Shriman P.D. Surana Arts Commere & Science Junior College Chandwad

  • Home
  • India
  • Chandwad
  • Shriman P.D. Surana Arts Commere & Science Junior College Chandwad

Shriman P.D. Surana Arts Commere & Science Junior College Chandwad College Activities

दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी श्रीमान पी. डी. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयात वीर बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यात निबंध...
27/12/2025

दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी श्रीमान पी. डी. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयात वीर बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यात निबंध स्पर्धा , वादविवाद स्पर्धा आणि काव्य स्पर्धा घेण्यात आल्या.

*ऐतिहासिक होळकर वाड्यास भेट*दि. 13/08/2025 रोजी चांदवड येथे श्रीमान पे.द. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र ...
14/08/2025

*ऐतिहासिक होळकर वाड्यास भेट*
दि. 13/08/2025 रोजी चांदवड येथे श्रीमान पे.द. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र मंडळाअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 230 वी पुण्यतिथी निमित्ताने ऐतिहासिक होळकर वाड्यास भेट देण्यात आली. सदरील उपक्रमाच्या आयोजनास डॉ. डी.एन. शिंपी यांचे मार्गदर्शन लाभले.
या भेटीदरम्यान प्राचार्य दत्तात्रय बारगळ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय विचार याविषयी माहिती दिली तसेच होळकर वाड्याचे महत्त्व अगदी सोप्या शब्दात विद्यार्थ्यांसमोर मांडले. यामुळे चांदवडचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उजागर झाला. तसेच अँड.अभिलाषा दायमा यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा स्त्री विषयक सामाजिक दृष्टिकोन यावर आपले मत व्यक्त केले. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारीत डॉ. वर्षा चौरे लिखित "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर" या चरित्र ग्रंथांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री. अशोककाका व्यवहारे, श्री. मोहनलाल शर्मा, डॉ. सुरेश पाटील, श्री. संजय पाडवी इ. समितीचे सदस्य देखील उपस्थित होते. तर आभारप्रदर्शन उपप्राचार्य श्री. वाय.एस. पाटील यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ईश्वरी गोकुळ मंडलिक, पुष्कर केदारनाथ जाधव, देवयानी योगेश जगदाळे, सिद्धी पोपट शिंदे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री राहुल अहिरराव, श्री व्ही.डी. बागुल श्री रोकडे एस.जी. व सामाजिक शास्त्र मंडळाचे सदस्य यांनी प्रयत्न केले. श्री. एम. ए. खैरे, श्री.जी.आर.गांगुर्डे , श्री. आर. डी. म्हस्के, श्रीम. सविता जाधव, श्रीम. तेजस्विनी साठे, श्रीम.अनुराधा ठाकरे आदींसह मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते. या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे विश्वस्त समिती अध्यक्ष बेबीलालजी संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, प्रबंध समिती अध्यक्ष अजितकुमारजी सुराणा, उपाध्यक्ष अरविंदजी भन्साळी, मानद सचिव जवाहरलालजी आबड, महाविद्यालयाचे समन्वयक श्री कांतीलालजी बाफना, श्री महावीरचंदजी पारख, श्री अक्षयकुमारजी भंडारी यांनी कौतुक केले.

15/05/2025
07/05/2025
14/01/2025

विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2024-25 कार्यक्रमाचा आज चौथा दिवस आनंदात व उत्साहात पार पडला. शेलापागोटे कार्यक्रम निमित्त सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी व त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व सदस्यांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.

Address

Shri Neminath Jain Brahmacharyashram, , Neminagar
Chandwad
423101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shriman P.D. Surana Arts Commere & Science Junior College Chandwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category