22/01/2026
आज दि.21.01.2026 रोजी पानसरे कनिष्ठ महाविद्यालय अर्जापूर ता. बिलोली जि.नांदेड येथे कॉपीमुक्त अभियाना संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बेलखेडे एम.बी. , उपप्राचार्य डॉ.चौधरी जी.पी. , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा यावर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेचे केंद्रसंचालक डॉ.गोपाळ चौधरी, पर्यवेक्षक डॉ.गायकवाड एस.एल. व स्टाफ सेक्रेटरी प्रा.मटके एच.व्हि.
तसेच महाविद्यालयातील समस्त प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी
व इयत्ता बारावीच्या कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना होणाऱ्या कॉपीमुक्त परीक्षा संदर्भात मार्गदर्शन करून कॉपीमुक्ती अभियाना संदर्भात जनजागृती करीत विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले…
त्याच बरोबर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा यावर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेचे केंद्रसंचालक डॉ.गोपाळ चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शासन सूचनेनुसार कॉपीमुक्तीची शपथ दिली.
--------------------------------------------