29/07/2024
आज दिनांक २९/०७/२०२४ रोजी डॉ राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथे डॉ. एस. एस. हाडोळे (विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला) यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची आढावा बैठक घेतली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. यू. वाघ सर यांनी डॉ हाडोळे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉ. एस. एस. हाडोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेतला. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.