Sahyadri ITI Sawarde

Sahyadri ITI Sawarde At/Post :- Sawarde, Tal:- Chiplune Dist:- Ratnagiri.

दि.07/03/2026सह्याद्री आय.टी.आय आणि महिंद्रा अँड महिंद्रा नाईक मोटर्स चिपळूण ऍडव्हान्स व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्...
07/03/2026

दि.07/03/2026
सह्याद्री आय.टी.आय आणि महिंद्रा अँड महिंद्रा नाईक मोटर्स चिपळूण ऍडव्हान्स व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न
सह्याद्री शिक्षण संस्थेचे सह्याद्री आय.टी.आय सावर्डे मध्ये महिंद्र अँड महिंद्रा नाईक मोटर्स चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानाने महिंद्रा थार रॉक्स द एस व्ही फोर एक्स या व्हेईकल संदर्भातील ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न झाले.

दि.28/02/2026 *विज्ञानातून कौशल्य आत्मसात करा*- *सौ पूजाताई निकम* राष्ट्रीय विज्ञान दिन व चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आम...
05/03/2026

दि.28/02/2026 *विज्ञानातून कौशल्य आत्मसात करा*- *सौ पूजाताई निकम*
राष्ट्रीय विज्ञान दिन व चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. शेखरजी निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सह्याद्रि शिक्षण संस्थेचे सह्याद्रि आय.टी.आय. सावर्डे मध्ये तांत्रिक मॉडेल प्रदर्शन 2026 चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नवनिर्वाचित रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या सौ.पूजाताई शेखर निकम,नवनिर्वाचित रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य श्री.संजय राजाराम कदम,नवनिर्वाचित चिपळूण पंचायत समिती सदस्य श्री.शौकत हुसेन मखजनकर,सह्याद्रि शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री.महेश महाडीक,सह्याद्रि आय.टी.आयसावर्डेचे व्यवस्थापन कमिटी सदस्य श्री.अब्दुल रज्जाक इसाक शेख, राधा गोविंद फाउंडेशन सावर्डेचे कार्याध्यक्ष श्री.अनिरुद्ध शेखर निकम, बी एससी.आयटी कॉलेज सावर्डेचे प्राचार्य श्री.एकनाथ गावडे, आय.टी.आय. सावर्डेचे प्राचार्य श्री. उमेश शशिकांत लकेश्री आय.टी.आय सावर्डेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीं उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत सोडून करण्यात आले.
सर्व मांडणी केलेल्या तांत्रिक मॉडेलची सर्व मान्यवरांनी पाहणी केली ,व मॉडेल तयार करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना मॉडेलची माहिती विचारली त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागत व सन्मान आय.टी.आय प्राचार्य श्री.उमेश लकेश्री यांच्या शुभहस्ते करण्यात आला.जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन 2026 मध्ये आय.टी.आय सावर्डेच्या मेकॅनिक मोटार व्हेईकल प्रोजेक्टला 8 वा क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल प्रशिक्षणार्थी कु.सोहम कुंभार व कु.आयुष निवळकर तसेच निर्देशक श्री.प्रशांत भिसे व श्री. प्रथमेश पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच आर.ए.सी निदेशक श्री.सुरेंद्र हातखंबकर यांचा शिवबा प्रतिष्ठान राजापूर यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत तिसरा क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आय.टी.आय संदर्भातील व्यवसाय कोर्सच्या . रिल्स प्रोजेक्टवर दाखवण्यात आल्या.
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ.पूजाताई शेखर निकम यांनी आपल्या मनोगतात विज्ञानातून कौशल्य आत्मसात करा.त्याचबरोबर आय.टी.आयच्या विविध कोर्सेसमधून शिकविले जाणारे विविध कौशल्य आत्मसात करा. व पुढे जावून आप आपल्या गावचे चांगले नागरिक बना व आपली उन्नती करा.जेणेकरून तुमचे व आपल्या सह्याद्रि शिक्षण संस्थेचे नाव उंचावेल असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिटर निर्देशक श्री.सुभाष गोरिवले व आभार प्राचार्य उमेश लकेश्री यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

01/03/2026
सह्याद्री आय. टी. आय. मध्ये “शिवजयंती सोहळा “ साजरा…..
19/02/2026

सह्याद्री आय. टी. आय. मध्ये “शिवजयंती सोहळा “ साजरा…..

सह्याद्री आय. टी. आय. मध्ये “राष्ट्रीय मतदार दिन “ साजरा…..
26/01/2026

सह्याद्री आय. टी. आय. मध्ये “राष्ट्रीय मतदार दिन “ साजरा…..

14/01/2026

जयंती महोत्सव - २०२६

सह्याद्रि शिक्षण संस्थेचे संस्थापक,माजी खासदार,शिक्षणमहर्षि *स्व.गोविंदराव निकम यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त "जयंती महोत...
14/01/2026

सह्याद्रि शिक्षण संस्थेचे संस्थापक,माजी खासदार,शिक्षणमहर्षि *स्व.गोविंदराव निकम यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त "जयंती महोत्सव-२०२६, वर्ष १८ वे*
महोत्सवाचे स्नेहपूर्वक निमंत्रण.

स्व. गोविंदरावजी निकम यांच्या
१८ व्या जयंती महोत्सवाचे आयोजन
दि. १६ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान करण्यात आले आहे.

या निमित्ताने आयोजित
कलाप्रदर्शन, शैक्षणिक, सांस्कृतिक व पुरस्कार वितरण कार्यक्रमास
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

🗓️दिनांक: *१६ व १७ जानेवारी २०२६*

📍स्थळ : *स्व. गोविंदराव निकम 'स्मृतिगंध' स्मारक सह्याद्रि शिक्षण संस्था तंत्रशिक्षण विभाग, सावर्डे*
( https://maps.app.goo.gl/BoPSrQKTiywUfsXL9?g_st=ic )

आपली उपस्थिती आम्हाला प्रेरणादायी ठरेल.

आयोजक : सह्याद्रि परिवार

कृषि विभाग महाराष्ट्र शासन मार्फत सह्याद्री ITI Sawarde मध्ये महा विस्तार AI App बाबत माहिती व शेतकऱ्यांसाठी कृषी विभागा...
10/12/2025

कृषि विभाग महाराष्ट्र शासन मार्फत सह्याद्री ITI Sawarde मध्ये महा विस्तार AI App बाबत माहिती व शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या शासनाच्या विविध योजनाची माहिती देताना उपकृषी अधिकारी जाधव साहेब व पिसाळ साहेब

जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी मार्फत सह्याद्री ITI Sawarde मध्ये उद्योग व रोजगार विषयी मार्गदर्शन करताना उद्योग निरीक्ष...
10/12/2025

जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी मार्फत सह्याद्री ITI Sawarde मध्ये उद्योग व रोजगार विषयी मार्गदर्शन करताना उद्योग निरीक्षक श्रीमती अर्चना सपकाळ मॅडम.

सह्याद्री  आय.टी.आय.सावर्डे मध्ये कौशल्य दीक्षांत समारंभ संपन्न आज दि .04/10/2025 रोजी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या आय.टी...
09/10/2025

सह्याद्री आय.टी.आय.सावर्डे मध्ये कौशल्य दीक्षांत समारंभ संपन्न

आज दि .04/10/2025 रोजी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या आय.टी. आय.सावर्डेमध्ये अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2025मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा कौशल्य दीक्षांत समारंभ ( Convocation ceremony) पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात स्व .गोविंदराव निकम साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून दिपप्रज्वलनाने झाली. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर मा.श्री. चंद्रकांत भाऊराव सुर्वे चेअरमन, व्यवस्थापक कमिटी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावर्डे,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य,मा.श्री. प्रविण वाघचौरे, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राचार्य मा.श्री.माणिक यादव आणि प्रमुख मार्गदर्शक मा. श्री.मंगेश भोसले प्राचार्य,सह्याद्री तंत्रनिकेतन सावर्डे हे लाभले.
आय.टी.आयचे प्राचार्य मा.श्री.उमेश लकेश्री यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सह्याद्री आय.टी.आय.चे प्राचार्य मा.श्री.उमेश लकेश्री यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणामध्ये,आता नवीन प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना आव्हान केले, की तुम्ही सुद्धा पुढील परीक्षेत अव्वल मार्कानी पास होऊन तुमचा सुद्धा गौरव हा मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.
त्यानंतर सह्याद्री आय.टी.आय.चे विविध ट्रेड मधून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह गुलाब पुष्प व उत्तीर्ण प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.
त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.मंगेश भोसले प्राचार्य,सह्याद्री तंत्रनिकेतन सावर्डे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सर्व उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव केला व आय.टी.आय.च्या प्रशिक्षणार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले, त्यांचे श्रेय प्रथम सह्याद्री शिक्षण संस्था,आय.टी.आय. कॉलेज व तेथील प्राचार्य व शिक्षकांचे आहे. असे म्हटले त्याचबरोबर माननीय पंतप्रधान मोदीजी यांना अभिप्रेत असलेला "आत्मनिर्भर भारत "हा फक्त आय.टी.आयचे प्रशिक्षणार्थीच भारताला आत्मनिर्भर बनवू शकतात, कारण त्यांच्या हातामध्ये कौशल्य आहे. आणि हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.कारण आय.टी.आय मध्ये प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळी रोजगार विषयक कौशल्य ही प्रात्यक्षिकाद्वारे शिकवली जातात.आज जर्मनी सर्व देशांमध्ये नंबर एक आहे.कारण तेथील 50 % विद्यार्थी हे आय.टी.आयचे प्रशिक्षण घेतात,म्हणून जर्मनी सर्व उद्योगधंद्यामध्ये आघाडीवर असणारा देश आहे.
त्याचबरोबर त्यांनी उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्याकडे soft skill असली पाहिजेत, त्यासाठी त्यांनी आपल्या देशातील महान उद्योजक मा.श्री.किर्लोस्कर यांचे उदाहरण दिले . त्यांच्या Team work Skill मुळे त्यांचे उत्पादन,किर्लोस्कर पंप हे आज 150 देशांमध्ये विकले जाते.त्याचबरोबर वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे, याची त्यांनी सखोल अशी माहिती प्रशिक्षणार्थ्यांना दिली.
तसेच कार्यक्रमादरम्यान ठिक 11.00 वाजता देशपातळीवर विज्ञान भवन नवी दिल्ली येथे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत कौशल्य दीक्षांत समारंभ साजरा करण्यात आला त्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संपूर्ण देशांमधील आय.टी.आय.तील अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना उत्तीर्ण प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सर्वांना दाखवण्यात आले.त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व निदेशक वर्ग व सर्व आजी-माजी विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुभाष महादेव गोरिवले यांनी केले.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास योजना पोहोचवा  - नंदकिशोर मालेकर आय.टी.आय सावर्डे येथे अंत्योदय दिनाचे आयोजन  वार्ताह...
30/09/2025

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास योजना पोहोचवा - नंदकिशोर मालेकर

आय.टी.आय सावर्डे येथे
अंत्योदय दिनाचे आयोजन

वार्ताहर- सह्याद्री शिक्षण संस्थेच्या आय.टी.आय सावर्डे येथे अंत्योदय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्ञानसाधना केंद्र शाखा चिपळूणचे अध्यक्ष व्याख्याते नंदकिशोर मालेकर हे बोलत होते.
समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोवचालत तरच अंत्योदय दिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला. असे म्हणता येईल.

हा दिवस पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
“अंत्योदय” *म्हणजे समाजातील सर्वात* शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचवणे. गरीब, वंचित, दुर्बल, शोषित घटकांना न्याय, संधी आणि विकास देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे
"शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू या प्रकाश,
अंत्योदयाची वाटचाल करू या अखंड प्रयास।
सेवेतून होवो समाजाचा विकास,
असा ध्यास प्रत्येक
शाळा/महाविद्यालये यांनी घेतला तर आजची दयनीय परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही.
भारत सरकारने गरिबी दूर करण्यासाठी अंत्योदय योजना अमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला विविध लाभ मिळू लागले. रेशन सुविधा, वैद्यकीय सुविधा अशा अनेक सुविधा मिळू लागल्या. याची जाणीव करून देत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनपटाचा एकात्म मानव दर्शन या विषयावर व्याख्यान देताना त्यांनी आढावा घेतला.
गरीब व गरजूंसाठी मदत कार्य, वस्त्रदान, अन्नदान, आरोग्य शिबिरे आयोजित करा व
समाजातील शेवटच्या घटकाच्या उन्नतीसाठी योजना राबविण्याचा संकल्प करा असे आवाहन त्यांनी विदयार्थ्यांना केले.

प्राचार्य उमेश लकेश्री यांनी अंत्योदय दिनाचे महत्त्व सांगताना करत असताना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जसा विकास होत गेला. त्या पद्धतीने प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील घटकांनी प्रयत्न केला पाहिजे. असे विषद केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्देशक श्री सुभाष गोरीवले यांनी केले.
फोटो - आय.टी.आय सावर्ड येथे अंत्योदय दिन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्याख्याते नंदकिशोर मालेकर

Address

Vahal Fata
Chiplun
415606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyadri ITI Sawarde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share