श्री नारायण मा. व उच्च मा. विद्यालय, अहेरचिंचोली

श्री नारायण मा. व उच्च मा. विद्यालय, अहेरचिंचोली

Share

राजश्री महादेवराव काळे
कला अध्यापिका - श्री नारायण मा. व उच्च मा. विद्यालय आहेर चिंचोली, बीड

02/05/2026
12/02/2026

शिट्टीचा आवाज आला की विद्यार्थ्यांची ऊर्जा दुप्पट होते… कारण श्री नारायण विद्यालयाचे चव्हाणसर मैदानावर असतात! 🔥

11/02/2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्ष 4 थे चंपावती महोत्सवात श्री नारायण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेर चिंचोली ता.जि.बीड.या शाळेने पहिल्यांदाच भाग घेतला ग्रामीण भागातील शाळा असुन पहिल्याच प्रयत्नात जिल्हास्तरीय समुह नृत्य स्पर्धेमध्ये पारीतोषिक मिळविले हे खुप अभिमानास्पद आहे. खरंच विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी फक्त स्टेज मिळायला हवे हाच आमचा प्रयत्न होता आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. असेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी कला गुणांसाठी जे काही करता येईल त्यासाठी निश्चित प्रयत्न करत राहू.
चंपावती महोत्सवातील सर्व आयोजकांचे धन्यवाद 🙏

06/02/2026

चंपावती महोत्सव बीड

06/02/2026
Photos from श्री नारायण मा. व उच्च मा. विद्यालय, अहेरचिंचोली's post 27/01/2026

श्री नारायण विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बीड तालुक्यातील आहेर चिंचोली येथे 26 जानेवारी रोजी श्री नारायण मा. व उच्च मा. विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . प्रमुख पाहुणे ह. भ. प. हनुमान महाराज( श्री दत्त संस्थान शिंपेगाव) यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री महादेवराव काळे अण्णा, प्राचार्य तथा संस्थेचे सचिव अमोल काळे सर, माजी प्राचार्य विनायक ढास सर, श्रीमती राजश्री काळे मॅडम, महसूल अधिकारी श्री शिवाजी घोंगडे, श्री छबुलाल परदेशी, श्री शिवाजी चव्हाण, श्री राजेंद्र रुपनर, श्री प्रकाश इनकर यावेळी अनेक मान्यवर ,ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर बहारदार गीत आणि नृत्य सादर केले. शेख कय्युम यांच्या पुण्यस्मरणार्थ यावेळी दहावीतील आदर्श विद्यार्थी म्हणून ज्ञानेश्वर राजेंद्र रकटे तर मुली मधून रिद्धी रमेश रकटे या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले. यांना ट्रॉफी, दहावीचा अपेक्षित संच, 1000 रुपये रोख रक्कम देण्यात आली.
विविध खेळात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चव्हाण सर यांनी केले तर सूत्रसंचालन करपे सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक अशोक घरत सर यांनी मानले.
कार्यक्रमाला प्रा. मस्के जी.बी , श्री शेख सर,श्री इनकर बी .जे, प्रा. पौळ डी.बी, श्री चौधरी पी. बी, श्री रकटे एन. पी, श्री पवार सर, प्रा.मुरमुडे ए .एन , रकटे बी. आर , प्रा. रकटे पी. आर., श्रीमती भुतावळे मॅडम, श्रीमती मस्के मॅडम, श्रीमती जगताप मॅडम यावेळी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Want your school to be the top-listed School/college in Bhir?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

अहेरचिंचोली
Bhir