आपली शाळा तळेपिंपळगाव

आपली शाळा तळेपिंपळगाव

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आपली शाळा तळेपिंपळगाव, Education Website, patoda, Bhir.

Photos from आपली शाळा तळेपिंपळगाव 's post 22/04/2026

जि.प. प्राथमिक शाळा तळेपिंपळगाव: नव्यांचे स्वागत आणि जुन्यांना शुभेच्छा.!!
​आज आमच्या शाळेत उत्साही आणि भावूक वातावरणात 'प्रवेशोत्सव' आणि 'इयत्ता चौथीचा निरोप समारंभ' संपन्न झाला..!!!
एकीकडे नवीन पिढीचे स्वागत करताना होणारा आनंद आणि दुसरीकडे चार वर्षे सोबत राहिलेल्या चिमुकल्यांना निरोप देताना वातावरण भावूक झालं. अशा संमिश्र भावनांनी आजचा दिवस खास ठरला.
​🎉 नवा गंध, नवा आनंद: प्रवेशोत्सव 🎈
​शाळेच्या पहिल्या पावलावर नवीन विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
​फुग्यांची सजावट करून नवगतांचे स्वागत करण्यातआले.जेणेकरून त्यांच्या मनात शाळेबद्दल गोडी निर्माण होईल.
​👋 निरोप समारंभ: इयत्ता चौथी 🎓
​शाळेचा कणा असलेल्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभ पार पडला.
​ विद्यार्थ्यांनी शाळेतील आपले अनुभव व्यक्त केले.
​मुख्याध्यापक म्हणून मी व शिक्षिका जयश्री बडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
​ शाळेला आपल्या आठवणी कायम राहाव्यात विद्यार्थ्यांनी ग्रूपची फोटो फ्रेम दिली.शाळा म्हणजे फक्त इमारत नसते, तर ती संस्कारांची खाण असते. आजचे हे नवे पाऊल आणि ही निरोपाची वेळ, दोन्हीही प्रगतीच्या दिशेने जाणारे मार्ग आहेत.
​या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी झाला.
📸 पहा काही खास क्षणचित्रे...

Photos from आपली शाळा तळेपिंपळगाव 's post 14/04/2026

🌟 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी! 🌟
प्रा. शा. तळेपिंपळगाव येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी सहभाग घेत बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या विचारांचा जागर, संविधानाचे महत्त्व, शिक्षण-समता-न्याय यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला
"शिका, संघटित व्हा, संघर्ष करा"
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेबांच्या स्वप्नातील समतामूलक, न्यायपूर्ण आणि शिक्षित समाज घडवण्यासाठी कटिबद्ध राहूया! 💙
#डॉबाबासाहेबआंबेडकरजयंती #प्रा_शा_तळेपिंपळगाव #जयभीम

05/03/2026

🌸*जाहीर निमंत्रण*🌸
जि.प.प्राथमिक शाळा तळेपिंपळगाव अयोजित सांस्कृतिक कार्यक्रम ' *बालकलारंगोत्सव '*
उदया *दि 6 मार्च 2026 रोजी सायं.7.00 वा. जि.प.शाळेच्या प्रांगणात* अयोजित करण्यात आला आहे.
सरपंच,माजी सरपंच , सर्व आजी माजी ग्रा.प.सदस्य सर्व माजी विदयार्थी तसेच ग्रामस्थ,शिक्षण प्रेमी नागरिक, प्रतिष्ठित नागरीक,मातपालक व बंधू आणि भगिनीनी यांना सविनय आमंत्रित करण्यात येत आहे.आपण उपस्थित राहून चिमुकल्यांचा उत्साह द्विगुणित करावा व त्यांना प्रोत्साहित करावे.
आपण नक्की या..!!!
🙏🏻आम्ही आपली वाट पहात आहोत.🙏🏻
*आपले विनित*
अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती, तळेपिंपळगाव तसेच शिक्षक, शिक्षिका ,अंगणवाडीताई आणि मदतनीस

Photos from आपली शाळा तळेपिंपळगाव 's post 20/02/2026

*शुभेच्छा...!!!*
इयत्ता तिसरीत शिकत असलेली कु.खुशी
चौरे हीचा आज वाढदिवस आहे. खुशीचं सर्व चिमुकल्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. खुशीने सर्व आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व सहाध्यायींना एक पेन व चाॅकलेटस् गिफ्ट दिल्या.
हॅप्पी बर्थ डे खुशी...!!!!

15/02/2026

कु.स्वरा येवलेचा वाढदिवसाचं सेलेब्रेशन करताना
शाळेतील चिमुकले.
वाढदिवस म्हटलं की भारी उर्जा असते मुलांत. साधे साधे आनंद क्षण ते आवडीने वेचत असतात.
लहानग्यांचं एवढं बरं असतं ते आनंद घेताना फार चवणा करत नाहीत.

Photos from आपली शाळा तळेपिंपळगाव 's post 03/02/2026

" उपक्रम सामाजिक बांधिलकीचा,
"वसा माणुसकीचा आणि आपुलकीचा.!!!
असतात काही माणसं काळजात खोल रूजून आपुलकीच्या ओलव्यात बांधिलकीची वर्तुळ तयार करणारी.
थँक्स,राजेंद्र जाधव साहेब व युनूस सर...!!!
वॉटरशेड ऑर्गनायझेशनचे तालुका समन्वयक राजेंद्र जाधव यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप केला.
अनाठायी खर्चाला फाटा देत त्यांनी शाळेतल्या चिमुकल्यांच्या चेह-यावर हसू पसरवले. प्रा.शा. तळेपिंपळगाव येथे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून त्यांनी समाजात वेगळाच पायंडा पाडला आहे.एक नवा आदर्श निर्माण केला आहे ! चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांच ही मन भरून आलं अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
शाळेच्या वतीने त्यांचा ही सत्कार करून मी कृतज्ञता भाव व्यक्त केला.
तसेच महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे श्रीम.जयश्री बडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
या प्रसंगी गावच्या सरपंच नेहाताई चौरे, युनूस सर, सारिकाताई चौरे मी व जेष्ठ शिक्षिका जयश्री बडे व अंगणवाडी ताई शितल कुमटकर उपस्थित होत्या.आभाराचा भार हलका केला श्रीम.जयश्री बडे मॅडम यांनी.

26/01/2026

लेझीम
चिमुकल्यांनी लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

Photos from आपली शाळा तळेपिंपळगाव 's post 26/01/2026

हा उत्सव प्रजासत्ताक दिनाचा..!!
हा सण देशप्रेमाचा आपुलकीचा...!!!

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने आणि देशभक्तीच्या ज्वालाग्नीने प्रा.शा.तळेपिंपळगाव येथे साजरा झाला! 🇮🇳❤️
सकाळीच गावातील प्रभात फेरी काढली...
सर्वत्र उत्साहाची लहर पसरली होती
ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली संगीतबद्ध कवायत..!
प्रत्येक पाऊलात देशप्रेम, प्रत्येक आवाजात स्वातंत्र्याचा जयघोष... हृदय थरारून गेले!
मंचावर उभे राहून मुलांनी व्यक्त केलेले मनोगत... काहींनी मराठीत तर काहींनी इंग्रजीत इतक्या परखड आणि आत्मविश्वासाने भाषणे केली की उपस्थितांची मने जिंकून घेतली. विशेषतः इंग्रजी भाषेतील भाषणांनी तर सगळ्यांची वाहवा मिळवली आणि शेकडो रूपयांची बक्षिसेही पटकावली..! !👏✨
माजी सरपंच बाळासाहेब चौरे यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर व पेन वाटप करण्यात आला.विद्यार्थ्याच्या चेह-यावर,आनंद ओसंडून, वाहत होता.
तसेच विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्तः करण्यात आले.शेवटी ग्रामपंचायत मार्फत खाऊ वाटप करण्यात आला.
सर्वत्र आनंदी, उत्साही आणि देशभक्तीने भारलेले वातावरण... कार्यक्रम संपेपर्यंत प्रत्येक चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान झळकत होता.
या कार्यक्रमाला सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सदस्य, शाळेचे सर्व शिक्षक आणि आमचे लाडके विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
जय हिंद! जय महाराष्ट्र!! 🇮🇳💚
#प्रजासत्ताकदिन #प्रजासत्ताक #तिरंगा #देशभक्ती #शाळा #विद्यार्थी #तालुकापिंपळगाव #प्रजासत्ताक #स्कूल #इंडिया

Want your school to be the top-listed School/college in Bhir?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Patoda
Bhir
431122