला; म्हणून तिने एडाला गणित आणि तर्कशास्त्र शिकवलं.
कल्पना करा – १९व्या शतकात ज्या काळात स्त्रियांना गणित शिकणं सुद्धा फारसं प्रोत्साहन दिलं जात नव्हतं, त्या काळात एडाने हे विषय निवडले. तिची ही धाडसी वाटचाल खरं तर पुढच्या पिढ्यांसाठी एक प्रेरणाच आहे.
एडाची भेट झाली गणितज्ञ चार्ल्स बॅबेज यांच्याशी. बॅबेज यांनी "Analytical Engine" नावाचं यंत्र सुचवलं होतं – जे प्रत्यक्षात बनलं नव्हतं, पण त्याची संकल्पना ही आजच्या संगणकाचा पाया होती. एडाने या यंत्रावर काम करताना काही नोट्स लिहिल्या. त्या नोट्समध्ये तिने केवळ मशीन कसे चालेल हेच समजावलं नाही, तर त्यासाठी अल्गोरिदमसुद्धा लिहिले. आणि हा अल्गोरिदम म्हणजेच जगातील पहिला कंप्यूटर प्रोग्राम मानला जातो.
बाबाबाब बाबएडाने संगणकाची कल्पना फक्त गणिती गणना करणारे यंत्र म्हणून केली नाही. तिने असं भाकीत केलं होतं की भविष्यात संगणक संगीत, कला, विज्ञान, आकडेवारी – सगळं हाताळेल. आज आपण मोबाईलवर गाणी ऐकतो, चित्रं बनवतो, गणना करतो – हे सगळं तिने शंभर वर्षांपूर्वीच ओळखलं होतं!
एडाचं आयुष्य मोठं नव्हतं – फक्त ३६ वर्षे. पण या थोडक्या आयुष्यात तिने जे विचार मांडले, त्यावर संपूर्ण डिजिटल जग उभं आहे. आज संगणक शास्त्रात तिचं नाव घेतलं जातं, तिला “आई ऑफ कंप्युटिंग” म्हणतात.
आज जगभरातील मुली जेव्हा कोडिंग शिकतात, तेव्हा त्या नकळतपणे एडाच्या पावलावर चालत असतात. तिच्या नावाने Ada नावाची प्रोग्रॅमिंग भाषासुद्धा तयार करण्यात आली आहे.
एडाने दाखवून दिलं की बुद्धिमत्ता, जिज्ञासा आणि कल्पनाशक्ती यांना लिंग नसतं. आणि म्हणूनच तिचं स्थान विज्ञान-तंत्रज्ञानाच्या इतिहासात अमर आहे.
नवरात्राच्या निमित्ताने अशा अद्वितीय स्त्रीला आठवणं म्हणजे खऱ्या शक्तीची ओळख करून घेणं होय. एडा लव्हलेस ही केवळ संगणक जगतातील एक नाव नाही, तर ती आहे स्त्रियांच्या सर्जनशीलतेचा आणि धाडसाचा जिवंत पुरावा.

*संकलन
www.mathsciencedears.com

विज्ञानातील रंजक शोधकथाजेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाच्या शोधासोबत आणखी एक महत्त्वाचा शोध लावला. त्या शोधाबद्दल जाणून घेऊया...
19/09/2025

विज्ञानातील रंजक शोधकथा

जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाच्या शोधासोबत आणखी एक महत्त्वाचा शोध लावला. त्या शोधाबद्दल जाणून घेऊया ...

जेम्स वॅटच्या इंजिनाच्या आधीच एका स्टीम इंजिनचा शोध लागला होता. १७१२ मध्ये थॉमस न्यूकमेनने वाफेवर चालणारे बीम इंजिन (beam engine) शोधलं होतं. न्यूकमेनचे इंजिन अवाढव्य होते. त्यामध्ये पिस्टन एकाच दिशेने चालायचा आणि प्रत्येक वेळी पिस्टन स्ट्रोकनंतर सिलिंडर थंड करावा लागत असे. ही प्रक्रिया वेळखाऊ होती आणि त्यामुळे बीम इंजिन धीमे होते आणि त्याची कार्यक्षमता कमी होती. खाणीमध्ये साचलेले पाणी पम्प करून बाहेर काढण्यासाठी प्रामुख्याने बीम इंजिन वापरले जात होते.

१७६४ मध्ये वॉटने “कंडेन्सिंग सिलिंडर” (condensing cylinder) शोधला.
त्यामुळे वाफ एका वेगळ्या सिलिंडरमध्ये थंड केली जायची आणि मुख्य सिलिंडर नेहमी गरम राहायचा.
यामुळे प्रक्रिया जलद, सोपी आणि कार्यक्षम झाली.

जेम्स वॅटने इंजिन मध्ये केलेली सुधारणा अफाट होती. आणि त्यामुळे अनेक अवजड कामांसाठी आता वाफेची ताकद वापरता येणार होती. पण जेव्हा इंजिन म्हणजे काय हेच लोकांना माहित नव्हते तेव्हा ते विकणार कसे ? तेव्हा प्रचंड अवजड कामे नव्हतीच. होती फक्त शेतीची कामे. कृषीप्रधान समाजाला ती कशी विकावी?

इंग्लंडमध्ये तेव्हापर्यंत सगळं घोड्यांच्या ताकदीवर चालायचं.
लोकांना घोड्यांशिवाय दुसऱ्या शक्तीची कल्पनाच नव्हती.

आणि इथे येतो जेम्स वॅटचा दुसरा शोध ! जेम्स वॉटने लोकांच्या भाषेत बोलायचं ठरवलं.
तो आपल्या इंजिनबद्दल “तांत्रिक” बोलला नाही, तर घोड्यांच्या तुलनेत बोलला.
त्याने “Horsepower” हे एकक तयार केलं.

सामान्यतः एक घोडा दिवसभरात जेवढं काम करतो – ३३,००० पाउंड पाणी १,००० फूट खोल विहिरीतून वर काढणं – ते गणित त्याने एका फॉर्म्युल्यात बदललं.
त्याने सांगितलं – १ Horsepower = ५५० पाउंड वजन १ फूट वर १ सेकंदात उचलणं.

आता शेतकरी आणि खाणमालक इंजिनाची ताकद सहज समजू शकत होते.
१ हॉर्सपॉवर इंजिन = १ घोड्यांचं काम.
१० हॉर्सपॉवर इंजिन = १० घोड्यांचं काम.
आणि हे इंजिन २४ तास सतत चालू शकतं, घोड्यांसारखी विश्रांती इंजिनाला नको होती.
म्हणजे एक इंजिनाने तीन पटीने जास्त काम करता येत होतं.

वॉटने घोड्यांचं गणित मशीनमध्ये बदललं. यामुळे लोकांची भीती कमी झाली आणि मशीन स्वीकारणं सोपं झालं.

वॉट स्वतःच्या नाविन्यपूर्ण शोधात अडकून राहिला नाही. त्याने ग्राहकांच्या डोक्यात घुसून त्यांच्या भाषेत संवाद साधला. त्यामुळेच संपूर्ण जगाला औद्योगिक क्रांती समजावून देण्याचे काम त्याला करता आले.

आजही हॉर्सपॉवर ही मापनाची एककं वापरली जातात.

स्टीव्ह जॉब्सने जेव्हा पहिल्यांदा आय-पॉड लाँच केला. तेव्हा त्याने ते नाजूकसे छोटे उपकरण आपल्या जीन्सच्या खिशातून बाहेर काढले आणि म्हणाला "१००० गाणी तुमच्या खिशात !"
ग्राहकांना आय - पॉडचा आकार सेंटीमीटर मध्ये सांगितला नाही आणि मेमरी किती बाइट्स आहे ते पण सांगितले नाही. त्याने तीच भाषा वापरली जी ग्राहकांना कळते !

चांगली मार्केटिंग म्हणजे चांगला संवाद ! ग्राहकांना कळेल असा संवाद !
जर तुमचे उत्पादन किंवा सेवा ग्राहकांचा कोणता प्रॉब्लेम सोडवत आहे हे ग्राहकाला कळेल अशा भाषेत समजावता आले तर तुम्हाला मार्केटिंग जमतेय असे समजा !

संकलन
गणित विज्ञान मित्र
www.mathsciencedears.com

Be SUCCESS In Life
14/09/2025

Be SUCCESS In Life

How to study Chemistry
14/09/2025

How to study Chemistry

How to Study PHYSICS
14/09/2025

How to Study PHYSICS

08/09/2025

*शिक्षकाची कदर.....✒️*

अल्बर्ट फर्नांडिस यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं आहे.

•°`´°• रोममध्ये एकदा पोलिसांनी मला दंड केला. कामात असल्यानं मला वेळेवर दंड भरता आला नाही. त्यामुळे कोर्टात जावं लागलं. न्यायाधीशासमोर उभं केल्यावर त्यांनी कारण विचारल्यावर मी म्हटलं, "प्रोफेसर आहे, कामात एवढा गुंतलो की वेळच मिळाला नाही."
माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आंत न्यायाधीश म्हणालेत,
•°`´°• *अ टीचर इज इन द कोर्ट ...!*
लगेचच सगळे लोक उठून उभे राहिले आणि त्यांनी माझी माफी मागितली व माझा दंडही रद्द केला गेला.
त्या देशाच्या यशाचं रहस्य तेव्हा मला कळलं.
•°`´°• *ज्यांना अतिविशिष्ट किंवा व्हीआयपी म्हणतात ते कोण असतात ?*
•°`´°• *अमेरिकेत* केवळ दोन प्रकारच्या लोकांना अतिविशिष्ट मानलं गेलं आहे. *वैज्ञानिक आणि शिक्षक*.
•°`´°• *फ्रान्सच्या* न्यायालयां मधे केवळ *शिक्षकांनाच* खुर्चीवर बसायचा अधिकार आहे.
•°`´°• *जपानमध्ये* सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच पोलीस एखाद्या *शिक्षकाला* अटक करू शकतात.
•°`´°• *कोरियात* प्रत्येक *शिक्षकाला* ते सगळे अधिकार आहेत जे भारताच्या मंत्र्याला मिळतात तेही केवळ आपलं ओळखपत्र दाखवून.
•°`´°• *अमेरिकन* आणि *युरोपीय* देशांमध्ये प्राथमिक *शिक्षकाला* सर्वाधिक वेतन मिळतं, कारण तेच कच्च्या भांड्यांना आकार देतात.
*•°`´°• ज्या समाजात शिक्षकांचा अपमान होतो,"मास्तरडा" म्हणून हिणवलं जातं, तिथं फक्त गुंड,मवाली,भामटे,धर्मांध,पाखंडी,ढोंगी, चोर, आणि भ्रष्टाचारीच निर्माण होतात.*

*सर्व शिक्षकांना समर्पित.*

*_वाचाल तर वाचाल_*
📚📖📚📖📚📖📚

🧘‍♂🧘‍♀🧘‍♂🧘‍♀🧘‍♂🧘‍♀🧘

08/09/2025

*शून्य आणि अनंत,गरीब आणि श्रीमंत* तुला कसं कळतं
की तू श्रीमंत आहेस ?
एक अद्भुत उत्तर
एका IIT विद्यार्थ्याकडून.
जेव्हा मी माझं B.Tech करत होतो, तेव्हा आमच्याकडे ‘Mechanics’ शिकवणारे एक प्राध्यापक होते.
त्यांचे लेक्चर्स खूपच रंजक असायचे कारण त्यांची शिकवण्याची आणि संकल्पना समजावण्याची पद्धत वेगळीच होती.
एकदा वर्गात त्यांनी काही प्रश्न विचारले:

१. शून्य म्हणजे काय?
२. अनंत म्हणजे काय?
३. शून्य आणि अनंत एकच असू शकतात का?
आम्हाला वाटलं की आम्हाला उत्तरं माहिती आहेत आणि आम्ही म्हणालो:
शून्य म्हणजे काहीच नाही.
अनंत म्हणजे कोणत्याही मोजता येणाऱ्या संख्येपेक्षा मोठी संख्या.
शून्य आणि अनंत हे विरुद्ध आहेत आणि ते कधीच सारखे होऊ शकत नाहीत.
त्यांनी आम्हाला प्रतिवाद करत विचारलं – अनंत म्हणजे नेमकं काय? कोणतीही संख्या कशी काय कोणत्याही मोजता येणाऱ्या संख्येपेक्षा मोठी असू शकते?
आमच्याकडे उत्तर नव्हतं.
मग त्यांनी अनंताची संकल्पना एका मनोरंजक पद्धतीने समजावून सांगितली, जी मला आज ३५ वर्षांनंतरही आठवते.
ते म्हणाले – एखादा निरक्षर मेंढपाळ आहे, ज्याला फक्त २० पर्यंत मोजता येतं अशी कल्पना करा.
जर त्याच्याकडे २० पेक्षा कमी मेंढ्या असतील तर तो नेमकी संख्या सांगू शकेल (जसं की ३, ५, १४ वगैरे).
पण जर संख्या २० पेक्षा जास्त असेल, तर तो म्हणेल – “खूप आहेत.”
त्यांनी मग समजावलं की विज्ञानात “अनंत” म्हणजे ‘खूप आहेत’ (आणि मोजता न येण्याजोगं नव्हे) आणि त्याचप्रमाणे “शून्य” म्हणजे ‘फार कमी’ (आणि काहीच नाही नव्हे).
उदाहरण म्हणून ते म्हणाले – जर पृथ्वीचा व्यास सूर्यापर्यंतच्या अंतराशी तुलना केला, तर पृथ्वीचा व्यास फारच लहान असल्यामुळे त्याला शून्य म्हणता येईल.
पण हाच पृथ्वीचा व्यास जर एका धान्याशी तुलना केला, तर तोच व्यास अनंत म्हणता येईल.
म्हणून त्यांनी निष्कर्ष काढला की तीच गोष्ट शून्यही होऊ शकते आणि अनंतही, हे पूर्णपणे संदर्भावर, किंवा तुलना करण्याच्या मापदंडावर अवलंबून असतं.
श्रीमंती आणि गरिबी यांचं नातं देखील शून्य आणि अनंत यांच्यासारखंच आहे.
हे सगळं तुमच्या इच्छांच्या तुलनेवर अवलंबून आहे.
जर तुमचं उत्पन्न तुमच्या इच्छेपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही श्रीमंत आहात.
जर तुमच्या इच्छा तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतील, तर तुम्ही गरीब आहात.
मी स्वतःला श्रीमंत मानतो कारण माझ्या इच्छा माझ्या उत्पन्नापेक्षा खूपच कमी आहेत.
मी श्रीमंत झालोय ते खूप पैसा मिळवून नव्हे, तर माझ्या इच्छांना कमी करून.
जर तुम्ही तुमच्या इच्छांना कमी करू शकलात, तर तुम्हीही या क्षणी श्रीमंत होऊ शकता.
*तुमचं आयुष्य नेहमी चांगल्या विचारांनी, चांगल्या कर्मांनी,चांगल्या लोकांनी आणि सुंदर मित्रांनी श्रीमंत होवो*.

Address

Gadchandur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Math-Science Dears गणित विज्ञान मित्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Math-Science Dears गणित विज्ञान मित्र:

Shortcuts

Share