02/04/2026
उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी श्री मल्लिकार्जुन शाळेला पराभूत करून, उपांत्य फेरीतही उत्कृष्ट कामगिरी करत सरकारी शाळा आगोंदावर विजय मिळवून, आणि आज अंतिम फेरीतही तुडल शाळे विरुद्ध दिमाखदार विजय संपादन करत आमच्या श्री कात्यायनी बाणेश्वर विद्यालयाच्या क्रिकेट चमूने Directorates of Sports and Youth Affairs आयोजित तालुका स्तरावरील Under-17 Boys Cricket स्पर्धेत मानाचा किताब पटकावला आहे.
या शानदार यशामध्ये कु. व्रत धुरी यांनी विशेष कामगिरी करत सामनावीराचा मान पटकावला.
या अभिमानास्पद यशाबद्दल संपूर्ण चमूचे तसेच शारीरिक शिक्षक श्री संतोष सतरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन! मुख्याध्यापिका सौ . पुष्पा देसाई यांच्यावतीने तसेच कार्यकारिणी मंडळाच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन! 🎉👏