31/12/2020
दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी
मा. जगताप साहेब शिक्षणाधिकारी (प्राथ), जि. प. बुलडाणा
यांनी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (DIET) बुलडाणा येथे सदिच्छा भेट दिली असता प्राचार्य मा. विजयकुमार शिंदे साहेब यांनी मा. जगताप साहेब यांचे पुष्पगुच्छ 💐💐देऊन स्वागत केले.
👉कोविड काळात जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमांवर सविस्तर अशी चर्चा घडून आली.
👉जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शाळांची यशोगाथा चे पुस्तक यशोगाथा माझ्या शाळेची व कोविड काळातील शिक्षण अशा दोन पुस्तकांची भेट मा. शिक्षणाधिकारी यांना देण्यात आली.
👉कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीत शाळा तसेच आमचे शिक्षक बांधव कशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये काम करत आहेत याबद्दल सुद्धा अवगत करून देण्यात आले.
👉येत्या शैक्षणिक वर्षामध्ये काय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता येतील ज्यामुळे की कोविड काळामध्ये मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल यावर चर्चा करण्यात आली.
👉सोबतच प्रशासकीय व शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
🌺सदिच्छा भेटीप्रसंगी वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, विषय सहाय्यक आणि समुपदेशक तसेच कार्यालयीन कर्मचारी हजर होते.
🌅मा. जगताप साहेबांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन भेटीबाबत समाधान व्यक्त केले.