SPH High School, Bordi

SPH High School, Bordi Teaching is a very noble profession that shapes the character, caliber, and future of an individual. Dr. A.P.J. Abdul Kalam

If the people remember me as a good teacher, that will be the biggest honour for me.

 # ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्नगोखले एज्युकेशन सोसायटीचे सु. पे. ह. हायस्कूल, बोर्डी येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२६ र...
15/08/2026

# ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

गोखले एज्युकेशन सोसायटीचे सु. पे. ह. हायस्कूल, बोर्डी येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या सौ. स्वाती प्रकाश सावे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी सुंदर व शिस्तबद्ध कवायत संचलन तसेच देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या शानदार सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.

याप्रसंगी प्रमुख अतिथी प्राचार्या सौ. स्वाती प्रकाश सावे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या भारताचे भविष्य आहेत.” देशाच्या प्रगतीची आणि उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे. विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत, वेळेचे नियोजन आणि सतत नवनवीन ज्ञान मिळविण्याची सवय अंगीकारावी, असे त्यांनी सांगितले.

तसेच मोबाईल व तंत्रज्ञानाचा योग्य व विधायक वापर करावा, व्यसनांपासून दूर राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी, पर्यावरणाचे संवर्धन करावे आणि संविधानातील मूल्यांचा आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले. “चांगले नागरिक घडणे हीच खरी देशसेवा आहे,”असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती व तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा विद्यार्थ्यांनी संकल्प केला. तसेच स्वतः व्यसन करणार नाही आणि इतरांनाही व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करणार, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता, आत्मसंयम आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ झाली.

शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद, पालघर संरक्षण मंत्रालय यांच्या ‘My Gov आणि My Bharat या पोर्टलवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये आपल्या शाळेतील कु.नेहा पाटील व अक्षरा मुळे दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या गुणवत्तेची व उत्कृष्ट सहभागाची दखल घेत लाल किल्ला नवी दिल्ली येथे होणाऱ्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी ई-पासद्वारे त्यांची निवड करण्यात आली. ही बाब शाळेसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवास्पद ठरली. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर विद्यार्थ्यांची बोर्डी गावाच्या दिशेने प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा व घोषवाक्ये देत संपूर्ण परिसरात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली. प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि देशभक्तीची भावना विशेष उल्लेखनीय होती.

त्यानंतर बोर्डी ग्रामपंचायतीच्या ध्वजवंदन कार्यक्रमासही उपस्थिती लावण्यात आली. ग्रामपंचायतीचा ध्वजवंदन कार्यक्रमही उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.जिल्हा परिषद, माध्यमिक विभाग, पालघर यांच्या ‘माय गव्हर्मेंट’ या पोर्टलवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये आपल्या शाळेतील कु.नेहा पाटील व अक्षरा मुळे दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या गुणवत्तेची व उत्कृष्ट सहभागाची दखल घेत लाल किल्ला नवी दिल्ली होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळा 2016 मध्ये सहभागी होण्यासाठी ही निमंत्रण पत्र मिळण्या साठी निवड करण्यात आली.ही बाब शाळेसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवास्पद ठरली. बोर्डी ग्रामपंचायत तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

एकूणच,८० व्या स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा राष्ट्रप्रेम, शिस्त, सामाजिक बांधिलकी, व्यसनमुक्ती आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा ठरला. सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी विद्यार्थी आणि इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा राष्ट्रीय सण अत्यंत उत्साहपूर्ण व अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.

14/08/2026

रानभाजी मेळावा

🌿 *🍃 रानभाज्यांच्या माध्यमातून जपली पारंपरिक खाद्यसंस्कृती-  विद्यार्थिनींचा अभिनव उपक्रम* दि. १३ ऑगस्ट २०२६सु.पे. ह.हाय...
14/08/2026

🌿 *🍃 रानभाज्यांच्या माध्यमातून जपली पारंपरिक खाद्यसंस्कृती- विद्यार्थिनींचा अभिनव उपक्रम*
दि. १३ ऑगस्ट २०२६
सु.पे. ह.हायस्कूल, बोर्डी येथे इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी रानभाज्या मेळाव्याचे आयोजन केले होते.कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या सौ. स्वाती सावे मॅडम, उपप्राचार्य श्री जयवंत महाले सर, पर्यवेक्षिका सौ. कल्पना पाटील यांच्या हस्ते उद्घाटन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या रानभाज्या आणून त्यांची माहिती, पौष्टिकता व आरोग्यदायी महत्त्व यांचे सादरीकरण केले.

मेळाव्यात शाळेतील शिक्षकांनी रानभाज्यांपासून तयार केलेल्या विविध चविष्ट व पौष्टिक भाज्यांची मांडणी केली होती. पालकांनीही मेळाव्यास भेट देऊन विद्यार्थिनींच्या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्य सौ. स्वाती सावे मॅडम, उपप्राचार्य श्री. जयवंत महाले सर, पर्यवेक्षिका सौ. कल्पना पाटील मॅडम, विज्ञानविषय प्रमुख सौ. संगिता अंभीरे मॅडम आणि इतर सर्व विषय शिक्षक उपस्थित होते. प्राचार्या सौ. स्वाती सावे मॅडम यांनी विद्यार्थिनींनी मांडलेल्या रानभाज्यांचे व त्यांच्या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

या उपक्रमातून विद्यार्थिनींना स्थानिक रानभाज्यांचे पौष्टिक महत्त्व, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते यांची माहिती मिळाली. रान मेळाव्यास सु. पे. ह. हायस्कुल चे विद्यार्थी , शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 (इ 7 वी ) या परीक्षेत आपल्या शाळेतीलकु आदित्...
26/07/2026

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 (इ 7 वी ) या परीक्षेत आपल्या शाळेतील
कु आदित्य बापूराव घुले हा विद्यार्थी 65% मिळवून शिष्यवृत्तीस पात्र😊
आदित्य चे खूप खूप अभिनंदन👏

Lady Lotus उपक्रमाअंतर्गत मासिक पाळी स्वच्छता जनजागृती व मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप                  अहवाल कार्यक्रमाचे ना...
17/07/2026

Lady Lotus उपक्रमाअंतर्गत मासिक पाळी स्वच्छता जनजागृती व मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप
अहवाल
कार्यक्रमाचे नाव: मासिक पाळी स्वच्छता जनजागृती व मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप
दिनांक: 17/7/2026
स्थळ: गो.ए. सो.चे सुपेह हायस्कूल बोर्डी
आयोजक संस्था: अभिजीत टेक्नो प्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड CSR श्री नरेश राऊत फाउंडेशन केळवड, तालुका राहता,जिल्हा अहिल्यानगर
प्रमुख उपस्थित:
मा. श्री नरेश भाई राऊत
सौ मीनाताई राऊत ( अध्यक्ष )
प्रा. श्री लक्ष्मण गोर्डे( सचिव)
श्री अंकुश बत्ताशे ( लेखापाल )
श्री सचिन वाघे (प्रकल्प व्यवस्थापक )
श्री अमोल कहांडळ
श्री नवनाथ रजपूत
(श्री नरेश राऊत फाउंडेशन)

महिलांचे व किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे, मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी
श्री नरेश राऊत फाउंडेशन यांच्या वतीने आज आपल्या शाळेत "मासिक पाळी स्वच्छता जनजागृती व मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व स्वागत गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुपेह हायस्कूल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वाती सावे मॅडम यांनी केले व पाहुण्यांची ओळख बोर्डी केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ सुनीता पाटील मॅडम यांनी करून दिली . त्यानंतर तज्ज्ञ वक्त्यांनी मासिक पाळी हा स्त्रीच्या जीवनातील नैसर्गिक व आरोग्यदायी शारीरिक बदल असून त्याविषयी खुल्या मनाने संवाद साधण्याची आवश्यकता स्पष्ट केली. मासिक पाळीदरम्यान वैयक्तिक स्वच्छता, सॅनिटरी नॅपकिनचा योग्य वापर, वेळेवर नॅपकिन बदलणे, त्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे तसेच संतुलित आहार व आरोग्याची काळजी घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये उपस्थित किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. तसेच मासिक पाळीबाबत असलेल्या शंका, गैरसमज व आरोग्यविषयक प्रश्नांचे समाधान करून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमास आठवी ते बारावीच्या मुली उपस्थित होत्या.
शेवटी उपस्थितांचे आभार पी सी जी इंग्लिश मीडियम च्या मुख्याध्यापिका मीनल चुरी मॅडम यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पाहुण्यांच्या हातून शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

15/06/2026

गोखले एज्युकेशन सोसायटीचे
सु.पे.ह हायस्कूल,बोर्डी
दि 15- 6 -2026

**शाळा प्रवेशोत्सव**

आज शाळेचा पहिला दिवस आनंद, उत्साह आणि नव्या आशांनी भरलेला होता. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण करणे, नवागत विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत करणे, तसेच शाळेबद्दल आत्मीयता निर्माण करणे या उद्देशाने सु.पे.ह हायस्कूल शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सरस्वती पूजनाने झाली. मुख्याध्यापक ,शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे फुले देऊन, टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी असे कंपास बॉक्स , पेन ,स्केच पेन, चित्रकलेची वही इत्यादी वस्तू देऊन स्वागत करण्यात आले . प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपलेपणाची भावना देत, शाळेतील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी प्रेरणा देण्यात आली.
यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ.स्वाती सावे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नियमित अभ्यास, शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगल्या संस्कारांचे महत्त्व सांगितले. “शाळा ही केवळ शिक्षण घेण्याची जागा नसून व्यक्तिमत्त्व घडवण्याचे सुंदर व्यासपीठ आहे,” असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.कल्पना पाटील मॅडम सौ छाया राणा मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. पुस्तकांसोबतच चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रेमाने स्वागत करण्यात आले .पालकांनाही मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेचे माजी शिक्षक अविनाश सावे सर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना झाला . प्रवेशोत्सवानिमित्त शाळेची सजावट रंगीबिरंगी बोर्ड, स्वागत फलक ,यांनी करण्यात आली होती. कार्यक्रमादरम्यान ' एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये' हा संदेश देण्यात आला .शालेय पोषण आहारा अंतर्गत विद्यार्थ्यांनी गोड शिऱ्याचा आस्वाद घेतला. विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रवेशोत्सव अत्यंत यशस्वी ठरला. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली .या छोट्याशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत पास झालेल्या तसेच शाळेत  प्रथम तीन क्रमांक मिळवून उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ...
08/05/2026

इयत्ता दहावीच्या परीक्षेत पास झालेल्या तसेच शाळेत प्रथम तीन क्रमांक मिळवून उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन 👍🏻👍🏻👍🏻💐

अभिनंदन! अभिनंदन!सु.पे.ह. हायस्कूल,बोर्डी मधील आठवी इयत्तेतील कुमारी धनश्री रणबावळे व कुमारी अक्षरा मुळे या दोन विद्यार्...
24/04/2026

अभिनंदन! अभिनंदन!

सु.पे.ह. हायस्कूल,बोर्डी मधील आठवी इयत्तेतील कुमारी धनश्री रणबावळे व कुमारी अक्षरा मुळे या दोन विद्यार्थिनी NMMS स्कॉलरशिपसाठी पात्र ठरल्या आहेत.दोन्ही विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन
कौतुकाची बाब म्हणजे कुमारी धनश्री रणबावळे ही पूर्ण पालघर जिल्ह्यामधून ओपन कॅटेगिरीमधून प्रथम आलेली आहे.
कुमारी धनश्रीचे ,तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि तिच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन.👍🏻👍🏻👍🏻💐💐💐

Address

Acharya Bhise Vidyanagar, Late Thakorbhai Shah Road
Bordi
401701

Alerts

Be the first to know and let us send you an email when SPH High School, Bordi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SPH High School, Bordi:

Shortcuts

Share

Category